वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९७
आमची राज्य सेवा—१९९७
km ३/९७ पृ. ७

घोषणा

▪ या वर्षी स्मारकविधी हंगामाचे खास जाहीर भाषण अधिकतर मंडळ्यांमध्ये रविवार, एप्रिल ६ रोजी दिले जाईल. भाषणाचे शीर्षक आहे “जगिक मलिनतेपासून शुद्ध राहा.” आपण सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे तसेच स्मारकविधीकरता आलेल्या आस्थेवाईकांनाही या भाषणासाठी उपस्थित राहण्यास मदत केली पाहिजे. आपण जे ऐकणार आहोत ते, देवाला संतुष्ट करण्याचा आपला निर्णय अधिक दृढ करण्यास कारणीभूत ठरेल.

▪ सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकातील मंडळीच्या अभ्यासांतून जास्तीतजास्त लाभ मिळवण्यासाठी एप्रिल १९९३ ची आमची राज्य सेवा यातील पृष्ठ ८ वर दिलेली उत्कृष्ट मार्गदर्शिका कृपया विचारात घ्या. हा लेख, प्रत्येक धड्याची तयारी कशी करावी तसेच मंडळीचा पुस्तक अभ्यास कोणत्या रुपरेषेवर आधारित असेल याचे स्पष्टीकरण देतो. या माहितीची उजळणी केल्याने अभ्यास संचालक आणि उपस्थित राहणारे सर्वजण लाभ प्राप्त करतील.

▪ प्रत्येक समाजात, वर्षभरात विविध प्रसंगी जगिक सुट्या असतात ज्यावेळी मुलांना शाळेतून आणि प्रापंचिक नोकरी करणाऱ्‍यांनासुद्धा सुट्टी मिळते. यामुळे मंडळीला क्षेत्र सेवेत अधिक भाग घेण्याच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतात. असे प्रसंग केव्हा येतील याचा वडिलांनी अंदाज बांधावा आणि सुट्यांदरम्यान गटाच्या साक्षकार्याकरता ज्या व्यवस्था केल्या जातात त्यांविषयी मंडळीला आगाऊ माहिती द्यावी.

▪ अध्यक्षीय पर्यवेक्षक अथवा त्यांनी नियुक्‍त केलेल्या कोणा एकाने मार्च १ रोजी अथवा त्यानंतर लवकरात लवकर मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यानंतर मंडळीत त्याची घोषणा करण्यात यावी.

▪ मार्च १, १९९७ पासून कन्‍नड, मराठी आणि तेलगू भाषेतील सर्व टेहळणी बुरूज व आमची राज्य सेवा अंकांत, या भाषांत उपलब्ध असलेल्या गीत माहितीपत्रकातील पर्यायी गीत क्रमांक असतील. या भाषांत संचालित केल्या जाणाऱ्‍या सभांमध्ये, इंग्रजी गीतांऐवजी प्रादेशिक भाषेतील गीते गायिली जावीत. यामुळे, मंडळ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेतील राज्य गीतांशी परिचित होण्यास उत्तेजन मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा