वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/९४ पृ. ३
  • यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • आस्था आणखी वाढविण्यासाठी मी काय म्हणू शकतो?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
    आमची राज्य सेवा—२००६
  • प्रकटीकरणाचा कळस पुस्तकाचा पुन्हा अभ्यास करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • तरुणांना ‘आता, त्यांच्या महान निर्माणकर्त्याला स्मरण्यास मदत करणे’
    आमची राज्य सेवा—१९९५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ३/९४ पृ. ३

यहोवाच्या सेवेत आनंद मिळवणे

ईश्‍वरी प्रेरणेने लिहिल्यामुळे, यशयाने योग्यपणे देवाच्या लोकांविषयी भविष्यवाणी केली, “पाहा, माझे सेवक हृदयाच्या [चांगल्या स्थितीमुळे] हर्षाने गायन करतील.” (यश. ६५:१४, प. रमाबाई भाषांतर) पुष्कळ जण असे विचारू शकतील, एखाद्याला दर दिवसाच्या इतक्या दबावांचा आणि समस्यांचा सामना करावा लागत असताना मी कसा हर्षित होऊ शकतो? आम्ही सामना करत असलेल्या आर्थिक, भावनिक आणि इतर शारीरिक समस्यांशिवाय, ख्रिस्ती उपासना आणि सेवेची जबाबदारी देखील आहे. पुष्कळ जण आश्‍चर्य करतात की, या सर्व जबाबदाऱ्‍यांचा आणि आधुनिक जीवनाच्या ओझ्याचा सामना करण्याचा प्रयत्न करत असताना ते आनंदित कसे राहू शकतील.

२ तुम्ही याकडे लक्ष दिले का की, यशयाचे प्रेरित शब्द म्हणतात की, “हृदयाच्या [चांगल्या स्थितीमुळे],” आमच्या जीवनात हर्ष उत्तेजित झाला आहे? हर्ष हा भौतिक मालमत्तेवर, मनोरंजनावर किंवा स्वातंत्र्यावर अवलंबून आहे, याला पाठिंबा देणाऱ्‍या जगाच्या तत्त्वज्ञानाच्या हे विपरीत आहे. खरा हर्ष लाक्षणिक हृदयातून, किंवा आंतरिक व्यक्‍तीद्वारे मिळतो, जो स्वतःला आपले कार्य, इच्छा, स्नेहभाव आणि भावना यातून प्रकट करतो. हर्ष काय आहे? त्याचे वर्णन असे केले आहे: “चांगली गोष्ट मिळवल्याने किंवा अपेक्षिल्याने उत्तेजित झालेली भावना; आनंदाची स्थिती; अत्यानंद.” (सूक्ष्म दृष्टी [इंग्रजी], खंड २, पृष्ठ ११९) वेगाने नजीक येणाऱ्‍या नव्या जगाचा भावनिक आनंद आम्हास वाटू नये का? परंतु, तुम्ही विचाराल, आमच्या जीवनावर सतत कबजा करणाऱ्‍या समस्या असताना देखील आम्ही आता, ‘आनंदाची स्थिती’ कशी मिळवू शकतो?

३ जीवनाच्या सर्व समस्या संपूर्णपणे काढून टाकणे अशक्य आहे. केवळ नवीन जगच आम्हाला समस्यांतून मुक्‍त असे जीवन जगण्यास अनुमती देईल. परंतु आमच्या जीवनात हर्ष वाढवण्यासाठी आम्ही काही पावले उचलू शकतो. यहोवाला ‘धन्यवादित देव,’ असे वर्णिले आहे. (१ तीम. १:११) याकोब ४:८ मध्ये दिलेल्या उत्तेजनाचा अवलंब करून आपण आपला हर्ष वाढवू शकतो का? ते म्हणते: “देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.” आम्ही प्रार्थनेद्वारे, त्याच्या वचनाचे वाचन आणि व्यक्‍तिगत अभ्यास करण्याद्वारे आणि त्याची इच्छा आचरण्याद्वारे देवाजवळ येतो. याच गोष्टीमुळे येशूला आनंद मिळाला. त्याने त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची तुलना एखाद्या आवडत्या भोजनाशी केली. (योहान ४:३४) तुम्ही देखील अशाचप्रकारे तुमचा हर्ष वाढवू शकता का?

४ एप्रिल, अधिक हर्षाचा समय: सर्व मंडळ्या एप्रिलला, आनंददायक आध्यात्मिक कार्याचा महिना बनवण्याची योजना करत आहेत. आमच्या कार्याच्या तीन पैलूंवर विशेष जोर दिला जाईल. (१) आम्ही सर्वांना साहाय्यक पायनियरींगबद्दल गंभीरतेने विचार करण्यास उत्तेजन देतो; (२) नवीन पवित्र शास्त्र अभ्यास सुरू करण्याच्या ध्येयावर जोर दिला जाईल; आणि (३) तुम्हाला खास नियतकालिक दिवसात सहभाग घेण्यास उत्तेजन दिले जाते. त्या दिवशी, आपले कार्य मुख्यत्वेकरून रस्त्यावर केले जाईल. कदाचित, सेवेच्या या पैलूंमध्ये भाग घेण्याचा आनंद तुम्ही कधीच अनुभवला नसेल. या व्यवस्थांना पूर्ण हृदयाने पाठिंबा देऊन एप्रिलमध्ये तुमचा हर्ष वाढवण्यासाठी आताच योजना करा.

५ साहाय्यक पायनियरींग: तुमच्या शक्यतेपलिकडील गोष्ट आहे असे समजून हे कार्य घाईघाईने नाकारण्याआधी, त्यामुळे तुमच्या जीवनात येणाऱ्‍या आनंदाचा विचार करा. येशूच्या शिष्यांना सुवार्तेचा प्रचार केल्यामुळे जो आनंद मिळाला त्यावर क्षणभर मनन करा. या कार्यात प्रथम गोवलेले काही जण येशूकडे आनंदाने परतले. ‘नंतर ते बहात्तर जण आनंदाने परत आले.’ (लूक १०:१७) ते त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेबद्दल कोणतीही काळजी न करता सत्याची घोषणा करावयास बाहेर गेले. त्यांची अंतःकरणे, येशूकडून शिकलेल्या चांगल्या गोष्टींनी भरली होती, आणि या गोष्टी इतरांना सांगण्यास ते आतुर होते. ते ज्यांच्याशी बोलले त्यांच्यापैकी पुष्कळांकडून वाईट अनुभव व आस्थेचा अभाव दिसल्यामुळे त्यांचा आनंद हिरमुसला गेला नाही. या प्रकारे देवाची सेवा करण्याकडील त्यांच्या चांगल्या मनोवृत्तीने तो जिवंत ठेवला गेला व त्यांना याची जाणीव होती की, ते देवाचे हृदय आनंदित करत होते.—नीती. २७:११.

६ देव वचनातील चांगल्या गोष्टींची जाहीर घोषणा करण्यासाठी, जे उभारणीकारक व जीवन बचावणारे आहे ते इतरांना मोफत देण्याची गरज आहे. यामुळे आनंद मिळतो कारण इतरांना चांगल्या गोष्टी देण्यात आनंद आहे. प्रेषित पौल ख्रिस्ती सेवेबद्दल बोलत होता तेव्हा, त्याने याच तत्त्वाकडे अंगुली दर्शवली. “सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की, तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना साहाय्य करावे, आणि घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे असे जे वचन प्रभु येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी.” (प्रे. कृत्ये २०:३५) पौल आणि त्याच्या सोबत्यांना, इतरांना चांगल्या गोष्टी देण्यात जसा आनंद मिळाला त्याचप्रमाणे, यहोवा देवाची सेवा करणारे, तीच चांगली मानसिक मनोवृत्ती राखून त्याच उभारणी करणाऱ्‍या कार्यात आनंद मिळवू शकतात.

७ अधिक क्षेत्र कार्य करून तुम्ही एप्रिलमध्ये तुमचा हर्ष वाढवण्याची योजना करू शकता का? तुमच्या मनात नकारात्मक गोष्टींना येऊ देऊ नका, जसे की: आमचे क्षेत्र आधीच चांगल्या रितीने पूर्ण केले आहे आणि प्रतिसाद इतका उत्तेजनदायक नाही; मला माझ्या मोकळ्या वेळेचा आणि कदाचित आरामाचा त्याग करावा लागेल; मला माझ्या आराखड्यात काही स्व-त्यागाचे बदल करावे लागतील. होय, तुमच्या आध्यात्मिक आरोग्यासाठी अनावश्‍यक अशा गोष्टींना तुम्हाला कमी करावे लागेल. परंतु केवळ नकारात्मक गोष्टींचा विचार करण्याऐवजी, अधिक क्षेत्र कार्य केल्याने मिळणाऱ्‍या आनंदाचा गंभीर विचार करा. लक्षात ठेवा की हर्ष, “हृदयाच्या [चांगल्या स्थितीमुळे]” मिळतो. (यश. ६५:१४) यहोवाला संतुष्ट करण्यासाठी आणि दुसऱ्‍यांसाठी, तुम्ही स्वतःला उपयोगात आणणार आहात या गोष्टीमुळे, तुमच्या लाक्षणिक अंतःकरणाला, खोल समाधानाची भावना प्राप्त होते जी तुमच्या सबंध जीवनात आनंद पसरवते.

८ तुम्हाला, देव वचनातून शिकलेल्या गोष्टी इतरांना सांगणे शक्य नाही अशा गृहीत धरलेल्या कोणत्याही क्षमतेच्या अभावाला, एप्रिलमध्ये साहाय्यक पायनियरींग करण्यासाठी तुम्हावर प्रतिबंध घालण्यास वाव देऊ नका. असे केल्याने, तुम्ही अशा मानसिक मनोवृत्तीस निर्माण कराल जी, त्याची सेवा केल्याने तुम्हाला मिळणारा आनंद लुबाडेल. तुमच्या बोलण्याच्या क्षमतेची तुलना, बोलण्यात प्रवीण असणाऱ्‍या बांधवाशी करू नका. त्याऐवजी, त्याची तुलना सेवेत तुम्हाला मिळणाऱ्‍या लोकांशी करा जे ख्रिस्ती असण्याचा दावा करतात, पण स्वतः देवाचे सत्य बोलू शकत नाहीत आणि इतरांना सांगत नाहीत. तुमच्या क्षमतेचा उपयोग करा आणि तिला सुधारण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की, देवाने त्याच्या उद्देशांची घोषणा करण्यासाठी, जगाच्या सुज्ञ लोकांना किंवा मोठमोठ्या धार्मिक वक्‍तृत्वपूर्ण भाषण देणाऱ्‍यांना निवडलेले नाही तर, ज्यांच्याकडे विशेष बोलण्याची क्षमता नाही अशा नम्र जणांना निवडले आहे. (१ करिं. १:२६-२९) येशूच्या दिवसात, त्याचे शिष्य ज्यांना सेवेतून इतका आनंद मिळाला होता ते, मासे धरणारे सर्वसामान्य मनुष्य होते. योग्य मानसिक मनोवृत्ती ठेवल्याने, यहोवाची सेवा करण्याचा आनंद तुम्हाला लाभू शकेल.

९ तुम्ही आता कोणती पावले उचलू शकता? प्रथम, प्रामाणिकपणे आणि प्रार्थनापूर्वकतेने तुमच्या परिस्थितींचे परीक्षण करा. तुम्ही ख्रिस्ती कुटुंबाचा भाग आहात तर, पतीच्या किंवा पित्याच्या पुढाकाराने ती गोष्ट एकत्र मिळून करण्याची तुमची इच्छा असेल. तुमच्यासाठी हे सर्वात कठीण पाऊल असेल. राज्य आस्था प्रथम स्थानी ठेवण्याच्या दृष्टिकोनाने, आपल्या जीवन पद्धतीचे सिंहावलोकन करण्यासाठी धैर्याची गरज आहे. देवाची सेवा वाढवण्यासाठी, अनावश्‍यक कार्यहालचाली, मग त्या आनंददायक असल्या तरी, त्यांना काढून टाकण्यासाठी आध्यात्मिक अविचल धैर्याची गरज आहे. देवाची सेवा करण्यात बदल करण्याच्या इच्छेमुळे आम्हाला आनंद हे प्रतिफळ मिळते. सक्रिय पद्धतीने यहोवाची सेवा करण्याच्या संधीचा उपयोग करण्यामुळे कोणता परिणाम झाला तो, १ इतिहास २९:९ येथे नोंदवला आहे. “त्या समयी लोकांस फार हर्ष झाला, कारण त्यांनी प्रसन्‍न होऊन खऱ्‍या मनाने व स्वेच्छेने परमेश्‍वराप्रीत्यर्थ ती अर्पण केली होती; दावीद राजासही मोठा हर्ष झाला.” एप्रिलमध्ये यहोवाच्या हर्षाचा अनुभव घेण्याची योजना करा.

१० एप्रिलमध्ये, मंडळी संध्याकाळचे साक्षकार्य आणि मध्य सप्ताहाच्या साक्षकार्यासोबत काही खास क्षेत्र सेवेची व्यवस्था करत असेल. तुम्ही क्षेत्र सेवेच्या सभांना उपस्थित राहिल्याने ते, इतरांसाठी एक उत्तेजन असेल. क्षेत्र सेवेच्या व्यवस्था तुमच्या आराखड्याशी जुळत नसतील तर, वडिलांशी बोलणी करा आणि तुम्ही क्षेत्र सेवेसाठी उपलब्ध असाल त्यावेळी इतरांनी तुम्हासोबत जावे म्हणून व्यवस्था करणे शक्य असेल.

११ प्रामाणिकपणे आणि प्रार्थनापूर्वकतेने तुमच्या परिस्थितीचे मूल्यमापन केल्यावर तुम्हाला साहाय्यक पायनियर या नात्याने सेवेत ६० तास खर्च करणे अशक्य आहे असे वाटले तर, निराशीत होऊ नका. इतरांना पायनियरींग करण्यास उत्तेजन देऊन आणि मग व्यावहारिक पद्धतींनी त्यांना पाठिंबा देऊन, महिन्याच्या त्या आवेशात सहभागी व्हा. कदाचित तुम्ही तुमचे कार्य काही प्रमाणात तरी वाढवाल आणि याद्वारे एक चांगले उदाहरण मांडाल. पूर्ण हृदयाने केलेल्या सेवेबद्दल यहोवा संतुष्ट आहे. पुष्कळांना शारीरिक किंवा इतर काही मर्यादा असतात, ज्यामुळे त्यांना पाहिजे तितके करण्यासाठी वाव दिला जात नाही. पूर्ण मनाने त्याची सेवा प्रामाणिकपणे केल्यामुळे, या लोकांना, यहोवाला आनंदित केल्याचे समाधान वाटते.

१२ पवित्र शास्त्राभ्यास सुरू केल्याने अधिक हर्ष प्राप्त होतो: राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराची कामगिरी करण्याच्या आज्ञेचे पालन करणे हर्षाचे आहे तरी, शिष्य बनवणारे होतात त्यांना अधिक हर्ष प्राप्त होतो. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) जेव्हा येशूने इतरांना शिष्य बनवण्याची आताची सुप्रसिद्ध आज्ञा दिली तेव्हा, तो पाचशे पुरुषांशी, स्त्रियांशी आणि मुलांशी बोलत होता. तीच जबाबदारी, आजच्या त्याच्या ख्रिस्ती शिष्यांच्या मोठ्या समुदायावर आहे.

१३ याचा आमच्या प्रचार कार्यावर काय परिणाम व्हावा? घरोघरचा आणि जाहीर प्रचार करण्याच्या एका महत्त्वपूर्ण कारणाचे गुणग्रहण करण्यास ते आमची मदत करते. जगाच्या येणाऱ्‍या नाशाचा ईशारा देण्याशिवाय, मेंढरासमान व्यक्‍तींना शोधणे आणि ख्रिस्ताला आज्ञाधारक होणाऱ्‍या शिष्यांना एक निश्‍चित आशा असल्याचे शिकवणे हा देखील आमचा हेतू आहे. देवाचा सहकारी होणे आणि एखादा, यहोवाचा सक्रिय सेवक बनूपर्यंत त्याला आध्यात्मिकरित्या वाढताना पाहणे किती आनंददायक आहे.—१ करिं. ३:६-९.

१४ आम्ही नाममात्र सेवेने संतुष्ट असलो तर, अशा आनंदाचा अनुभव कधीच येणार नाही. नाममात्र सेवा यहोवाला अमान्य आहे. त्याला अर्पिलेल्या प्रेमळ हृदयातून ती येत नाही, तसेच ती एखाद्याच्या शेजाऱ्‍याबद्दल देखील प्रेमळ आस्था दाखवत नाही. नाममात्र सेवा दोन मार्गाने प्रकट होते. एखाद्याला त्याच्या सेवेत कमी आनंद मिळतो आणि त्यासाठी तो कमी सेवा करण्यातच समाधानी असतो व आस्था उत्पन्‍न करण्यासाठी थोडी इच्छा दाखवतो. अशी ही मनोवृत्ती, १ तीमथ्य २:३, ४ मधील पौलाच्या शब्दांच्या अगदी विरुद्धतेत आहेत, “हे आपला तारणारा देव ह्‍याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची इच्छा अशी आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.”

१५ इतरांचे तारण व्हावे म्हणून, सत्याच्या ज्ञानाप्रत पोहंचण्यासाठी त्यांची मदत करून यहोवाच्या इच्छेच्या अनुरुप कार्य करण्याची आमची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी आम्ही एप्रिलमध्ये काय करू शकतो? पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्याचे ध्येय ठेवा! तुम्ही ज्यांच्याशी सत्याची सहभागिता केली आहे म्हणजेच, कामाच्या ठिकाणी, शाळेत, शेजारी, नातेवाईक किंवा इतरजण, यांचा विचार करा. त्यांच्यासोबत पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्याच्या ध्येयासाठी तुम्ही खरोखरीच विशेष परिश्रम घेतले आहेत का की, केवळ सुखावह संभाषण करण्यातच तुमचे समाधान झाले? शिष्य बनवण्याचा दृष्टिकोन ठेवून सत्य शिकवण्याचा एकच प्रभावकारी मार्ग म्हणजे गृह पवित्र शास्त्राभ्यास चालवणे होय.

१६ दारोदारीच्या कार्यात गुंतलेले असताना, हे ध्येय आम्ही मनात कसे ठेवू शकतो? तुमच्या प्रार्थनेद्वारे, यहोवाला हे समजू द्या की, मेंढरासमान व्यक्‍तींना शोधून काढण्याची तुमची उत्कट इच्छा आहे आणि पवित्र शास्त्राभ्यास चालवण्याद्वारे त्यांना सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचण्यात मदत करण्याची इच्छा आहे. तुम्ही साहित्य दिले असले किंवा नसले तरी, दाखवलेल्या सर्व आस्थेचा मागोवा घ्या. पहिल्याच भेटीत, पुढील पुनर्भेटीसाठी उत्तर न दिलेला प्रश्‍न यासारखा एखादा भक्कम पाया घालण्याची खात्री ठेवा. शक्य असल्यास, आठवड्यात नव्हे तर काही दिवसातच ती पुनर्भेट करा. पुनर्भेटी करण्यात आणि पवित्र शास्त्राभ्यास चालवण्यात यशस्वी असणाऱ्‍यांकडून मदत घ्या. यहोवाच्या आशीर्वादासाठी मागत राहा.—मत्त. ७:७-११.

१७ खास नियतकालिक दिवसाचा आनंद: शनिवार, एप्रिल १६, १९९४ हा संपूर्ण भारतामध्ये खास नियतकालिक दिवस असेल, व त्यावेळी रस्त्यावरील कार्यावर जोर दिला जाईल. तुमचे वडील तुमच्या मंडळीच्या व्यवस्थेची घोषणा करतील. तो पूर्ण कार्याचा दिवस असेल व सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी क्षेत्र सेवेच्या सभा ठेवल्या जातील. शक्य असेल तर, यापैकीच्या एका गटाचे, कदाचित सकाळच्या गटाचे कार्य, मिळून केलेला एक प्रयत्न असेल जेथे मंडळीतील सर्वांना एकाच ठिकाणी निमंत्रण दिले जाते. या खास दिवशी मंडळीतील सर्वांना क्षेत्रात काही वेळ खर्च करण्यास शक्य झाले तर, त्यामुळे किती आनंद मिळेल.

१८ वडिलजन या खास दिवशी, रस्त्यावरील कार्यासाठी खास व्यवस्था करतील. ज्या मंडळ्यांकडे रस्त्यावरील कार्य करण्यासाठी मर्यादित जागा असेल ते, लोक जमतात अशा बागा, किनाऱ्‍यांवर किंवा तुमच्या क्षेत्रातील क्वचितच साक्ष दिलेले भाग अशा इतर ठिकाणी साक्ष देण्याची योजना करू शकतात. लोकांकडे जाताना चतुर असा आणि क्रोधिष्ट चर्चा करण्याचे टाळा. आम्हाला रोमकर १२:१८ मध्ये सांगितले जाते: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”

१९ रस्त्यावरील कार्य करताना हर्ष राखला जाऊ शकतो का? सेवेच्या या पैलूविषयी तुमच्या मनात कोणती कल्पित गोष्ट किंवा “भय” असेल तर, तुम्ही काही नवीन नाहीत. सार्वजनिक ठिकाणी लोकांकडे प्रचार करण्यास जाण्यासाठी यहोवावर विश्‍वास आणि भरवसा असण्याची गरज आहे. तुम्हाला हे पाऊल उचलण्यास लाज वाटेल परंतु, तुम्ही एकदा प्रयत्न केला तर, यहोवाने त्याची इच्छा पूर्ण करण्यास तुम्हाला शक्‍ती आणि धैर्य दिले आहे हे जाणल्याने तुम्हाला आनंद मिळेल. फिलिप्पैकर ४:१३ मधील शब्दांद्वारे आम्ही सांत्वन मिळवू शकतो, जे म्हणते, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”

२० एप्रिलमध्ये तुमचा आनंद वाढवा: एप्रिल महिना असा असो जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात यशया ६५:१४ ची मोठी पूर्णता पाहू शकाल, “पाहा माझे सेवक हृदयाच्या [चांगल्या स्थितीमुळे] हर्षाने गायन करतील.” जर तुम्ही निर्माणकर्त्याची सेवा आज करू इच्छिणारे, त्याला एकनिष्ठ भक्‍ती देऊ इच्छिणारे, त्याच्या नजरेत संतुष्टकारक असणारे कार्य करू इच्छिणारे आणि त्याची मान्यता व जीवनाचे बक्षिस मिळवू इच्छिणारे आहात तर, तुम्ही त्या हर्षाचा अनुभव घेऊ शकता. यहोवा त्याच्या आत्म्याद्वारे, तुम्हामध्ये त्याच्या लोकांचे चिन्ह असणारी हृदयाची चांगली स्थिती उत्पादित करो. तुमच्या हृदयाला त्याच्या सूचनांचा स्वीकार करू द्या. त्यांना, त्याच्या सेवेसाठी तुम्हामध्ये एक योग्य मानसिक मनोवृत्ती निर्माण करू द्या. त्याच्या वचनाची सुवार्ता आणि त्याची जीवन बदलवणारी सत्ये तुम्हाला एक निराळाच हर्ष उत्पादित करण्यासाठी उत्तेजित करू द्या, जो केवळ विश्‍वाच्या महान परमेश्‍वराची सेवा केल्यानेच मिळू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा