ऑगस्टसाठी सेवा सभा
ऑगस्ट १ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १५९ (६७)
१५ मि:स्थानिक घोषणा व आमची राज्य वा यातील समर्पक घोषणा. या सप्ताहांती क्षेत्र सेवेत ठळकपणे दाखवू शकाल अशा चालू नियतकालिकांतील बोलक्या मुद्यांचे प्रात्यक्षिक दाखवा.
१५ मि:“सकारात्मक मनोवृत्ती राखा.” प्रश्नोत्तरे. पायनियर किंवा दीर्घ काळापासून प्रचारक असणाऱ्यांची संक्षिप्त मुलाखत. क्षेत्रात भावनाशून्यता किंवा प्रतिकार असताना देखील सकारात्मक मनोवृत्ती राखणे कसे शक्य झाले याबद्दल ते सांगतील.
१५ मि:“माहितीपत्रके—सेवेसाठी उपयुक्त साधने.” श्रोत्यांशी चर्चा करा. सुचवलेल्या प्रस्तुतींची चांगली तयारी केलेली दोन प्रात्यक्षिके दाखवा. ऑगस्टमध्ये सादर केल्या जाणाऱ्या काही माहितीपत्रकांना दाखवा. या आठवडी सेवेत उपयोग करण्यासाठी काही प्रती घेण्याची श्रोत्यांना आठवण करून द्या.
गीत १४२ (९३) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट ८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१६ (४९)
१० मि:स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त.
१५ मि:“तुमच्या बांधवांना चांगल्या रीतीने जाणा.” प्रश्नोत्तरे. श्रोत्यांपैकी काही, परिच्छेद ६ मधील सूचनेचा अवलंब करून इतरांशी चांगल्या रीतीने परिचित कसे होऊ शकले याबद्दल संक्षिप्त अनुभव सांगण्यासाठी त्यांना आमंत्रण द्या.
२० मि:अधिक अनौपचारिक साक्षकार्य करणे. तीन किंवा चार प्रचारकांचा गट त्यांच्या या कार्यातील सहभाग कसा वाढवावा याबद्दल चर्चा करतात. ऑक्टोबर १५, १९८७, चे वॉचटावर, पृष्ठे २२-७, याचा उपयोग करून, इतरांनी काय केले याची उजळणी ते करतात व अशाप्रकारचे अधिक कार्य करण्यासाठी ते कशी योजना करतात यावर बोलतात. श्रोते सेवेच्या या पैलूत कसा सहभाग घेऊ शकतात यावर विचार करण्यासाठी संचालक त्यांना उत्तेजन देतात.
गीत १८२ (९७) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट १५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६६ (९०)
५ मि:स्थानिक घोषणा, तसेच जमाखर्च अहवाल व देणगीच्या पोचपावतीचाही समावेश करा.
१५ मि:“पुनर्भेटींमध्ये आस्था वाढवणे.” श्रोत्यांशी चर्चा करा. ३-मिनिटांच्या दोन प्रात्यक्षिकांचा समावेश करून पुनर्भेटी करण्यासाठी प्रस्तुतींचा उपयोग कसा केला जाऊ शकतो हे दाखवा. पवित्र शास्त्राभ्यास सुरु करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्या.
२५ मि:“सुव्यवस्थित नित्यक्रमात प्रगतीशीलपणे चालत राहा.” प्रश्नोत्तरे.
गीत ९६ (१३) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २२ ने सुरु होणारा सप्ताह
गीत २१८ (१९)
१० मि:स्थानिक घोषणा.
२० मि:मी देवाजवळ कसा जाऊ शकतो? प्रात्यक्षिक. पालक, तरुण लक विचारतात (इंग्रजी) अध्याय ३९ मधील साहित्याची चर्चा किशोरावस्थेतील मुलांशी करतात. पृष्ठे ३१५-१८ वरील “पब्लिक्ली डिक्लॅरींग युवर फ्रेंडशीप वीथ गॉड,” हे उपशिर्षक पूर्ण करा. दारोदारी जाताना मुलांना लाज वाटते; सभा पुनरावृत्ती आहेत व वारंवार असतात अशी तक्रार ते करतात. पालक त्यांच्याशी याविषयी दयाळुपणे कारणमीमांसा करतात. यहोवासोबत एक चांगला नातेसंबंध राखण्यासाठी या कार्यहालचाली आवश्यक आहेत हे दाखवणाऱ्या शास्त्रवचनीय तत्त्वांकडे ते निर्देश करतात.
१५ मि:स्थानिक गरजा. अथवा जुलै १, १९९१ वॉचटावर नियतकालिकाच्या इंग्रजी आवृत्तीच्या पृष्ठे २८-३० वरील, “इंटेन्स्ली ऑक्युपाईड वीथ द गूड न्यूझ्” या लेखावर भाषण द्या. हाच लेख टेहळणी रुज नियतकालिकाच्या प्रादेशिक भाषेतील एप्रिल १, १९९२ अंकाच्या मासिक आवृत्तींमध्ये आला आहे.
गीत १८४ (३६) व समाप्तीची प्रार्थना.
ऑगस्ट २९ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९९ (१०५)
१३ मि:स्थानिक घोषणा. सप्ताहांतासाठी क्षेत्र सेवेच्या व्यवस्थेबद्दल सांगा. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये जे साहाय्यक पायनियरींग करू शकले किंवा त्यांचे कार्य अधिक वाढवू शकले अशा एक किंवा दोन प्रचारकांची मुलाखत घ्या. त्यांनी अनुभवलेल्या काही आनंददायक अनुभवांचे कथन करा.
१५ मि:“तुम्ही पुन्हा तो पायनियरचा हुद्दा मिळवू शकता का?” श्रोत्यांशी चर्चा करा. एखाद्याला पायनियर सेवेत पुन्हा दाखल होण्यास कसे शक्य झाले किंवा एखाद्या कौटुंबिक सदस्याला या विशेषाधिकाराचा फायदा घेण्यास त्या कुटुंबाने कसा सहयोग केला हे दाखवणाऱ्या स्थानिक अनुभवांचा समावेश करा.
१७ मि:सप्टेंबरमध्ये अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सादर करा. या पुस्तकाचे वाटप करण्यासाठी उत्साहदायक प्रयत्नांना उत्तेजन द्या व सप्टेंबरमध्ये अभ्यास सुरू करा. ते १९८२ मध्ये प्रकाशित केले गेले व तेव्हापासून पवित्र शास्त्राभ्यास चालवण्यासाठी प्रमुख साधन या नात्याने उपयोगात आणले गेले आहे. प्रांतीय अधिवेशनांमध्ये प्रकाशित झालेल्या प्रतींवर हा संदेश होता: “आम्हाला जी आशा आहे तिची सहभागिता इतर पुष्कळांनीही करावी यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे अगदी तीच या पुस्तकात आहे. . . . नवोदितांना यहोवाला त्यांचे जीवन समर्पित करण्यासाठी व त्याची स्वीकारयोग्य पद्धतीने सेवा करण्यासाठी जी महत्त्वपूर्ण पवित्र शास्त्रीय सत्ये समजली पाहिजेत ती यात आहेत.” १९८३ मध्ये २६,५२,३२३ ते १९९३ मध्ये ४७,०९,८८९ एवढ्या प्रचारकांच्या वाढीचे परिणाम दाखवले आहेत. या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे काहींनी सत्य कसे शिकले किंवा इतरांसोबत त्याचा अभ्यास करून त्यांची मदत कशी केली हे कथित करण्यासाठी काही व्यक्तींना आमंत्रण द्या. वेळ अनुमती देईल त्याप्रमाणे, पुस्तकाची इतर वैशिष्ट्ये दाखवा जी सादर करताना ठळकपणे दाखवली जाऊ शकतात.
गीत १६१ (११०) व समाप्तीची प्रार्थना.