योग्य मनोवृत्ती असलेल्यांचा शोध घ्या
१ प्रचार कार्याचा एक उद्देश म्हणजे, “सार्वकालिक जीवनाबद्दल योग्य मनोवृत्ती” असलेल्यांचा शोध घेणे होय. (प्रे. कृत्ये १३:४८, NW) हे साध्य करण्यासाठी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचे वितरण करणे हा सर्वोत्तम मार्ग शाबीत झाला आहे, कारण आपली नियतकालिके लोकांना राज्य आशेची जाणीव करून देतात. एप्रिल दरम्यान आपण या नियतकालिकांच्या वर्गण्या सादर करणार आहोत. अशी आशा आहे, की आस्था दिसते तेथे आपण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून नवीन बायबल अभ्यास सुरू करू शकतो. उपयोगी ठरतील अशा काही सूचना तुमच्याकरता येथे आहेत:
२ एप्रिल १ “टेहळणी बुरूज” नियतकालिकाचा उपयोग करताना, मागील वर्षाच्या प्रांतीय अधिवेशनातील जाहीर भाषणावर लक्ष केंद्रित करणारा “सनातन राजाची स्तुती करा!” हा लेख तुम्ही दाखवून असे म्हणू शकता:
▪ “आपण ज्यांच्याशी बोलतो अशा अनेक लोकांचा देवावर विश्वास आहे. काहींना त्यावर विश्वास ठेवण्यास कठीण वाटते. याविषयी तुम्हाला कसे वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देव असलाच पाहिजे हे शाबीत करणारा खरा पुरावा आपल्या सभोवती आहे. [स्तोत्र १०४:२४ वाचा.] आपण एखादा कॅमेरा किंवा संगणक पाहतो, तेव्हा त्यास कोणा बुद्धिमान रचनाकाराने बनवले असावे असे आपण लगचेच मानतो. तर मग, याहूनही गुंतागुंतीच्या गोष्टी जसे की, पृथ्वी आणि आपल्यासारखे मानव आकस्मिकरित्या घडले असे म्हणणे उचित असेल का?” लेखातील एका परिच्छेदातून देवावर विश्वास बाळगण्याचे अचूक कारण दाखवा. नियतकालिकाच्या महत्त्वाविषयी सांगा आणि वर्गणी सादर करा.
३ “खऱ्या उपासनेला देवाचा आशीर्वाद का प्राप्त होतो” हा लेख एप्रिल १५ या “टेहळणी बुरूज” नियतकालिकात दिला आहे. उचित असेल, तेथे त्यास सादर करण्याआधी तुम्ही असे विचारू शकता:
▪ “जगामध्ये शेकडो धर्म असून ते सर्व देवाला स्वीकारयोग्य असतील असा विचार तुम्ही करता का? [विवेचनाकरता वाव द्या.] येशूने भाकीत केले, की अनेक धार्मिक व्यक्तींनी प्रतिपादन केले असतानाही देवाची इच्छा न करणाऱ्यांचा धिक्कार केला जाईल. [मत्तय ७:२१-२३.] आपण येशूने शिकवलेल्या खऱ्या धर्माची ओळख करून घेणे महत्त्वपूर्ण आहे.” पृष्ठ १६ वरून सुरवात होणारे “खऱ्या धर्माने कोणते फळ उत्पन्न करावे?” हे शीर्षक पाहा, आणि त्या मुद्याला स्पष्ट करण्यासाठी एका उदाहरणाची चर्चा करा.
४ “युद्धे नसतील तेव्हा” हा एप्रिल २२ च्या “सावध राहा!” (इंग्रजी) नियतकालिकेतील मुख्य विषय सादर करताना, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “या शतकात, शेकडो युद्धे तसेच दोन महायुद्धे देखील लढली आहेत. तरीही, प्रत्यक्षात सर्वच जगिक नेते स्वतःस शांती हवी असल्याचे सांगतात. मला परिचित असलेले सर्वजण हेच म्हणतात. सर्वांना शांती हवी आहे, तर मग ते तिला प्राप्त का करू शकत नाहीत? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आपल्याला पृथ्वीवर खरी शांती पाहण्यास मिळण्याकरता कशाची आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटते?” घरमालकाच्या प्रतिसादानंतर पृष्ठे ८ आणि ९ काढा व स्तोत्र ४६:८, ९ यासारखी वचने वाचा. चित्रांचा व उद्धृत केलेल्या शास्त्रवचनांचा उपयोग करून देवाचे राज्य, चिरकाल टिकणारी जागतिक शांती कसे आणील हे दाखवा. त्यानंतर वर्गणी सादर करा आणि परत येण्याची व्यवस्था करा.
५ आम्ही कामात आहोत असे म्हणणारे पुष्कळ जण तुम्हाला भेटत असल्यास, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “कामात असलेल्या लोकांची व जीवनाच्या आध्यात्मिक पैलूकडे लक्ष देण्यास फारच कमी वेळ असणाऱ्यांची मदत करण्यास आम्हाला अधिक आवडते. टेहळणी बुरूज आणि सावध राहा! ही आमची नियतकालिके, तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबावर प्रभाव पाडणाऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबद्दल संक्षिप्त माहिती देण्यासाठी बनवली गेली आहेत. तुम्ही या प्रती घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे.”
६ वर्गणी नाकारणाऱ्यांना, या नियतकालिकाच्या विविध प्रती प्रत्येकी ४.०० रुपयांच्या अनुदानात सादर करण्याचे लक्षात असू द्या. “शुभवृत्त” सांगणारी टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिके वाचून त्यांना निश्चितच लाभ प्राप्त होईल.—यश. ५२:७.