घोषणा
▪ साहित्य सादरता
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (मोठ्या आकाराचे ४५.०० रुपयांना आहे). या पुस्तकाचे वाटप केल्यावर त्याचा मागोवा पुनर्भेटी करण्याद्वारे घेतला पाहिजे आणि बायबल अभ्यास सुरु करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मार्च: क्वेशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक २५.०० रुपयांच्या अनुदानात (हे पुस्तक इंग्रजी, मल्याळम आणि तामीळ भाषांमध्ये उपलब्ध आहे). इतर भाषांमध्ये १९२-पृष्ठांची कोणतीही नवीन पुस्तके १५.०० रुपयांच्या नियमित अनुदानात सादर केली जाऊ शकतात.
एप्रिल आणि मे: टेहळणी रुज किंवा अवेक! नियतकालिकांच्या वर्गण्या. पाक्षिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी ७०.०० रुपयांना आहे. मासिक आवृत्तींची एका वर्षाची वर्गणी आणि पाक्षिक आवृत्तींची सहा महिन्यांची वर्गणी ३५.०० रुपयांना आहे. मासिक आवृत्तींसाठी सहा महिन्यांची वर्गणी नाही.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्म (S-AB-14) यावर पाठवावी.
▪ सचिव आणि सेवा पर्यवेक्षकांनी सर्व नियमित पायनियरांच्या कार्यहालचालीची उजळणी केली पाहिजे. काहींना अपेक्षित तास पूर्ण करण्यासाठी कठीण वाटत असेल, तर वडिलांनी साहाय्यता देण्यासाठी योजना केली पाहिजे. सुचनांसाठी ऑक्टोबर १, १९९३ आणि ऑक्टोबर १, १९९२ च्या संस्थेच्या पत्रांची (S-201) उजळणी करा. तसेच, ऑक्टोबर १९८६ ची आमची राज्य वा यातील १२-२० परिच्छेद पाहा.
▪ स्मारक विधी समारंभ शुक्रवार, एप्रिल १४, १९९५ रोजी होईल. भाषण लवकर सुरु होत असले, तरी स्मारक विधीची भाकर आणि द्राक्षारस यांना सूर्यास्ताआधी फिरवण्यात येऊ नये हे कृपया लक्षात ठेवा. तुमच्या भागात सूर्यास्त कधी होतो हे पाहण्यासाठी स्थानिक उगमांकडे विचारपूस करा. त्या तारखेला क्षेत्र सेवेच्या सभांशिवाय इतर कोणत्याही सभा घेतल्या जाऊ नयेत. तुमच्या मंडळीच्या सभा शुक्रवारी असतील, तर राज्य सभागृह उपलब्ध असल्यास आठवड्याच्या इतर दिवशी सभा भरवू शकता.
▪ एप्रिल २३, १९९५ रोजी मंडळीच्या सभांच्या तसेच विभागीय संमेलन व खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाच्या समाप्तीस, समयोचित संदेश असणाऱ्या चार पृष्ठे असलेल्या पत्रिकेच्या सार्वत्रिक वितरणाने आरंभ करून प्रगतीशील खास कार्याविषयी घोषणा केली जाईल. सामना करावा लागणाऱ्या कठीण समस्यांवर गंभीरतेने विचार करणाऱ्या तसेच विश्वसनीय मार्गदर्शन शोधणाऱ्या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांकडे खास लक्ष देण्याचे उत्तेजन प्रचारकांना दिले जाईल. मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान क्षेत्र सेवेत जाणाऱ्या प्रत्येक प्रचारकाला तसेच नवोदितांनाही पूर्णपणे सहभाग घेण्यास आणि या खास मोहिमेला पाठिंबा देण्यास आवडेल.
▪ मार्च, एप्रिल आणि मे दरम्यान साहाय्यक पायनियरींग करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी त्यांच्या योजना आताच आखाव्यात आणि लवकरात लवकर त्यांचे अर्ज द्यावेत. हे वडिलांना क्षेत्र सेवेसाठी आवश्यक व्यवस्था करण्यास आणि पुरेशा साहित्याचा साठा ठेवण्यास मदत करील. एप्रिलमधील या कार्यात शक्य होईल तितक्यांनी सहभाग घ्यावा असे उत्तेजन आम्ही देत आहोत.