जुलैसाठी सेवा सभा
जुलै ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ६ (१६)
१० मि:स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या आणि स्थानिक मंडळीच्या मार्च क्षेत्र सेवा अहवालावर विवेचन मांडा.
१५ मि:“विश्वासूपणाला प्रतिफळ मिळते.” प्रश्नोत्तरे. जानेवारी २२, १९९३, सावध राहा! (इंग्रजी) पृष्ठे १८-२१ वर दिलेले उदाहरण सांगा.
२० मि:“सांत्वन मिळवण्यास इतरांना मदत करा.” श्रोत्यांसोबत चर्चा. एक किंवा दोन सादरतांचे प्रात्यक्षिक दाखवा. त्याच माहितीपत्रकांचा उपयोग करून इतरांनी संभाषणे सुरू करण्यासाठी वेगळ्या पद्धती कशा वापरल्या आहेत ते सांगण्यास श्रोत्यांना आमंत्रण द्या. आस्था निर्माण करण्यासाठी साधेसोपे, निवडक शब्द वापरण्याचे उत्तेजन द्या. (प्रशाला मार्गदर्शक (इंग्रजी), पृष्ठ ७, परिच्छेद ९-११ पाहा.) सादर केल्या जाऊ शकणाऱ्या आणि मंडळीकडे साठा असलेल्या इतर माहितीपत्रकांविषयी सांगा.
गीत ७० (२२) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै १४ ने सुरू होणारा सप्ताह
गीत ५ (६)
१७ मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. “राज्य सभागृह निधी” या पेटीतील माहितीचाही समावेश करा. “आपण कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत” याची उजळणी करा. प्रत्येक व्यक्तीला अभ्यासाकरता पुस्तकाची वैयक्तिक प्रत असण्याच्या गरजेवर जोर द्या आणि सर्वांना आधीच अध्यायांची तयारी करून येण्याचे उत्तेजन द्या.
१३ मि:“जेथे कोठे लोक असतील तेथे साक्ष द्या.” एक भाषण. वेळ असेल त्यानुसार, १९९७ वार्षिकपुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ४३-६ वरील अतिरिक्त अनुभवांचा समावेश केला जाऊ शकतो.
१५ मि:पालकांनो—आपल्या मुलांना बालपणापासून तालीम द्या. पालकांनी आपल्या मुलांना बालपणापासून शिकवण्याची गरज आहे हे दाखवणाऱ्या शास्त्रवचनीय तत्त्वांची चर्चा वडील करतात. (नीति. २२:६; २ तीम. ३:१४, १५) काही पालकांना वाटते, की मुले स्वतःचे निर्णय घेण्याइतपत मोठे होत नाहीत तोपर्यंत त्यांना बायबलचे गंभीर शिक्षण देण्यात येऊ नये. या विचारांमुळे अनेक मुले जगिक बनली आहेत. आध्यात्मिक शिक्षण बालपणापासूनच देण्यात आले पाहिजे. (g९७ ४/८ १४-५; w८९ ३/१ १२-१३) एका विवाहित जोडप्याची मुलाखत घ्या ज्यांना आपल्या मुलांच्या आध्यात्मिकतेची चिंता आहे. पिता पुढाकार घेत असला तरीही दोन्ही पालक आपल्या मुलांना शिकवण्याचा अखंड, पक्का कार्यक्रम तयार करण्यात कसा भाग घेतात हे दाखवा. आपल्या मुलांना सत्य शिकवण्यासाठी या जोडप्याने कोणकोणते प्रयत्न केले आणि घरीच शिक्षणाचा प्रभावशाली, व्यावहारिक कार्यक्रम असण्याविषयी संघटनेने पुरवलेल्या सूचनांचे पालन कसे केले याबद्दल ते सांगतात. देवाचे वचन पालकांना जे करण्यास आर्जवते त्याचा अवलंब करण्याच्या महत्त्वावर वडील जोर देतात.—w८५ ४/१ २३ (इंग्रजी); इफिस. ६:१-४.
गीत ७१ (४) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २१ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १४ (८)
१५ मि:स्थानिक घोषणा. “जुन्या पुस्तकांचा उपयोग करणे” याची चर्चा करा. ह्या आठवडी प्रचारकांना आपली व्यक्तिगत पुस्तकालये तपासून या प्रकाशनांची गरज आहे का ते पाहण्यास उत्तेजन द्या; मग लिटरेचर काऊंटरवरून मागणी करण्यासाठी उत्तेजन द्या ज्यामुळे या महिन्याच्या शेवटी मंडळी संस्थेकडे त्यांची मागणी करू शकते.
१५ मि:“नवीन माहितीपत्रक आणि त्याची कॅसेट उपयोगात आणून इतरांना देवाच्या अपेक्षा शिकून घेण्यास मदत करा.” भाषण. अपेक्षा माहितीपत्रकाची ऑडियो कॅसेट उपलब्ध असल्यास, ती कॅसेट वापरून अभ्यास करत असल्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि:अनौपचारिक साक्षकार्यासाठी तयार असा. दररोज आपल्याला भेटणाऱ्या लोकांना साक्ष देण्याच्या संधी आपल्याला मिळतात. जेव्हा संधी मिळते, तेव्हा आपल्याजवळ बायबल अथवा प्रकाशने नसल्याचे आपल्या लक्षात येते. आधीच व्यवस्था करा. घरात, तुम्ही पाहुण्यांचे स्वागत करता तेथे दाराजवळच काही साहित्य ठेवत जा. ब्रीफकेस किंवा पर्समध्ये निरनिराळे साहित्य ठेवून ती बॅग तुमच्यासोबत किंवा कारमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा शाळेतल्या लॉकरमध्ये ठेवा. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना तुमच्यासोबत नेहमी काही साहित्य ठेवा. कामाच्या संबंधाने बाहेर जाताना, अधिवेशनाला जाताना किंवा सुटीला जाताना देखील थोडेफार साहित्य सोबत ठेवा. प्रशाला मार्गदर्शक पुस्तक (इंग्रजी), पृष्ठे ८०-२, परिच्छेद ११-१६ मधील अतिरिक्त सूचनांची चर्चा करा. एखाद्या सेल्समनशी, सह-कर्मचाऱ्याशी, शाळा सोबत्याशी, दुसऱ्या प्रवाशाशी किंवा सुटीवर जात असलेल्या व्यक्तीशी संभाषण कसे सुरू करावे त्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ७२ (२२) व समाप्तीची प्रार्थना.
जुलै २८ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १५ (२)
१२ मि:स्थानिक घोषणा. सर्वांना आपापले क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्या. ऑगस्टच्या साहित्य सादरतेची उजळणी करा. जुलैमध्ये जेथे माहितीपत्रके देण्यात आली होती तेथे ऑगस्टमध्ये पुनर्भेटी देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याच्या प्रयत्नावर जास्त जोर द्या. मार्च १९९७ आमची राज्य सेवा पुरवणीचा उपयोग करून, प्रभावकारी पुनर्भेटीसाठी काय आवश्यक आहे ते दाखवून द्या. अपेक्षा माहितीपत्रकातून किंवा ज्ञान पुस्तकातून अभ्यास सुरू करण्यात यावेत. “आमच्यासाठी कोण जाईल?” या पेटीतील सकारात्मक विवेचनांचा समावेश करा. जे नियमित पायनियरींग करू शकत नाहीत ते येत्या सेवा वर्षादरम्यान कोणत्या महिन्यात अथवा महिन्यांमध्ये सहायक पायनियरींग करावी त्याची योजना कदाचित करू इच्छितील.
१८ मि:“व्यक्तिगत अभ्यासामुळे आध्यात्मिक प्रगती होते.” प्रश्नोत्तरे. वेळेनुसार, उल्लेखित शास्त्रवचने वाचा. सर्वांना व्यक्तिगत आणि कौटुंबिक अभ्यासाचा साप्ताहिक आराखडा बनवून तो पाळण्यास प्रोत्साहन द्या.
१५ मि:आपली सेवा पूर्णपणे पार पाडा. आपली सेवा पुस्तकातील पृष्ठे ५-८ वर आधारित सेवा पर्यवेक्षकांचे भाषण. प्रचार कार्याच्या महत्त्वावर आणि निकडीवर जोर द्या आणि सर्वांना सेवक या नात्याने आपली जबाबदारी गंभीरतेने घेण्यास प्रवृत्त करा.
गीत ७५ (६) व समाप्तीची प्रार्थना.