वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९३ पृ. ४
  • घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या नियतकालिकांचा सर्वोत्तम उपयोग करा
    आमची राज्य सेवा—१९९६
  • मिळालेल्या आस्थेकडे लक्ष द्या
    आमची राज्य सेवा—१९९३
  • तुमच्या सेवेत नियतकालिके सादर करा
    आमची राज्य सेवा—२००५
  • लोकांना विशेष आकर्षक वाटणारे लेख निवडा
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९३
km १०/९३ पृ. ४

घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे

१ अवेक! मासिकाचा उद्देश प्रत्येक अंकाच्या पान ४ वर स्पष्टरीत्या दिलेला आहे: “१९१४च्या घटना पाहणारी पीढी सरण्याआधी शांतीमय व सुरक्षित नवीन जगाचे जे अभिवचन निर्माणकर्त्याने दिलेले आहे त्यावर हे मासिक आमच्या आत्मविश्‍वासाची उभारणी करते.” खात्रीने अशाप्रकारचे मासिक आमच्या घरोघरच्या कार्यात शक्य होईल तितक्या विस्तारीतपणे वितरण करण्याच्या पात्रतेचे आहे!

२ आध्यात्मिकतेकडे कल नसलेल्या लोकांमध्ये आस्था प्रस्थापित करण्याचा चांगला मार्ग अवेक! हे मासिक आहे. प्रत्येक अंकाचे वाचन करत असता, इतरांसोबत सहभागिता करता येतील असे योग्य मुद्दे पहा. काही प्रचारक त्यांच्या वैयक्‍तिक अंकामध्ये तशी नोंद करतात, व क्षेत्र कार्यात जाण्यापूर्वी विशिष्ट विषयासंबंधी, घरमालकांसोबत सहभागिता करण्यास नोंद केलेल्या खास मुद्यांची ध्यानात ठेवण्यास उजळणी करतात.

३ आमच्या सादरतेची सुरवात अवेक!च्या अंकामध्ये चर्चिलेल्या विषयाला निर्देशित करणाऱ्‍या अभिप्रायाद्वारे आम्ही करु शकतो.

घरमालकाने आस्था दाखवल्यास, आम्ही कदाचित असे म्हणून मासिकाला सादर करू शकतो:

▪“अवेक!चा हा लेख या विषयासंबंधी सविस्तर माहिती देतो.” त्यानंतर आधीच निवडलेल्या एक अथवा दोन वाक्याचे वाचन करा, व असे म्हणा: “या विषयामध्ये तुम्ही खूप आस्थेवाईक दिसत असल्याने, या अवेक! मधील हा लेख तसेच इतर योग्य वेळेला दिलेले लेख वाचावयास तुम्हाला आवडेल का? तसे असेल तर, मला हे व याच्या सोबतचे, द वॉचटावर, हे मासिक ६.०० रु. देणगीने तुम्हास देऊन जाण्यास आवडेल.”

४ घरमालकाने स्पष्टपणे आध्यात्मिक गोष्टीतील त्याची आस्था व्यक्‍त केल्यास, शेवटल्या काळासंबंधातील जसे की, २ तीमथ्य ३:१-५ अशासारख्या शास्त्रवचनाचा उल्लेख करु शकता. तद्‌नंतर, आमच्या मासिकातील त्यांची आस्था वाढवण्यास, थेटपणे टेहळणी बुरुजच्या चालू अंकातील पान २ वरील “टेहळणी बुरुज याचा उद्देश” याने सुरु होणारा भाग वाचून दाखवू शकता. त्यानंतर, त्यांना चालू विषयाचे द वॉचटावर व अवेक! सादर करा.

५ काही क्षेत्रात लोकांना धर्मांमध्ये आस्था आहे असे दिसून आल्यास, केवळ मासिकांकडे आकर्षित करण्याऐवजी तुम्ही असे म्हणू शकता:

▪“तुमच्या परिसरातील ज्या लोकांना आम्ही भेटलो ते वेगवेगळ्या धर्मांचे जो आमच्या स्वतःच्या धर्मापेक्षा खूपच वेगळा आहे अशाचे पालन करत आहेत. मानवजातीच्या देवासंबंधीच्या शोधाने पुष्कळ निरनिराळे मार्ग बनवले आहेत. [प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७ वाचा.] देवाचा स्वतःहून शोध घेण्याऐवजी, लोक सर्वसाधारणपणे त्यांच्या पालकांच्याच धर्माचे अनुसरण करतात, याजशी तुमची सहमती आहे का? [अभिप्रायास वाव द्या.] हाच मुद्दा मॅनकाइन्डस्‌ सर्च फॉर गॉड या पुस्तकातील पहिल्या अध्यायात दिला आहे. [पान ८ परिच्छेद १२ वरील माहितीला स्पष्ट करा.] इतरांच्या धर्माबद्दल अधिक शिकणे हे ज्ञानवर्धक व शैक्षणिक आहे. हे पुस्तक जगातील बहुतेक सर्व धर्मांच्या, आरंभाविषयी, प्रथांविषयी व शिकवणींविषयी स्पष्टीकरण देते.” वेळ मुभा देत असल्यास, पुस्तकातील अध्यायांची सूची व एक किंवा दोन चित्रे घरमालकास दाखवा.

६ आम्ही घरोघरी जात असता, हे लक्षात असू द्या की, द वॉचटावर व अवेक! ही लोकांना आध्यात्मिकतेत प्रगती करावयास साहाय्यक ठरतील अशी जगातील सर्वात उत्तम प्रकारची दोन साधने आम्हाकडे आहेत. या मासिकांबद्दलच्या घरमालकांच्या आस्थेला उत्तेजित करण्यास व त्यांना प्रत्येक संधीमध्ये सादर करण्याच्या दृष्टिने आपण कार्य करु या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा