आपल्या प्रकाशनांचे मूल्य ओळखण्यास इतरांची मदत करणे
१ “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . असे आहे.” (इब्री. ४:१२) आमची पवित्र शास्त्रावर आधारित प्रकाशने, देव वचनाच्या सामर्थ्याद्वारे लाभ मिळवण्यात लोकांची मदत करत असल्यामुळे, अनौपचारिकपणे किंवा घरोघरी भेटी देत असताना, पवित्र शास्त्राबद्दल त्यांची आस्था उत्तेजित करण्यास आम्ही त्यांचा वापर करतो.
२ देव खरोखरी आपली काळजी करतो का? असल्यास, त्याने दुःखाला परवानगी का दिली? त्याचा कधी अंत होईल का? हे माहितीपत्रक जानेवारीच्या साहित्य सादरतेसाठी आहे. हे माहितीपत्रक आता बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यांचा साठा मिळवण्याकरता मंडळ्यांना बराच वेळ मिळाला होता. ते सादर करत असताना, आपल्या अद्भुत आशेबद्दल घरमालकाला उत्साहाने सांगून त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोंचण्याचा प्रयत्न करा. ते कसे करता येईल?
३ देव काळजी करतो का? हे माहितीपत्रक सादर करणे: आज, जगातील समस्यांबद्दल ठळकपणे दाखवून देणाऱ्या किंवा जवळच्या भविष्यात पृथ्वीला तोंड द्यावे लागेल अशा वाईट परिस्थितींबद्दल दाखवून देणाऱ्या एखाद्या बातमीकडे लक्ष वेधवून तुम्ही संभाषणाची सुरवात करू शकाल.
मग असा एखादा प्रश्न विचारा:
▪“आज जग ज्या स्थितीत आहे याला देव कोणत्या दृष्टीने पाहतो असे तुम्हास वाटते? [उत्तरासाठी वाव द्या.] पृथ्वीच्या आणि मानवजातीच्या भविष्याबद्दल तो आस्था राखून आहे, तसेच तुम्हाला हे जाणण्यास आश्चर्य वाटेल का की, सध्या अस्तित्वात असणाऱ्या वाईट परिस्थितीला काढून टाकण्यासाठी तो काहीतरी करणार आहे?” घरमालकाला अनुक्रमणिका दाखवा, आणि मानवजात आता दुःख अनुभवत आहे ही गोष्ट, देव नाही किंवा देव मानवांची काळजी वाहत नाही याला पुष्टी देत नाही, हे थोडक्यात स्पष्ट करा. त्याउलट, हे समजावून सांगा की, देवाने दुःखाला काही काळासाठी अनुमती दिली असली तरी, पृथ्वीचे एक नंदनवन व्हावे आणि ती आनंदाने राहणाऱ्या तसेच दुःख व पाप यापासून मुक्त असलेल्या लोकांनी भरावी, असा त्याचा उद्देश आहे. अनुक्रमणिकेवरील चित्राकडे निर्देश करून सांगा की, अशा परिस्थिती लवकरच येतील, अशी एक विश्वसनीय आशा आम्हापाशी आहे.
४ हे माहितीपत्रक उपलब्ध नाही तेथे, किंवा जेथे अधिक योग्य असेल तेथे, जानेवारीची खास सादरता म्हणून आम्ही एखादे १९२-पानी जुने प्रकाशन सादर करणार आहोत. ती कशी सादर केली जाऊ शकतात? प्रथम, तुमच्या क्षेत्रातील प्रामाणिक मनाच्या लोकांना आवडेल असे एखादे विधान, तुम्ही उपयोगात आणणाऱ्या पुस्तकातून निवडा. त्यानंतर, तुम्ही निवडलेल्या छापील विधानाकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करण्याआधी, त्याच्यासोबत थोडक्यात चर्चा करू शकाल अशा अलिकडील घटनेचा किंवा सामान्यपणे आवडणाऱ्या विषयाचा विचार करा. कदाचित, तुमच्या विधानांना पुष्टी देण्यासाठी, तुम्ही पवित्र शास्त्रातून किंवा थेटपणे पुस्तकातून, उल्लेखिलेले किंवा दिलेले वचन वाचू शकता, आणि मग पुस्तक सादर करा. शेवटी, पुनर्भेटीसाठी पाया म्हणून, एखादा प्रश्न किंवा विचार मांडून या.
५ पुष्कळ मंडळ्यांकडे, सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? किंवा थोर शिक्षकाचे ऐका या प्रतींचा साठा आहे. ही पुस्तके उपलब्ध असल्यास, या प्रकाशनांतून संभाषणाची सुरवात करण्यास तयारी का करू नये, आणि घरमालकांना यापैकी एखादे उत्तम पुस्तक वाचण्यास उत्तेजन का देऊ नये? सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक सादर करताना, वर दिलेल्या पद्धतीचा तुम्ही उपयोग करू शकता आणि त्याद्वारे या उत्कृष्ठ पवित्र शास्त्र साधनात पूर्ण केलेल्या, कितीही पवित्र शास्त्राच्या मूळ शिकवणींची चर्चा करण्यास तयारी करू शकता.
६ कधीकधी, नियतकालिके किंवा एखादी पत्रिका सादर करणे उचित ठरेल. ही प्रकाशने वाचण्यास इतरांना प्रोत्साहन देण्यात, उत्साही आणि आवेशी असण्यास आम्हापाशी प्रत्येक कारण आहे, की जेणेकरून, देव वचनाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देऊन ते त्यांच्या जीवनात त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यास सुसज्ज असू शकतील.