पालकांनो—आपल्या पाल्यांना प्रचार करण्याची तालीम द्या
१ देवाची सेवा करण्याची प्रांजळ इच्छा असणारी अनेक मुले आपल्या मंडळ्यांत असल्यामुळे ह्या मंडळ्या धन्य झाल्या आहेत. (उप. १२:१) यहोवाची स्तुती करण्यास त्याने आमंत्रित केलेल्या लोकांमध्ये यांना गणले जाते. (स्तोत्र १४८:१२-१४) यास्तव, पालक दररोज आपल्या पाल्यांना देत असलेल्या तालमीत, राज्य प्रचाराच्या कार्यात आपल्या विश्वासाची सहभागिता इतरांसोबत कशी करावी याचेही शिक्षण समाविष्ट असावे.—अनु. ६:६, ७.
२ प्रगतिशील मार्गांने मुलांना तालीम द्या: आपल्या पालकांसह सेवेत जाण्याची तालीम अगदी लहानपणापासूनच पाल्यांना देणे गरजेचे आहे. एका अर्थपूर्ण मार्गानिशी सहभाग घेण्याच्या उद्देशाने, सेवेत जाण्याआधी तुमच्या पाल्यांकडून तशी तयारी करून घ्या. दारांवर त्यांनी काय बोलावे, हे आधीच निश्चित करा. अतिशय लहान मुले देखील पत्रिका व हस्तपत्रिका देऊन, लोकांना राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रण देऊ शकतात. ज्या लहानग्यांना वाचता येते, अशांना दारावर शास्त्रवचने वाचण्यास सांगितले जाऊ शकते. एक संक्षिप्त प्रस्तुती देऊन ते नियतकालिके सादर करू शकतात. मुले जसजशी अनुभवी बनतात, तसतसे त्यांना आपल्या प्रस्तुतीमध्ये बायबलचाही उपयोग करण्याची तालीम द्या. कित्येक लहान प्रचारकांनी आपला स्वतःचा नियतकालिक मार्ग सुरू केला असून नियमितपणे ते पुनर्भेटीही करतात. एखाद्या लहान मुलाने दुसऱ्या एका लहान मुलासोबत कार्य करण्याऐवजी, प्रौढ व्यक्तीसोबत कार्य करणे सगळ्यात उत्तम आहे. प्रौढ व्यक्ती, घरमालकांस सांगू शकते, की या लहान मुलाला सेवेची तालीम दिली जात आहे.
३ राज्य प्रचारक होण्यास पात्र व्हावे याकरता एका लहान मुलीने वडिलांकडे मदत मागितली. त्यावेळी ती अवघ्या पाच वर्षांची होती व वाचूही शकत नव्हती, तरी दारांवर परिणामकारकरित्या राज्याचा संदेश ती सांगू शकत होती. शास्त्रवचने कोठे आहेत हे तिने लक्षात ठेवले, ती वचने उघडून घरमालकास वाचण्यास सांगितली आणि मग त्यावरील स्पष्टीकरण तिने दिले.
४ पालकांच्या उदाहरणावरून पाल्यांना, नियमितपणे सेवेत सहभागी होण्याचा एक उत्तम आराखडा तयार करण्याचे महत्त्व शिकवण्यास हवे. पालकांनी सेवेकरता, एक साप्ताहिक नित्यक्रम प्रस्थापित करून त्याला जडून राहण्याची गरज आहे; असे केल्यास सप्ताहातील कोणता दिवस प्रचार कार्यासाठी राखला आहे ते पाल्यांना माहीत असेल.
५ अगदी कोवळ्या वयापासूनच सेवेची आवड बाळगण्यास व तिच्यात आनंद मानण्याची तालीम पाल्यांना दिली, म्हणजे भवितव्यात अधिक मोठे विशेषाधिकार साध्य करण्यास, कदाचित पायनियर सेवाही करण्यास ते प्रवृत्त होतील. (१ करिंथ. १५:५८) आपण सर्वांनी, आपल्यामध्ये असलेल्या मुलांना, यहोवाचे स्तुतीकर्ते या नात्याने उत्तम प्रगती करण्याचे उत्तेजन देण्यास हवे.