पुरवणीच्या रुपात प्रशाला मार्गदर्शक पुस्तक
कन्नड, मराठी आणि तेलगू आमची राज्य सेवा आवृत्तीच्या प्रत्येकी मे, जून आणि जुलै १९९४ च्या अंकांमध्ये एक जादा पुरवणी असेल. या तिन्ही पुरवणींमध्ये, ईश्वरशासित सेवा प्रशाला मार्गदर्शक पुस्तक यातील २१-३७ अध्यायातील साहित्य असेल. ते वर उल्लेखिलेल्या तीन भाषांमध्ये भाषांतरीत केलेले असेल. या भाषांचा उपयोग करणाऱ्या बांधवांना त्या पुरवण्या जपून ठेवण्यासाठी आम्ही उत्तेजन देतो, कारण ईश्वरशासित सेवा प्रशालेच्या नेमणूकींची तयारी करण्यात त्यांची मदत करण्यास ती एक मूल्यवान वस्तू ठरेल. तसेच त्याच्यामुळे त्यांची बोलण्याची कुशलता देखील सुधारेल. विशेषकरून, ईश्वरशासित सेवा प्रशाला चालवणाऱ्या बांधवांना याच्याशी संपूर्णतः परिचित होण्यास आवडेल व ते या साहित्याचा चांगला उपयोग करतील.