ईश्वरशासित वृत्त
कॅमेरून: जुलैमध्ये एक नवीन शाखा दप्तर स्थापण्यात आले आणि त्याचवेळी २१,३२३ प्रचारकांचा नवीन उच्चांक गाठण्यात आला.
भारत: केरळमध्ये जानेवारी १, १९९५ पासून आठवा विभाग कार्य करण्यास सुरु झाला आहे. आता या देशात एकूण २३ विभाग आहेत व त्यातील चार विभाग ‘अ’ आणि ‘ब’ अशा गटांमध्ये विभागलेले आहेत.
फिलिपाईन्स: फेब्रुवारीच्या अहवालाने १,१७,५१९ प्रचारकांचा नवा उच्चांक दाखवला. प्रथमच, बायबल अभ्यास १,००,००० पेक्षा अधिक झाले व १,००,१४६ अभ्यासांचा अहवाल देण्यात आला. रंगीत छपाईचा बदल केल्यामुळे नोव्हेंबर १९९३ नंतर नियतकालिकांचे वाटप १,००,००० पेक्षा अधिक झाले.