वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १/९६ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—१९९६
आमची राज्य सेवा—१९९६
km १/९६ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता

जानेवारी: आमची राज्य सेवा यात आधी दिलेल्या खास सादरतेची पुस्तके म्हणून १९२ पृष्ठांच्या पुस्तकांपैकी कोणतेही ८.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. या प्रकारातील खालील पुस्तके आमच्याजवळ उपलब्ध आहेत: इंग्रजी: मानव येथे उत्क्रांतीने की निर्मितीने आला? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; कन्‍नड: “तुझे राज्य येवो,” आणि “देवाला खोटे बोलणे अशक्य आहे अशा गोष्टी;” गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो,” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; तामिळ: “तुझे राज्य येवो” आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; तेलगू: तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का?; मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो.” पंजाबी किंवा बंगाली जाणणाऱ्‍या व्यक्‍तींना आपल्या समस्या किंवा “पहा!” माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते आणि नेपाळी जाणणाऱ्‍यांना जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! हे माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळम भाषेत प्रकाशन हवे असणाऱ्‍या लोकांना तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. हे पुस्तक खास दरात सादर केले जाऊ नये याची कृपया नोंद घ्या.

फेब्रुवारी: तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांसाठी). पर्याय म्हणून, तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे हे पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात सादर केले जाऊ शकते. या पुस्तकाची तेलगू आवृत्ती ८.०० रुपयांच्या खास दरात सादर केली जाऊ शकते.

मार्च: ज्ञान जे सार्वकालिक जीवनाप्रत नेते पुस्तक १५.०० रुपयांच्या अनुदानात. हे मंडळीत अद्यापही उपलब्ध नसल्यास, तुम्ही नंदनवनात पृथ्वीवर अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना).

एप्रिल आणि मे: टेहळणी बुरूज आणि अवेक! यांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपये आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.

सूचना: फेब्रुवारीसाठी सुचवलेल्या सादरतेत बदल आहे. आम्ही सर्व मंडळ्यांना पुरेसा साठा मिळवण्यास व अनंतकाल जगू शकाल आणि कौटुंबिक जीवन पुस्तकांचा चांगला उपयोग करण्यास सर्वांना उत्तेजन देतो. प्रचारक, संपूर्ण वर्षादरम्यान नेहमीच या पुस्तकांच्या प्रती ठेवू शकतात आणि त्यांना प्रत्येक उचित प्रसंगी सादर करू शकतात. ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या साहित्याची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-AB-14) पाठवावी.

▪ या वर्षी, मंगळवार, एप्रिल २ रोजी मंडळ्यांनी स्मारक विधी साजरा करण्यासाठी सोयीस्कर योजना कराव्यात. प्रत्येक मंडळीने स्वतःचा स्मारक विधी करणे इष्ट असले, तरी हे नेहमीच शक्य नसेल. सामान्यतः अनेक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरत असल्यास, एक किंवा त्यापेक्षा अधिक मंडळ्या त्या सायंकाळसाठी दुसरी सुविधा मिळवू शकतात. नवीन आस्थेवाईक लोकांना उपस्थित राहण्यास गैरसोयीचे होईल इतक्या उशिरा स्मारक विधीची सुरवात होऊ नये. शिवाय, दोन सभांमधील मध्यंतराचा काळ अल्पावधीचा नसावा जेणेकरून सोहळ्याच्या आधी किंवा नंतर अभ्यागतांना भेटण्यासाठी, काहींना सतत आध्यात्मिक साहाय्यता देण्यास योजना करण्यासाठी किंवा एक सामान्य उत्तेजनाची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ नसेल. सर्व घटकांचा पूर्णपणे विचार केल्यावर, त्या प्रसंगातून पूर्ण लाभ मिळवण्याकरता, स्मारक विधीसाठी उपस्थित राहणाऱ्‍यांना कोणत्या व्यवस्था अधिक मदत करतील हे वडिलांनी ठरवले पाहिजे.

▪ सन १९९६ च्या स्मारक विधीच्या हंगामाचे खास जाहीर भाषण रविवार, एप्रिल २१ रोजी देण्यात येईल. त्या भाषणाचे शीर्षक “एका कुटिल व विपरीत पिढीत निर्दोष राहणे” हे असेल. एक रूपरेषा पुरवली जाईल. त्या सप्ताहांती, विभागीय पर्यवेक्षकांची भेट, विभागीय संमेलन किंवा खास संमेलन दिवस असणाऱ्‍या मंडळ्यांमध्ये हे खास भाषण नंतरच्या आठवडी असेल. कोणत्याही मंडळ्यांमध्ये हे भाषण एप्रिल २१ च्या आधी देण्यात येऊ नये.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा