घोषणा
◼ जानेवारी: प्रत्येकी १०.०० रुपयांच्या अनुदानात १९२ पृष्ठांच्या जुन्या पुस्तकांची खास सादरता. बंगाली आणि नेपाळी भाषकांसाठी ३२ पृष्ठांची माहितीपत्रके सादर केली जाऊ शकतात. मल्याळम भाषकांसाठी तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात आणि पंजाबी भाषेच्या वाचकांसाठी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्यावी, की शेवटली दोन पुस्तके खास दरात सादर केली जाऊ नयेत.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना) किंवा तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक २०.०० रुपयांच्या अनुदानात. पर्यायी सादरता म्हणून १९२ पृष्ठांची कोणतीही जुनी पुस्तके खास सादरता म्हणून १०.०० रुपयांच्या अनुदानात सादर केली जाऊ शकतात.
मार्च: “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनात नवे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. मंडळ्यांनी आपले अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आपल्या पुरवठ्यांची मागणी करावी.
एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! यांच्या वर्गण्या.
◼ या वर्षी रविवार, मार्च २३ रोजी सूर्यास्तानंतर होणारा स्मारकविधी साजरा करण्यासाठी मंडळ्यांनी सोईस्कर व्यवस्था केल्या पाहिजेत. भाषण लवकर सुरू झाले तरी स्मारकविधीची बोध चिन्हे सूर्यास्तापूर्वी फिरविण्यास सुरवात करू नये. तुमच्या ठिकाणी सूर्यास्त केव्हा होतो याची स्थानिक उगमाकडे चौकशी करावी. क्षेत्र सेवेखेरीज कोणत्याही सभेचे त्या दिवशी आयोजन केले जात नाही त्यामुळे टेहळणी बुरूज अभ्यास इतर दुसऱ्या वेळी संचालित करण्यासाठी योग्य त्या व्यवस्था करण्यात याव्यात. विभागीय पर्यवेक्षकांना स्थानिक परिस्थितींनुसार त्यांच्या सभेच्या आराखड्यात बदल करण्याची गरज भासेल. आपआपला स्मारकविधी स्वतंत्रपणे साजरा करावा, अशी प्रत्येक मंडळीची इच्छा असते; परंतु हे नेहमीच शक्य होत नाही. अनेक मंडळ्या एकाच राज्य सभागृहाचा सामान्यपणे उपयोग करतात अशा ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा अधिक मंडळ्या त्या संध्याकाळी दुसरी व्यवस्था करू शकतात. आस्थेवाईक नवीन लोकांना येण्यास गैरसोईचे होईल इतक्या उशिरा स्मारकविधीची सुरवात करू नये. तसेच समारंभाआधी किंवा नंतर भेट देणाऱ्यांना भेटण्यास वेळ मिळणार नाही इतका ओढघस्तीचा आराखडा तयार करू नका, आस्थेवाईकांना आध्यात्मिक साहाय्य देण्याचे चालू ठेवण्यासाठी व्यवस्था करा किंवा एकमेकांना प्रोत्साहन द्या. सर्व बाबींचा पूर्णपणे विचार केल्यानंतर स्मारकविधीसाठी उपस्थित राहणाऱ्यांना संपूर्णतः लाभ मिळण्यासाठी कोणती व्यवस्था उत्तम असेल याचा निर्णय वडिलांनी घेतला पाहिजे.
◼ या प्रसंगाच्या महत्त्वामुळे वडीलवर्गाने स्मारकविधीच्या वक्त्याची नियुक्ती वडिलांच्या आळीपाळीच्या आधारावर करण्याऐवजी किंवा प्रत्येक वर्षी त्याच त्या बांधवास भाषण देण्यास सांगण्याऐवजी अधिक पात्र असलेल्या वडिलांपैकी एकाला त्यासाठी नेमावे.
◼ सन १९९७ च्या स्मारकविधी हंगामाकरता असणारे खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल ६ रोजी देण्यात येईल. रूपरेषा देण्यात येईल. या सप्ताहांती ज्या मंडळ्यांमध्ये विभागीय पर्यवेक्षांची भेट, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस असेल त्या मंडळ्यांत हे खास भाषण पुढील सप्ताहात देण्यात येईल. कोणत्याही मंडळीत हे खास भाषण एप्रिल ६ च्या आधी दिले जाऊ नये.
◼ जानेवारी १, १९९७ पासून खालील नवीन किंमती लागू होतील:
पायनियर मंडळी/जनता
३२-पानी पुस्तिका १.५० २.००
सर्व माहितीपत्रके ४.०० ६.००
तरुणांचे प्रश्न (इंग्रजी),
बायबल कथा (इंग्रजी) (लहान आकाराचे),
निर्मिती (इंग्रजी) (लहान आकाराचे),
गीत पुस्तक (इंग्रजी) (लहान आकाराचे) २०.०० ३०.००
मानवजातीने केलेला शोध (इंग्रजी) ४०.०० ६०.००
नवे जग भाषांतर
(bi12 वीथ रेफरन्स) (इंग्रजी) ६०.०० ८०.००
शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे* ६.०० १०.००
ऑडियो कॅसेट (एक) ५५.०० ६५.००
* शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—१९९७ याचे जानेवारी १, १९९७ पूर्वी वितरण करण्यात आले तरी या किंमती लागू होतील.
◼ जानेवारी ६ च्या सेवा सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या बाप्तिस्माप्राप्त प्रचारकांनी आपल्यासाठी आगाऊ वैद्यकीय अधिकृत सूचना/जबाबदारीतून मुक्तता कार्ड आणि आपल्या मुलांसाठी ओळखपत्र साहित्य कक्षातून प्राप्त करावे.
◼ पुन्हा उपलब्ध असलेली प्रकाशने:
जीवनात आणखी पुष्कळसे आहे—गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलगू शांतीदायक नवीन जगातील जीवन (पत्रिका क्र. १५)—तिबेटन