वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९६ पृ. १
  • अहोरात्र पवित्र सेवा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अहोरात्र पवित्र सेवा करा
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • नवोदितांना प्रगती करण्यासाठी मदत करा
    आमची राज्य सेवा—१९९३
  • एप्रिल—‘मेहनत व परिश्रम’ करण्याचा समय
    आमची राज्य सेवा—२००१
  • चांगल्याची आस्था बाळगा!
    आमची राज्य सेवा—२००३
  • देवाची भक्‍ती करण्यासाठी इतरांना मदत देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km ४/९६ पृ. १

अहोरात्र पवित्र सेवा करा

१ आपल्याला एक असाधारण विशेषाधिकार देण्यात आला आहे. तो म्हणजे, यहोवाचे साक्षी होण्याचा. अभूतपूर्व राज्य घोषणेचे सर्वात मोठे कार्य साध्य करण्याकरता यहोवा ज्या सुवार्तिकांच्या जागतिक संघटनेचा उपयोग करून घेत आहे तिचा आपण भाग आहोत! (मार्क १३:१०) आपल्या काळाची निकड लक्षात घेता, आपण या कार्यात भाग घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत का?

२ आपल्या प्रचाराला कालांतराने किती जण प्रतिसाद देतील ते आपल्याला ठाऊक नाही. यहोवाची ‘अहोरात्र पवित्र सेवा करत’ असल्याचे ओळखल्या जाणाऱ्‍या त्या सर्वांचा “मोठा लोकसमुदाय” असेल असे आश्‍वासन तो आपल्याला देतो. (प्रकटी. ७:९, १५) देवाच्या सेवेत व्यग्र असलेले पाच लाखांपेक्षा अधिक साक्षीदार केवळ आस्थेने ऐकणारे नाहीत, तसेच ते केवळ सभांना उपस्थित राहणारेही नाहीत. ते जगभरात सुवार्तेची घोषणा करणारे कामगार आहेत!

३ प्रत्येक दिवशी, क्षेत्र सेवेत अथवा अनौपचारिकरीत्या यहोवाची स्तुती करण्याच्या संधी उपलब्ध असतात. आपल्यातील प्रत्येकाने दर दिवशी किमान एका व्यक्‍तीला सत्य सांगण्यात पुढाकार घेतला, तर किती महान साक्ष देता येईल याचा जरा विचार करा. यहोवाबद्दल गुणग्राहकता वाटत असल्यामुळे त्याच्याविषयी उत्साहाने सांगण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे.—स्तोत्र ९२:१, २.

४ पवित्र सेवा करण्यात इतरांना मदत करा: यहोवा वृद्धी करण्याद्वारे आपल्याला आशीर्वाद देत राहतो. (हाग्ग. २:७) भारतामध्ये, मागील सेवा वर्षात, प्रत्येक महिन्याला सरासरी १३,१०५ गृह बायबल अभ्यास चालवण्यात आले. या लोकांसोबत अभ्यास करण्याचा आपला हेतू म्हणजे त्यांना येशूचे शिष्य होण्यास मदत करण्याचा आहे. (मत्त. २८:१९, २०) त्यातील अनेकांनी नियमितरित्या सभांना उपस्थित राहून आधीच उत्तम प्रगती केली आहे. ते, शिकून घेतलेल्या ‘देवाच्या महत्कृत्यांविषयी’ परिचित असलेल्या लोकांना सांगू लागले आहेत. (प्रे. कृत्ये २:११) त्यांना आता जाहीर सेवेमध्ये भाग घेण्याकरता बोलावले जाऊ शकते का?

५ एप्रिलमध्ये, आपल्यासोबत क्षेत्र सेवेत येण्यास पात्र असलेल्या नवीन लोकांना आमंत्रण देण्याचा खास प्रयत्न आपण केला पाहिजे. तुमच्या विद्यार्थ्याने असे करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे का? असे असल्यास, तो शास्त्रवचनीय गरजा पूर्ण करत आहे का? (पाहा आपली सेवा (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठे ९७-९.) तो विद्यार्थी क्षेत्र सेवेत भाग घेण्याची इच्छा व्यक्‍त करतो तेव्हा, त्याच्या संभवनीयतेबद्दल अध्यक्षीय पर्यवेक्षकांशी चर्चा करा व ते या बाबीची तपासणी करण्यासाठी दोन वडिलांची व्यवस्था करतील. जर विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनण्यास पात्र ठरला, तर तुमच्यासोबत क्षेत्रात येण्यास त्याला आमंत्रण द्या. एप्रिलमध्ये प्रचार सुरू करण्यास पात्र ठरणाऱ्‍या लोकांना विशेषतः साहाय्य देण्याबद्दल सेवा पर्यवेक्षकांनी व पुस्तक अभ्यास चालकांनी दक्ष असले पाहिजे.

६ आपली मुले बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक होण्याच्या पात्रतेचे आहेत का याचा विचार पालक करू शकतात. (स्तोत्र १४८:१२, १३) तुमच्या मुलाला राज्य सेवेत भाग घ्यावयाचा असल्यास व त्याची वर्तणूक चांगली असल्यास, याची चर्चा करण्यासाठी तुम्ही सेवा समितीतील एखाद्या वडिलांना जाऊन भेटू शकता. तुमची व तुमच्या पाल्याची भेट घेतल्यावर, तो प्रचारक म्हणून गणले जाण्यास पात्र आहे का हे दोन वडील ठरवतील. यहोवाची स्तुती करण्यात मुले देखील आपली साथ देतात तेव्हा आनंद करण्यासाठी एक खास कारण असते!

७ आपल्याकडील पवित्र सेवेसाठी केवळ यहोवा पात्र आहे. (लूक ४:८) त्याची “पुष्कळ” स्तुती करण्याच्या सुंदर विशेषाधिकाराचा आपण प्रत्येक जण उपयोग करू या.—स्तोत्र १०९:३०; ११३:३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा