इतरांचा विचार करा—भाग २
१ शक्य होईल तितक्या उचितपणे, आपल्या समाजात राहणाऱ्या लोकांसोबत एक चांगला नातेसंबंध राखण्याची आपली इच्छा आहे. यासाठी आपण त्यांचे हक्क आणि भावना यांचा विचार करतो तसेच त्यांची कदर करतो हे दाखवणे आवश्यक आहे.
२ यहोवाच्या साक्षीदारांना शिष्टाचारासाठी ओळखले जाते. शेजारीपाजारी, शाळेत, कामाच्या ठिकाणी तसेच आपल्या संमेलनांमध्ये आपली वागणूक आणि स्वरूप यांच्या दर्जांबद्दल पुष्कळशी अनुकूल मते मिळाली आहेत.—जून १५, १९८९, टेहळणी रुज नियतकालिकाचे पृष्ठ २० पाहा.
३ अर्थात चांगल्या वर्तणूकीत, प्रामाणिकपणा, मेहनतीपणा आणि योग्य नीती अशा पुष्कळ गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये आपल्या राज्य सभागृहाच्या आसपासच्या रहिवाश्यांना आदर दाखवणे याचा देखील समावेश होतो. आपल्या शेजाऱ्यांचा विचार न केल्यास, इतर बाबींमधील आपल्या ईश्वरी आचरणाकडे दुर्लक्ष केले जाईल. पौलाने “सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा” असे आर्जवले.—फिलिप्पै. १:२७.
४ सभांना उपस्थित राहणाऱ्यांनी इतरांचा विचार न केल्याचे वाटल्यामुळे राज्य सभागृहांजवळच्या रहिवाश्यांकडून वेळोवेळी तक्रारी आल्या आहेत. बंधू आणि बहिणींनी राज्य सभागृहाच्या समोरील फुटपाथवर गोळा होऊन जवळपास असणाऱ्या इतरांच्या घरांमध्ये ऐकू जातील अशी चैतन्यपूर्ण संभाषणे करण्याची टाळावीत. राज्य सभागृहात मुलांना आत-बाहेर पळण्याची अनुमती देऊ नये. अविचारीपणाने कारचे दरवाजे आपटल्याने किंवा स्कूटरचे हॉर्न वाजवल्याने शेजारच्या लोकांना त्रास होऊ शकतो. अशाप्रकारच्या आचरणाचा मंडळीवर प्रतिकूल प्रभाव पडतो. तसेच, आपण वाहतूकीचे सर्व नियम पाळावेत हे देखील महत्त्वाचे आहे.—रोम. १३:१, २, ५.
५ अशाचप्रकारच्या तक्रारी वाहने उभी करण्याच्या बाबतीतही केल्या गेल्या आहेत. खाजगी मालमत्ता किंवा वाहतूकीला किंवा घरांमध्ये आणि दुकानांमध्ये प्रवेश करण्यास अडथळा होईल अशा ठिकाणांमध्ये कार्स, स्कूटर्स किंवा सायकली देखील उभ्या केल्या जाऊ नयेत. जवळपासच्या व्यापारी स्थापनांनी आपल्या गिऱ्हाईकांसाठी वाहने उभी करण्यास जागा राखून ठेवली असल्यास त्यांच्या अनुमतीशिवाय ती वापरण्यात येऊ नये. तीन किंवा चार मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेथे वास्तविकपणे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सभा योजल्या जातात आणि यासाठी वडिलांच्या वर्गांमध्ये एकजूटीचे सहकार्य असणे आवश्यक आहे.—टेहळणी बुरुज, ऑक्टोबर १, १९८८, पृष्ठ १७, परिच्छेद १३ पाहा.
६ बायबल आपल्याला, “सर्व देवाच्या गौरवासाठी” करण्यास आर्जवते आणि त्यामध्ये इतरांचा विचार करणे हे देखील समाविष्ट आहे. (१ करिंथ. १०:३१-३३) ‘दुसऱ्याचेही हित पाहिले,’ तर आपण अविचारीपणाने त्यांच्या जागेत प्रवेश करणार नाही. (फिलिप्पै. २:४) आपण स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यापारविषयक कार्यांमध्ये पडण्याचेही टाळू.
७ इतरांचा विचार करणे—मंडळीच्या आत तसेच बाहेर—आपल्या अंतःकरणांमध्ये आपल्याला जे वाटते त्याचे एक उघड वक्तव्य आहे. आपण जे करतो आणि म्हणतो त्यावरून आपण “शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति” करतो हे प्रदर्शित झाले पाहिजे.—मत्त. ७:१२; २२:३९.