घोषणा
▪ साहित्याची सादरता
डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य ४०.०० रुपयांना. जेथे हे उपलब्ध नसेल, तेथे माय बुक ऑफ बायबल स्टोरिज किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४०.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते (लहान आकाराचे अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक २०.०० रुपयांना).
जानेवारी: देव खरोखरी आपली काळजी करतो का? हे माहितीपत्रक ४.०० रुपयांना. हे उपलब्ध नसेल तेथे, १९२-पानी जुन्या पुस्तकांना प्रत्येकी ६.०० रुपयांना खास सादरतेत देऊ शकता. आमच्याकडे, या प्रकारातील खालील पुस्तके उपलब्ध आहेत: इंग्रजी: डीड मॅन गेट हिअर बाय इव्होल्यूशन ऑर बाय क्रिएशन? आणि सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? गुजराती: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते; हिंदी: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता आणि “तुझे राज्य येवो;” कन्नड: तुम्हाला आनंदी बनवील अशी सुवार्ता, “तुझे राज्य येवो” आणि थींग्स् इन व्हीच इट इज इम्पॉसिबल फॉर गॉड टू लाय;” मराठी: “तुझे राज्य येवो” आणि थोर शिक्षकाचे ऐका; तामिळ: सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? आणि “तुझे राज्य येवो;” तेलगू: सद्य जीवन एवढेच सर्वकाही आहे का? आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे. बंगाली किंवा नेपाळी बोलत असणाऱ्या लोकांना आपल्या समस्या माहितीपत्रक आणि पंजाबी माहीत असणाऱ्या लोकांना “पाहा!” माहितीपत्रक सादर केले जाऊ शकते. मल्याळममध्ये युवर युथ—गेटींग द बेस्ट आऊट ऑफ इट! हे पुस्तक १२.०० रुपयांना सादर केले जाऊ शकते. कृपया याची नोंद घ्या, की हे पुस्तक खास किंमतीत सादर करायचे नाही.
फेब्रुवारी: तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल. मोठ्या आकाराचे ४०.०० रुपयांना आणि लहान आकाराचे २०.०० रुपयांना.
मार्च: क्वशन्स् यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क (जे इंग्रजी, मल्याळम आणि तामिळमध्ये उपलब्ध आहे) पुस्तक २०.०० रुपयांना. हे उपलब्ध नसल्यास, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक ४०.०० रुपयांना (लहान आकाराचे २०.०० रुपयांना) सादर केले जाऊ शकते. शिवाय, १९२-पानी पुस्तकांची प्रत्येकी ६.०० रु. अशी खास सादरता केली जाऊ शकते.
सूचना: ज्या मंडळ्यांनी अद्याप वरील मोहिमेच्या पुस्तकांची मागणी पाठवली नाही त्यांनी त्यांच्या पुढील लिटरेचर ऑर्डर फॉर्मवर (S-14) पाठवावी.
▪ अध्यक्षीय पर्यवेक्षकांनी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणा एकाने, डिसेंबर १ रोजी किंवा त्यानंतर शक्य असेल तितक्या लवकर, मंडळीच्या जमाखर्चाची हिशेब तपासणी करावी. हे केल्यावर, मंडळीत त्याची घोषणा करा.
▪ शुक्रवार, एप्रिल १४ रोजी सूर्यास्तानंतर, १९९५ चा स्मारक विधी दिन असेल. १९९५ च्या स्मारक विधीच्या तारखेची आगाऊ सूचना यासाठी देण्यात येत आहे, जेणेकरून बांधव उपलब्ध असलेल्या सभागृहांसाठी, अशा सोयींची गरज असल्यास, आवश्यक बुकींग करू शकतील.
▪ आम्हाला द्यावयाच्या सर्व रक्कमा आकौंट पेई डिमांड ड्राफ्टने लोनावळ्याला पाठवणे. असे ड्राफ्ट पुरवणाऱ्या बँका, द स्टेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा, विजया बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे दिलेला डिमांड ड्राफ्ट त्यांच्या खंडाळ्याच्या शाखेतही स्वीकारला जाईल.
▪ आमच्याशी पत्रव्यवहार करताना, चतुर्थ कागद (८ १/२” x ११”) किंवा ए४ मापाचा कागद (८ १/४” x ११ १/२”), वापरल्यास आम्ही त्याची गुणग्राहकता बाळगू. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, वॉचटावर संस्थेचा छापील पत्ता असलेला कागद किंवा जवळजवळ त्याच्या मापाएवढाच कागद वापरण्यासाठी आम्ही तुम्हाजवळ विनंती करत आहोत. याद्वारे, विविध कागदांच्या मापामुळे फाईलमध्ये पत्रे ठेवताना जी समस्या आहे ती राहणार नाही.
▪ शिवाय, संस्थेला पोस्टाने काही पाठवत असताना, मजबूत पाकीटांचा वापर करा. मंडळ्या बहुधा, त्यांचे डिमांड ड्राफ्ट फारच पातळ कागदाच्या पाकीटांमध्ये घालून पोस्टाने पाठवतात. यामुळे ती लोनावळ्यात येऊपर्यंत त्यांची दयनीय अवस्था होते. कधीकधी तर, पाकीट देण्याआधी त्यातील सर्व गोष्टींना धाग्याने बांधून देऊन पोस्ट ऑफिसने फारच कृपा केली आहे.
▪ आणि शेवटी, तुम्ही टपाल खर्चासाठी तिकीट चिटकवल्याची तपासणी करा. आम्हाला बहुधा, कमी तिकीटे चिटकवलेली किंवा कधीकधी तिकीटे न चिटकवलेली पाकीटे मिळतात व त्यामुळे आम्हाला त्याचा दुप्पट खर्च भरावा लागतो.
▪ द वॉचटावर व अवेक! मासिकांचे १९९२ चे खंड उपलब्ध असून, आम्हाकडून त्यांची मागणी केली जाऊ शकते. अशा खंडांसाठी मंडळ्यांना ‘नियमित मागणी’ करायची असल्यास, ते ती करू शकतात. त्यामुळे, प्रत्येक वर्षी त्यासाठी पुन्हा मागणी न करता ते त्यांना मिळवू शकतील याची खात्री मिळेल.
▪ नियमन मंडळाने, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—१९९४, या पुस्तिकेला हिंदी, मराठी व नेपाळी भाषेत छापण्यासाठी मान्यता दिली आहे, हे सांगण्यास आम्हाला आनंद वाटतो. सर्व मंडळ्यांनी, त्यासाठी मागणी केली नसल्यास, ती तात्काळ करावी असे आम्हाला वाटते.
▪ पुन्हा उपलब्ध असणारी प्रकाशने:
इंग्रजी: जेहोवाज विटनेसेस इन द ट्वेंटियत सेंच्यूरी; हिंदी: जीवनात आणखी पुष्कळसे आहे.
▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:
कोंकणी आणि नेपाळी: देव खरोखरी आपली काळजी करतो का?