वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९६ पृ. ७
  • धैर्याने बोला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धैर्याने बोला
  • आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळती जुळती माहिती
  • ‘देवाचे वचन धैर्याने बोला’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • सर्वत्र सुवार्तेचा प्रचार करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा
    आमची राज्य सेवा—२००५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९६
km १/९६ पृ. ७

धैर्याने बोला

१ अलीकडील वर्षांमध्ये काही भागांतील प्रचारकांना, घरी असलेल्या लोकांशी बोलणे फारच कठीण असल्याचे आढळत आहे. अनेकजण असा अहवाल देतात, की त्यांच्या क्षेत्रात ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक घरोघरी भेटी देत असताना घरी नसतात. परिणामतः, खर्च केला जाणारा पुष्कळ वेळ फलदायी नसतो.

२ अनेक वर्षांआधी पुष्कळ लोक रविवारी घरी भेटत असत, कारण तो विश्रांतीचा दिवस असे समजले जात होते. प्रथांमुळे तो दिवस बदलला आहे. आज ऐहिक नोकऱ्‍या करणे, खरेदीसारख्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणे किंवा करमणूक करणे हे सर्व त्यांच्यासाठी सर्वसामान्य आहे व यामुळे देखील लोकांना घराबाहेर पडावे लागते. म्हणून रविवारी देखील, घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधणे समस्या बनली आहे.

३ लोक घरी नाहीत, म्हणजे ते नक्कीच दुसऱ्‍या ठिकाणी आहेत. लोकांशी बोलणे हेच आपले ध्येय आहे, तर आपण रस्त्यावर, बाजारात किंवा कामाच्या ठिकाणी ज्यांना भेटतो त्यांच्याशीच का बोलू नये बरे. पौलाला ‘जे लोक आढळत’ त्यांना साक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे जाणे ही त्याची सवय होती. (प्रे. कृत्ये १७:१७) त्या काळी हा साक्षकार्याचा फलदायी मार्ग होता, आणि आजही तो फलदायी मार्ग आहे.

४ आपण घरोघरी जातो तेव्हा, लोक आरामात चालत असलेले किंवा कदाचित कोणा दुसऱ्‍यासाठी थांबलेले आपण बहुतेक वेळा पाहतो. एखाद्या दिवशी ते बागेतील बाकावर बसलेले किंवा त्यांची गाडी दुरुस्त वा स्वच्छ करत असतील. एक मैत्रिपूर्ण स्मित किंवा स्नेही अभिवादन एवढेच केवळ संभाषण सुरू करण्यास आवश्‍यक असेल. ते जवळपास राहत असल्यास, आपण त्यांना त्यांच्या घरी भेटलो नाही आणि आता त्यांच्याशी बोलण्यास ही संधी मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटतो हेही आपण त्यांना सांगू शकतो. आणखी थोडेसे धैर्य दाखवण्यास पुढाकार घेतल्याने अनेकांना प्रतिफलदायी अनुभव आले आहेत.

५ धैर्यामुळे प्रतिफळे मिळतात: एक बांधव असे म्हणतात, की ते उभे असलेल्या, बससाठी थांबलेल्या, फेरफटका मारत असलेल्या किंवा स्वतःच्या गाडीत बसलेल्या लोकांकडे जातात. स्नेहपूर्ण स्मित आणि प्रसन्‍न आवाजात ते, भेट द्यावयास आलेल्या मैत्रिपूर्ण शेजाऱ्‍याप्रमाणे त्यांच्याकडे जातात. अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ साहित्याचे केवळ वाटपच केले नाही तर अनेक बायबल अभ्यास देखील सुरू केले आहेत.

६ एक दुसरा बांधव व त्यांची पत्नी दारोदारी जाऊन भेटी देत असताना, किराणा मालाची भलीमोठी पिशवी उचलून चाललेली एक स्त्री त्यांना भेटली. त्यांनी संभाषण सुरू केले, व तिच्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देण्याच्या मेहनतीपणाबद्दल त्यांनी तिची प्रशंसा केली. त्यांनी विचारले, “पण, मानवाच्या गरजा कोण पूर्ण करू शकतो?” यामुळे त्या स्त्रीची आस्था वाढली. एका संक्षिप्त संभाषणामुळे तिच्या घरी येण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले जेथे एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

७ म्हणून पुढील वेळी, रविवारी किंवा आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवशी तुम्ही दारोदारी साक्षकार्य करताना, लोक घरी नाहीत असे तुम्हाला आढळल्यास, थोडेसे धैर्य एकवटून जे लोक तुम्हाला रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी भेटतात त्यांच्याशी का बोलू नये बरे? (१ थेस्सलनी. २:२) तुमची सेवा अधिक फलदायी असेल व तुम्हाला तुमच्या सेवेत अधिक आनंद प्राप्त होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा