उन्हाळ्याकरता तुमच्या काय योजना आहेत?
उन्हाळा म्हटले, की उष्ण हवामान, आणि कदाचित आरामासाठी सुटीच्या किंवा नातेवाईकांना व मित्रांना भेटी देण्याच्या योजना यांचा हमखास विचार येतोच. उन्हाळी योजना करताना, राज्य आस्थांना प्रथम स्थान देण्यास तुम्हाला मदत करतील अशा काही स्मरणिका येथे आहेत:
◼ तुम्ही सुटीवर गेल्यास, स्थानिक मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याच्या व सेवेमध्ये भाग घेण्याच्या योजना करा. तुमच्या सेवा कार्याचा अहवाल देण्यास विसरू नका; आवश्यकता असल्यास तुमच्या मंडळीच्या सचिवांना तो टपालाने पाठवा.
◼ सत्यात नसलेल्या नातेवाईकांना भेट देताना तुम्हाला फलदायी अनौपचारिक साक्षकार्य करण्यास संधी मिळू शकेल. तुमचे बायबल आणि साहित्याचा पुरेसा साठा सोबत घेऊन जाण्यास विसरू नका.
◼ तुमच्या जवळपासच्या एखाद्या मंडळीला तिचे क्षेत्र उरकण्यासाठी मदत देण्याबद्दल तुम्ही विचार केलात का? तुमच्या क्षेत्रातील गरजांविषयी माहिती मिळवण्यासाठी वडिलांबरोबर किंवा विभागीय पर्यवेक्षकांबरोबर विचारपूस करा.
◼ शालेय सुट्या तरुणांना त्यांचे सेवा कार्य विस्तारित करण्यासाठी उत्तम संधी देतात. तरुणांनो, तुम्ही सहायक पायनियर म्हणून कार्य करू शकता का?
◼ तुम्हाला दिसून येईल, की शुष्क हवामान व दिवस मोठा असल्यामुळे जास्तीतजास्त लोक घरी असतात त्यावेळी म्हणजेच संध्या साक्षकार्य करण्याद्वारे तुम्हाला सेवेत उत्कृष्ट प्रतिफळ मिळू शकते.
◼ वडिलांनी मंडळीच्या कार्यांना सुसंघटित ठेवण्यास जागृत असले पाहिजे, जबाबदाऱ्या नियुक्त करून दिलेले बांधव नसतील तेव्हा त्यांच्या जागी कोणा दुसऱ्याला त्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्या योजना कराव्यात.
लक्षात ठेवा, “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात.” (नीति. २१:५) तुमच्या उन्हाळी ईश्वरशासित संधींचा पुरेपूर फायदा घेण्याची योजना करा.