वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/९६ पृ. २
  • जुलैसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जुलैसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • उपशिर्षक
  • जुलै १ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै ८ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १५ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २२ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २९ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९६
km ७/९६ पृ. २

जुलैसाठी सेवा सभा

जुलै १ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ९० (३२)

१२ मि: स्थानिक घोषणा. आमची राज्य सेवा यातील निवडक घोषणा. देशाच्या तसेच स्थानिक मंडळीच्या एप्रिल क्षेत्र सेवा अहवालाबद्दल टिपणी करा.

१५ मि: “आपले नवस नित्य फेडीत राहणे.” प्रश्‍नोत्तरे. सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड दुसरा, पृष्ठ ११६२, परिच्छेद ६-७ मधील विवेचने समाविष्ट करून नवस करणे हे गंभीर बंधन का आहे ते दाखवा.

१८ मि: “इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा.” (परिच्छेद १-३) लेखाचा विषय विकसित करण्यासाठी पहिला परिच्छेद विचारात घ्या. सध्या मंडळीत साठा असलेली कोणती माहितीपत्रके तुमच्या क्षेत्रात लगेच स्वीकारली जातील ते ठरवा. ती कोणत्या भाषेत उपलब्ध आहेत ते सांगा आणि निरनिराळ्या भाषेतील विविध माहितीपत्रके सोबत घेऊन जाण्यास उत्तेजन द्या. मग केवळ २-३ परिच्छेदांची उजळणी करा, व देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकाद्वारे प्रथम भेट तसेच पुनर्भेट कशी हाताळली जाऊ शकते ते दाखवा. प्रचारक, स्थानिक क्षेत्रासाठी उचित असलेल्या दुसऱ्‍या एखाद्या माहितीपत्रकाची प्रस्तुती स्वतःहून कशी तयार करू शकतात ते दाखवा.

गीत ११२ (५९) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै ८ ने सुरू होणारा सप्ताह

गीत ४३ (११)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल.

१५ मि: “इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा.” (परिच्छेद ४-५) केवळ परिच्छेद ४-५ ची व तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) या माहितीपत्रकातील काही ठळक मुद्यांची चर्चा करा. मग प्रथम भेटीकरता आणि पुनर्भेटीकरता सुचवलेल्या प्रस्तुतींचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि: “नियमित पायनियर सेवेत अधिक बांधवांची गरज आहे.” प्रश्‍नोत्तरे. वेळ अनुमती देईल त्यानुसार, सप्टेंबर १५, १९९३, टेहळणी बुरूज, पृष्ठे २८-३१ मध्ये चर्चिल्याप्रमाणे आर्थिक गरजा कशा भागवाव्यात यावरील सुचनांची उजळणी करा.

गीत १६ (१०१) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै १५ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १६२ (८९)

१० मि: स्थानिक घोषणा.

२० मि: “तुम्ही सायंकाळचे साक्षकार्य करून पाहिले आहे काय?” श्रोत्यांचा सहभाग व काही मुलाखती असलेले भाषण. सायंकाळी क्षेत्रात कार्य करताना स्थानिकरित्या कशाचे निरीक्षण करण्यात आले आहे त्याचे कथन करा. सायंकाळच्या साक्षकार्यातून सकारात्मक परिणाम लाभणारे अनुभव सांगा. सेवेकरता सभांचा स्थानीय साप्ताहिक आराखडा सांगा.

१५ मि: “इतरांची खरी काळजी घेऊन यहोवाचे अनुकरण करा.” (परिच्छेद ६-८) ज्यांना माहितीपत्रके देण्यात आली आहेत अशांकडे तत्परतेने पुनर्भेटी करण्याचे उत्तेजन सर्वांना देण्याकरता लेखाच्या शेवटल्या परिच्छेदाचा उपयोग करा. परिच्छेद ६-७ चा उपयोग करून प्रथम भेटीत जीवनाचा उद्देश माहितीपत्रक कसे सादर करावे व पुनर्भेटीत ज्ञान पुस्तकाच्या पहिल्या अध्यायातून अभ्यास कसा सुरू करावा त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. प्रचारकांना आठवण करून द्या, की आमची राज्य सेवा यात सुचवलेल्या प्रस्तुतींचा नमुना अनुसरून ते इतर माहितीपत्रकांसाठी स्वतःच्या प्रस्तुती बनवू शकतात.

गीत ६४ (३५) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै २२ ने सुरू होणारा सप्ताह

गीत १०८ (६९)

१० मि: स्थानिक घोषणा. संक्षिप्तपणे अलीकडील नियतकालिकांच्या अंकांची उजळणी करून असे मनोवेधक ठळक मुद्दे दाखवा जे घरी प्रस्तुत करताना उपयोगात आणले जातील.

१५ मि: पूर्ण-वेळ सेवेच्या ध्येयाचा पाठलाग करा. डिसेंबर १५, १९८८, टेहळणी बुरूज (इंग्रजी), पृष्ठे २५-७ वर आधारित वडील व एक किंवा दोन किशोरवयीनांमध्ये चर्चा. ते युवक, उच्च शालेय शिक्षण संपल्यावर कोणते ध्येय अनुसरतील हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जगिक करियरद्वारे सादर केल्या जाणाऱ्‍या भौतिक फायद्यांमध्ये ते अधिक रस घेतात. तर वडील, नियमित पायनियर सेवा करण्याचा प्रयत्न करणे अधिक चांगले का असेल याची सबळ कारणे दाखवतात. किशोरवयीन तयार होतात पण नियमित पायनियर या नात्याने ते स्वतःला भौतिक गोष्टी पुरवू शकतील का याबद्दल शंका व्यक्‍त करतात. वडील त्यांना टेहळणी बुरूज लेखातील अनुभव सांगतात व नियमित पायनियर सेवा एक वाजवी व साध्य करण्याजोगे ध्येय असून अनेकांना त्यामुळे आनंद मिळतो हे दाखवून देतात. चर्चेच्या शेवटी किशोरवयीन, वडिलांच्या टिपणीची प्रशंसा करतात व राज्य सेवेमध्ये पूर्ण सहभाग घेण्याच्या ध्येयाचा पाठलाग करण्याविषयी गांभिर्याने विचार करण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे सांगतात.

२० मि: “ज्ञान पुस्तकाद्वारे शिष्य कसे बनवावेत.” जून १९९६ आमची राज्य सेवा याच्या पुरवणीतील १२-१६ परिच्छेद पूर्ण करणारे भाषण. बायबल अभ्यास चालू असल्याची दोन प्रात्यक्षिके समाविष्ट करा. पहिल्या प्रात्यक्षिकात, छापील प्रश्‍नांचे थेट उत्तर देणारे शब्द अथवा शब्दसमूहांवर खूण करून किंवा त्यांना अधोरेखित करून धड्याची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्याला कसे प्रशिक्षण द्यावे हे दाखवले जाते. दुसऱ्‍या प्रात्यक्षिकात, बायबल विद्यार्थ्याला जाहीर सभा आणि टेहळणी बुरूज अभ्यासाकरता उपस्थित राहण्यास उत्तेजन देण्यासाठी तुम्ही काय म्हणाल हे दाखवले जाते.

गीत ११६ (३७) व समाप्तीची प्रार्थना.

जुलै २९ ने सुरू होणारा सप्ताह

गीत २१२ (११०)

१० मि: स्थानिक घोषणा. “सध्या उपलब्ध असलेले साहित्य” याची उजळणी करा.

२० मि: बायबल अभ्यास मिळवण्यासाठी काय मदत करील? बायबल अभ्यासाच्या कार्यात ज्यांना यश प्राप्त झाले आहे अशा दोघा-तिघा जणांशी चर्चा करून अभ्यास सुरू करण्यात अधिक यशस्वी होण्याच्या मार्गांची उजळणी करतात: (१) यहोवाच्या मदतीसाठी प्रार्थना करा. (२) आस्थेवाईक जणांचा शोध घेण्यासाठी सेवा कार्याच्या विविध पैलूंमध्ये नियमितपणे सहभाग घ्या. (३) ज्या सर्व ठिकाणी आस्था व्यक्‍त केली त्यांची नोंद करा व तत्परतेने पुनर्भेटी द्या. (४) आस्था दाखवली जाते तेथे नेहमी अभ्यास सादर करा. (फेब्रुवारी १५, १९९६ टेहळणी बुरूज पृष्ठ २० वरील “बायबल अभ्यास सुरू करणे” हे उपशिर्षक पाहा.) (५) ऑगस्ट १, १९८४, टेहळणी बुरूज (इंग्रजी) पृष्ठे १३-१७ वर दिलेल्या चार सुचनांचा उपयोग करून तुमच्या शिकवण्याच्या क्षमतेबद्दल आत्मविश्‍वास वाढवा.

१५ मि: स्थानिक गरजा. किंवा वडील, जानेवारी १५, १९९६, टेहळणी बुरूज, पृष्ठे २१-३ यातून “सांत्वन व प्रोत्साहन—पैलूदार रत्ने,” हे भाषण देतील.

गीत १६५ (८१) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा