मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना
१ येशू, आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे निरवणाऱ्या सत्याची साक्ष देण्यासाठी त्याच्या पित्याच्या मार्गदर्शनानुरुप पृथ्वीवर आला. (योहा. १८:३७) मृत्यूपर्यंत त्याने दाखवलेल्या विश्वासूपणामुळे यहोवाचा गौरव झाला, देवाच्या नावाचे पवित्रीकरण झाले आणि एक खंडणी पुरवण्यात आली. (योहा. १७:४, ६) याकारणामुळेच येशूचा मृत्यू मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना ठरली.
२ आदामाच्या सृष्टीपासून आजपर्यंत या पृथ्वीवर केवळ दोनच परिपूर्ण व्यक्ती हयात होत्या. आदाम त्याच्या अद्याप जन्माला न आलेल्या संततीवर आश्चर्यकारक आशीर्वाद आणण्याच्या स्थितीत होता. उलटपक्षी त्याने स्वार्थीपणे बंड केले, मृत्यूने अंत होणाऱ्या एका दुःखद स्थितीला त्याने त्यांना आणले. येशू पृथ्वीवर आला तेव्हा त्याने परिपूर्ण निष्ठा आणि आज्ञाधारकता दर्शवली आणि जे कोणी विश्वास दाखवतात त्या सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी पुरवली.—योहा. ३:१६; रोम. ५:१२.
३ येशूच्या बलिदानरूपी मृत्यूसोबत इतर कोणत्याही घटनेची तुलना करता येणार नाही. त्याने मानवी इतिहास बदलूनच टाकला. त्याने कोट्यावधी लोकांना मृतातून पुनरूत्थित करण्यासाठी आधार पुरवला. त्याने चिरकालिक राज्याचा पाया घातला जे राज्य दुष्टाईचा अंत करून पृथ्वीला नंदनवन बनवील. सरतेशेवटी ते सर्व मानवजातीला सर्व प्राकारचा जाच आणि दास्यत्व यातून मुक्त करील.—स्तोत्र ३७:११; प्रो. कृत्ये २४:१५; रोम. ८:२१, २२.
४ या सर्व गोष्टी आपल्याला, येशूने त्याच्या शिष्यांना प्रात्येक वर्षी त्याच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यास का सांगितले ते समजण्यास मदत करतात. (लूक २२:१९) त्याच्या महत्त्वाची गुणग्राहकता बाळगून, आपण शुक्रवारी एप्रिल १४ रोजी, सूर्यास्तानंतर संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये एकत्र होण्याची वाट पाहून आहोत. ती वेळ येण्याआधी, कुटुंब या नात्याने पृथ्वीवरील येशूच्या शेवटल्या दिवसांबद्दल आणि सत्यासाठी त्याने घेतलेला धैर्यवान पावित्रा याबद्दल बायबलचा वृत्तांत वाचणे किती बरे होईल. (सांगितलेले उतारे आमच्या १९९५ कॅलेन्डरवरील एप्रिल ९-१४ येथे दिले आहेत.) आपल्या निर्माणकर्त्याची उपासना करण्याचा कित्ता त्याने आपल्याला घालून दिला आहे. (१ पेत्र २:२१) या महत्त्वपूर्ण एकत्रीकरणाला आपण, आपले मित्र आणि कौटुंबिक सदस्य तसेच, बायबल विद्यार्थी आणि इतर आस्थेवाईक व्यक्तींना आमंत्रण देण्याचा प्रायत्न करू या. जो काही कार्यक्रम होईल त्याबद्दल आणि बोधचिन्हांच्या महत्त्वाबद्दल आगाऊच स्पष्टीकरण द्या.—१ करिंथ. ११:२३-२६.
५ राज्य सभागृह स्वच्छ आणि सुव्यवस्थित आहे याची योजना वडिलांनी आगाऊच करावी. बोधचिन्हे आणण्यासाठी कोणाची तरी व्यवस्था करावी. बोधचिन्हांचे फिरवणे व्यवस्थित असले पाहिजे. प्राभूच्या सांज भोजनाला आदर कसा द्यावा यावरील मदतदायी सूचना फेब्रुवारी १५, १९८५ च्या टेहळणी रुज पृष्ठ १९ वर दिलेल्या आहेत. मंडळ्यांनी, स्मारक दिन साजरा करण्याच्या काही दिवस आधी आणि साजरा केल्यानंतर काही दिवसांसाठी विस्तृत क्षेत्र सेवेची योजना करणे अतिशय उचित ठरेल.
६ गत वर्षी, संपूर्ण जगभरात एकूण १,२२,८८,९१७ लोक या महत्त्वपूर्ण स्मारक विधीच्या घटनेला उपस्थित होते. तो दिवस आपल्या दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वपूर्ण दिवस असल्यामुळे आपण सर्वांनी उपस्थित राहिलेच पाहिजे.