मैत्रिपूर्ण संभाषणे अंतःकरणापर्यंत पोहंचू शकतात
१ संभाषाची व्याख्या, “कल्पनांची तोंडी देवाणघेवाण” अशी केली जाऊ शकते. इतरांकरता चिंतेच्या बाबी असलेल्या विषयांवर मैत्रिपूर्ण संभाषणे सुरू केल्यामुळे त्यांची आस्था वेधली जाऊ शकते आणि राज्य संदेशाला त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचवण्यात आपली मदत होऊ शकते. लोकांना प्रवचन देण्याऐवजी मैत्रिपूर्ण व अनौपचारिक संभाषणात गोवणे अधिक प्रभावकारी आहे असे अनुभवाने दाखवून दिले आहे.
२ मैत्रिपूर्ण संभाषण कसे सुरू करावे: आपल्याला इतरांसोबत संभाषण करणे शक्य असण्याचा अर्थ, काही विचार आणि शास्त्रवचनांची उल्लेखनीय मांडणी करणे असा होत नाही. त्यामध्ये, केवळ दुसऱ्या व्यक्तीला आपल्याशी बोलण्यास वाव देणे इतकेच समाविष्ट आहे. उदाहरणार्थ, आपण आपल्या घराशेजारी राहणाऱ्यासोबत मैत्रिपूर्ण संभाषण करतो तेव्हा, ते साचेबंद नसून अनौपचारिक संभाषण असते. आपण पुढे काय बोलणार याचा विचार करत नसतो तर त्याच्या कल्पनांना स्वाभाविकपणे प्रतिसाद देत असतो. तो जे काही म्हणत असतो त्याबद्दल खरी आस्था दाखवल्याने आपल्यासोबत संभाषण करीत राहण्यास त्याला उत्तेजन मिळू शकेल. इतरांना साक्ष देताना देखील हेच केले पाहिजे.
३ मैत्रिपूर्ण संभाषणे सुरू करण्यासाठी गुन्हेगारी, युवकांच्या समस्या, स्थानिक विषय, जागतिक परिस्थिती किंवा हवामानाच्या विषयाचा देखील उपयोग केला जाऊ शकतो. लोकांच्या जीवनांवर थेट प्रभाव करणारे विषय देखील त्यांची आस्था जागृत करण्यात अतिशय प्रभावकारी असतात. संभाषण एकदा सुरू केल्यावर, आपण हळूहळू त्यास राज्य संदेशाकडे वळवू शकतो.
४ अनौपचारिकपणे संभाषण करण्याचा अर्थ, पूर्वतयारीची जरूरी नाही असे नव्हे. ती जरूरी आहे. तथापि, एखादी ठराविक रूपरेषा तयार करण्याची किंवा एखादे प्रवचन पाठ करण्याची गरज नाही, ज्यामुळे लवचीक नसलेले किंवा त्यावेळेच्या परिस्थितींनुसार न जुळणारे संभाषण परिणीत होईल. (पडताळा १ करिंथ. ९:२०-२३.) शास्त्रवचनीय विषयांवरच उभारणीकारक संभाषणे निर्माण करण्याच्या हेतूने एक किंवा दोन तसे विषय निवडणे हा तयारी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. याकरता, युक्तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील विषयांची उजळणी करणे मदतदायी ठरेल.
५ मैत्रिपूर्ण संभाषणासाठी अत्यावश्यक असलेले गुण: आपण इतरांशी संभाषण करतो तेव्हा आपण प्रमेळ व प्रामाणिक असले पाहिजे. या गुणांना प्रतिबिंबित करण्यासाठी चेहऱ्यावरील स्मित व आनंदी स्वरूप मदत करतात. आपल्याजवळ जगातील सर्वात उत्तम संदेश आहे; तो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना अधिक अपीलकारक वाटतो. त्यांच्याबद्दल आपली आस्था, त्यांना सुवार्ता सांगण्याच्या प्रामाणिक इच्छेने प्रेरित झाली आहे असे जर त्यांना वाटले, तर ते ऐकण्यास प्रवृत्त होतील.—२ करिंथ. २:१७.
६ संभाषण करणे एक सुखदायक अनुभव असला पाहिजे. यास्तव, आपण राज्य संदेश प्रस्तुत करण्यात नम्र व कुशल असले पाहिजे. (गलती. ५:२२; कलस्सै. ४:६) दुसऱ्या व्यक्तीवर अनुकूल प्रभाव पाडा. अशा तऱ्हेने, सुरवातीलाच त्याच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्यास आपण यशस्वी ठरलो नाही, तरी एखादा साक्षीदार दुसऱ्या वेळेला त्याच्याशी संभाषण करील तेव्हा तो कदाचित अधिक ग्रहणशील असेल.
७ एखादे अवघड प्रवचन देण्यात निपुण झाल्यामुळे मैत्रिपूर्ण संभाषण परिणीत होत नाही. केवळ एका व्यक्तीला चिंता वाटणाऱ्या विषयाबद्दल आस्था जागृत करण्याची ती बाब आहे. पूर्वतयारी केल्यावर, आपण लोकांना मैत्रिपूर्ण संभाषणात सामील करण्यासाठी तयार असू. आपल्याला भेटणाऱ्या लोकांना राज्याच्या सार्वकालिक आशीर्वादांची सर्वात उत्तम वार्ता सांगून त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू या.—२ पेत्र ३:१३.