वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/९४ पृ. २
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपण आपले उपासनेचे ठिकाण सुस्थितीत ठेवू या
    आमची राज्य सेवा—२००३
  • देवाच्या मार्गानुसार चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
आमची राज्य सेवा—१९९४
km २/९४ पृ. २

प्रश्‍न पेटी

▪ मंडळीपुढे ठराव मांडताना कोणत्या कार्यपद्धतीला अनुसरावे?

जागेची खरेदी करणे, पुनर्बांधणी किंवा राज्य सभागृह बांधणे, संस्थेला खास देणग्या पाठवणे किंवा विभागीय पर्यवेक्षकांचे खर्च भागवणे अशा महत्त्वाच्या बाबींबद्दल निर्णय घेतला जातो तेव्हा ठरावाची जरूरी असते. मंडळीचा निधी दिला जातो तेव्हा, दरवेळी ठराव प्रस्तुत करणे बहुधा उत्तम असते.

अपवाद म्हणून, प्रत्येक व्यक्‍ती जागतिक प्रचार कार्यासाठी आधीच देत असलेल्या दानाशिवाय प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम देण्यासाठी मंडळी निश्‍चय करील. तसेच, उपयुक्‍त वस्तू आणि स्वच्छतेच्या वस्तुंचा पुरवठा अशा राज्य सभागृह चालवण्यासाठी लागणाऱ्‍या सर्वसाधारण खर्चासाठी ठरावाची गरज नाही.

एखादी गरज दिसून येते तेव्हा, वडील वर्गाने त्या बाबीविषयी पूर्णपणे चर्चा करावी. काही करण्याची गरज आहे यावर बहुतांश जणांचे सहमत असेल तेव्हा, एखाद्या वडिलांनी किंवा मंडळीच्या सेवा समितीच्या कोणा सदस्याने सेवा सभेत प्रस्तुत करण्यासाठी एखादा लेखी ठराव तयार करावा.

अध्यक्ष वडिलांनी, असलेल्या गरजेविषयी आणि ती पार पाडण्यासाठी वडील वर्ग कोणत्या गोष्टीची शिफारस करतो याबद्दल थोडक्यात परंतु स्पष्टपणे समजवावे. त्यानंतर मंडळीला योग्य प्रश्‍न विचारण्यासाठी संधी दिली जाते. ती बाब कठीण असेल तर, सर्वांना विचार करण्याचा वेळ देण्यासाठी पुढील सेवा सभेपर्यंत मत घेण्यासाठी विलंब करणे उचित ठरेल. मंडळीच्या सदस्यांच्या हात उचलण्यावरून खरे मत घेतले जाते.

नगरपालिकेच्या बाबी किंवा राज्य सभागृहाच्या कर्जाच्या बाबी गोवलेल्या असतात त्या कायदेशीर गरजांनी निर्देशित केल्याशिवाय, मतदान केवळ मंडळीच्या समर्पित आणि बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्‍तींपुरतेच मर्यादित आहे. इतर मंडळीतील साक्षीदारांनी त्यात सहभाग घेणे उचित ठरणार नाही.

ठरावासाठी मान्यता मिळाल्यावर, त्यावर तारीख घालावी, सही करावी आणि मंडळीच्या फाईलमध्ये ठेवावा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा