१९९४ करता ईश्वरशासित सेवा प्रशालेचा आराखडा
सूचना
१९९४ मध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाला पुढील व्यवस्थेनुरुप चालवली जाईल.
क्रमिक पुस्तके: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स [bil2], युनायटेड इन व्हर्शिप ऑफ द ओनली ट्रु गॉड [uw], “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” (१९९० ची आवृत्ती) [si], सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य [gt] आणि चर्चेसाठी पवित्रशास्त्र विषय [td], ही प्रकाशने साहित्याच्या नेमणूका देण्यासाठी वापरली जातील.
प्रशालेचा कार्यक्रम गायन, प्रार्थना व स्वागतपर अभिवादनाने सुरु होईल. त्यानंतर तो पुढील प्रकारे चालवला जाईल:
नेमणूक क्रमांक १: १५ मिनिटे. हे भाषण, वडील किंवा प्रशिक्षित सेवा सेवकांकरवी हाताळले जावे. ते युनायटेड इन व्हर्शिप ऑफ द ओनली ट्रु गॉड किंवा “ऑल स्क्रिपचर इज इन्स्पायर्ड ऑफ गॉड ॲण्ड बेनेफिशल” यावर आधारलेले असेल. ही नेमणूक १० ते १२ मिनिटाकरता बोधपर भाषण या अर्थी सादर करावी व नंतर ३ ते ५ मिनिटे पुस्तकातील प्रश्नांचा वापर करून तोंडी उजळणी घ्यावी. या मागील हेतू, केवळ साहित्य उरकण्याचा नसावा तर चर्चिल्या जात असलेल्या माहितीतील व्यावहारिक मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा व मंडळीस अत्यंत साहाय्यक ठरणारे मुद्दे ठळकपणे सामोरे मांडण्याचा असावा. आराखड्यात दिलेले शिर्षक उपयोगात आणावे. सर्वांना या साहित्याची काळजीपूर्वक पूर्वतयारी करण्याचे प्रोत्साहन दिले जाते की ज्याकरवी साहित्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळू शकेल.
या भाषणाची नेमणूक मिळालेल्या बांधवांनी वेळेमध्ये आपले भाषण संपवण्याची दक्षता घ्यावी. जरुरी भासल्यास किंवा वक्त्याने आधीच विनंती केली असल्यास, या बांधवाला खाजगी सूचना द्याव्या.
पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्दे: ६ मिनिटे. हा भाग प्रशाला पर्यवेक्षकांकरवी किंवा इतर कोणा वडिलांनी किंवा सेवा सेवकांनी हाताळावा, जे स्थानिक गरजांप्रमाणे साहित्याचा प्रभावकारीपणाने अवलंब करतील. नेमून दिलेल्या वाचनाचा तो सारांश नसावा. प्रारंभी, नेमून दिलेल्या अध्यायांचे संपूर्ण पुनरावलोकन ३० ते ६० सेकंदांपर्यंतच मर्यादित ठेवावे. माहिती आम्हास का व कशी महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्यासाठी श्रोत्यांना साहाय्य करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. यानंतर प्रशाला पर्यवेक्षक विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात पाठवतील.
भाषण क्रमांक २: ५ मिनिटे. एका बंधूला नेमून दिलेल्या भागाचे हे, पवित्र शास्त्र वाचन आहे. हे प्रशालेच्या मुख्य वर्गास तसेच उपवर्गास सुद्धा लागू आहे. ही वाचनाची नेमणूक, विद्यार्थ्याला, सुरुवातीला त्रोटक विवेचन, व समाप्तीचे विचार यात काही मुद्दे विवेचित करता येतील एवढी पुरेशी आहे. यात ऐतिहासिक पार्श्वभूमी, भविष्यवादीत किंवा तात्त्विक विषयाची अर्थसूचकता व त्यांचा अवलंब यांचा समावेश करता येईल. नेमून दिलेली सर्व शास्त्रवचने मध्यंतरी न थांबता वाचली जावीत. अर्थात, वाचण्याची वचने क्रमाने नसतील तेथे वाचन कोठून चालू राहते, ते वचन विद्यार्थी सांगू शकतो.
भाषण क्रमांक ३: ५ मिनिटे. हे भाषण भगिनींना नेमून देण्यात येईल. या भाषणाचा विषय सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकातून असेल. नियुक्ती मिळालेल्या विद्यार्थिनीस वाचता आले पाहिजे. भाषण सादर करताना ही विद्यार्थिनी बसू शकते वा उभी राहू शकते. एक मदतनीस प्रशाला पर्यवेक्षक नेमून देतील, पण अधिक मदतनीस वापरता येतील. भाषणातील दृश्य रचना, क्षेत्र कार्य किंवा अनौपचारिक साक्षकार्य याजशी संबंधीत असावी. ही दृश्य रचना, भाषण देणाऱ्याकरवी वा तिच्या मदतनिसाकरवी प्रस्तुत करता येईल. दृश्य रचनेला नव्हे तर साहित्याला प्राधान्य दिले जावे. विद्यार्थिनीने आराखड्यात दिलेल्या शिर्षकाचा वापर करावा.
भाषण क्रमांक ४: ५ मिनिटे. बंधूला किंवा भगिनीला नेमून देण्यात येईल. ते, चर्चेसाठी पवित्र शास्त्र विषय या पुस्तिकेवर आधारित असेल. जेव्हा बंधूला नेमणूक देण्यात येईल तेव्हा त्याने सबंध श्रोत्यांना ते भाषण सादर करावे. राज्य सभागृहातील उपस्थितांना विचारात घेऊन त्या बांधवाने भाषणाची तयारी करावी हे बरे, म्हणजे ऐकणाऱ्यांना ते माहितीयुक्त व लाभदायक ठरेल. तथापि, एका दुसऱ्या व्यावहारिक व सभागृहास अनुलक्षून असणाऱ्या योग्य रचनेकडे साहित्याचा कल असेल तर तो बंधू त्या पद्धतीने त्या भाषणाची तयारी करू शकेल. विद्यार्थ्याने, आराखड्यामध्ये दिलेल्या शिर्षकाचा उपयोग करावा.
हे भाषण भगिनीला नेमून दिल्यास ते तिने भाषण क्रमांक ३ च्या पद्धतीने सादर करावे.
सल्ला व शेरे: प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर, प्रशाला पर्यवेक्षक विशिष्ट प्रकारातील सल्ला देतील. याकरता कौन्सिल स्लीपवरील प्रगतीशील सूचनेसंबंधाने दाखवण्यात आलेला अनुक्रम पाळण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी विद्यार्थ्याने कोणत्या क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे त्याकडे त्यांनी लक्ष देण्यास हवे. विद्यार्थी वक्ता “जी” या शेऱ्यास पात्र आहे व स्पीच कौन्सिलवर इतर कोणत्याही गुणावर “आय” किंवा “डब्ल्यू” असा निर्देश नाही तर ज्या गुणावर पुढील भाषणाबाबत विद्यार्थ्याने तयारी करावी असे प्रशाला पर्यवेक्षकास वाटते तेथील चौकोनावर त्याने आळे करावे. ही माहिती ते त्या विद्यार्थ्याला त्या सायंकाळी देतीलच व त्यासोबत पुढल्या वेळी विद्यार्थ्याला थिओक्रॅटिक मिनिस्ट्री स्कूल असायन्मेंट स्लीप (एस–८९) वर जी नेमणूक ते देतील त्यावेळीही हाच गुण तयारीकरता दर्शवितील. भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिल्या रांगेत बसावे. याद्वारे एकतर वेळ वाचेल व प्रशाला पर्यवेक्षकांनाही त्यांना थेट सूचना देण्यासाठी सोईचे होईल. तोंडी सूचना देऊन झाल्यावर वेळ मुभा देईल त्याप्रमाणे सल्लागारास, विद्यार्थ्याने आपल्या भाषणात साहित्याच्या ज्या माहितीयुक्त व व्यावहारिक मुद्यांचा समावेश केला नव्हता त्यावर विवेचन मांडता येईल. प्रत्येक विद्यार्थी भाषणानंतर सल्ला व शेरा देण्यासाठी प्रशाला पर्यवेक्षकांनी केवळ दोनच मिनिटे वापरण्याची दक्षता घ्यावी. पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्यात काही विशिष्ट असे सांगायचे राहून गेले असल्यास याविषयीची सूचना त्या बंधूस खाजगी रितीने देण्यात यावी.
भाषणाची तयारी: भाषण देण्याआधी विद्यार्थ्याने, तो ज्या भाषणशैलीच्या गुणावर काम करत आहे त्याविषयी स्कूल गाईड पुस्तकामध्ये असलेले साहित्य काळजीपूर्वकतेने वाचावे. दुसरे भाषण मिळालेल्या विद्यार्थ्याने असा विषय निवडावा की, ज्याकरवी नेमलेल्या साहित्याचा एकंदर उरक त्यामध्ये येऊ शकेल. इतर भाषणे आराखड्यात दाखवलेल्या विषयाचा वापर करून तयार केली जातील.
वेळ: कोणतेही भाषण वेळेच्याबाहेर जाऊ देऊ नये. तसेच सल्लागाराने दिलेला सल्ला व शेराही वेळेच्या आत असावा. भाषण क्रमांक २ ते ४ ची वेळ झाली म्हणजे ते कुशलतेने थांबवावे. ज्या बांधवाला “थांबण्याचा संकेत” करण्यासाठी नेमले आहे, त्यानेही तो तत्परतेने करावा. नेमणूक क्रमांक १ व पवित्र शास्त्र वाचनातील ठळक मुद्दे हाताळताना हे बांधव वेळेच्याबाहेर गेल्यास त्यांना खाजगी सूचना देण्यात यावी. सर्वांनी त्यांच्या वेळेकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. सबंध कार्यक्रम: गीत व प्रार्थना वगळता ४५ मिनिटांचा आहे.
लेखी उजळणी: वेळोवेळी लेखी उजळणी घेण्यात येईल. याच्या तयारीसाठी नेमिलेल्या साहित्याची व नियुक्त केलेल्या पवित्र शास्त्र वाचनाची उजळणी करावी. २५ मिनिटांच्या उजळणीत फक्त पवित्र शास्त्र वापरता येईल. राहिलेल्या वेळात प्रश्नोत्तराच्या रुपाने चर्चा होईल. प्रत्येक विद्यार्थी आपली उत्तर पत्रिका तपासील. प्रशाला पर्यवेक्षक श्रोत्यांसोबत सर्व उत्तरांना विचारात घेतील. यात कठीण प्रश्नांवर अधिक लक्ष देऊन त्यांची उत्तरे सर्वांना स्पष्टपणे समजावून देण्याचे साहाय्य करतील. स्थानिक परिस्थितीच्या अपरिहार्य कारणामुळे ही लेखी उजळणी नियुक्त केलेल्या तारखेच्या एक आठवड्यानंतर घेता येईल.
मोठ्या मंडळ्या: ज्या मंडळीतील शाळेत ५० किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पटावर असतील तेथे नियोजित भाषणे देण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करून त्यांची भाषणे दुसऱ्या सल्लागारांच्या समक्ष ऐकवता येतील. अर्थातच, बाप्तिस्मा प्राप्त न झालेल्या पण ख्रिस्ती तत्त्वानुरूप जीवन व्यतित करणाऱ्यांना प्रशालेत आपले नाव दाखल करून नेमणूका प्राप्त करता येतील.
अनुपस्थिती: दर आठवडी प्रशालेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून, आपणाला दिलेल्या नेमणूकांची चांगली तयारी करून आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात भाग घेऊन सर्वांनी ह्या प्रशालेबद्दल रसिकता दाखवावी. सर्व विद्यार्थी, आपणास मिळालेल्या नेमणूका जाणीवपूर्वकतेने पूर्ण करतील अशी आम्ही आशा करतो. नेमलेला विद्यार्थी गैरहजर असल्यास एखादा स्वयंसेवक ती नेमणूक आपल्या परीने जे करता येईल त्याद्वारे हाताळील. किंवा प्रशाला पर्यवेक्षक त्या साहित्याची चर्चा सभागृहासोबत करू शकतील.
आराखडा
फेब्रुवारी २८ पवित्र शास्त्र वाचन: नहेम्या ९ ते ११
गीत क्र. २ (७९)
क्र. १: खरे ख्रिस्ती ऐक्य कसे साध्य केले जाते (uw पृ. ५-७ परि. १-७)
क्र. २: नहेम्या ९:४, २६-३३, ३६-३८
क्र. ३: देवाला खरे गौरव देणाऱ्या गोष्टी करणे (gt धडा ८३)
क्र. ४: td १७ए देवाचा पृथ्वीसाठी उद्देश
मार्च ७ पवित्र शास्त्र वाचन: नहेम्या १२ व १३
गीत क्र. १२९ (६६)
क्र. १: नहेम्या—हितकारक का आहे (si पृ. ९०-१ परि. १६-१९)
क्र. २: नहेम्या १३:१५-१८, २३-३१
क्र. ३: शिष्यत्वाची जबाबदारी (gt धडा ८४)
क्र. ४: td १७सी पृथ्वीवर नेहमी लोकवस्ती राहील
मार्च १४ पवित्र शास्त्र वाचन: एस्तेर १ ते ५
गीत क्र. १३२ (७०)
क्र. १: एस्तेरची प्रस्तावना (si पृ. ९१-२ परि. १-६)
क्र. २: एस्तेर ४:६-१७
क्र. ३: स्व-नीतिमत्वतेबद्दल दक्ष असा आणि लीनतेची गुणग्राहकता बाळगा (gt धडा ८५)
क्र. ४: td १९ए खोट्या संदेष्ट्यांना कसे ओळखावे
मार्च २१ पवित्र शास्त्र वाचन: एस्तेर ६ ते १०
गीत क्र. १३३ (६८)
क्र. १: एस्तेर—हितकारक का आहे (si पृ. ९४ परि. १६-१८)
क्र. २: एस्तेर ६:१-१३
क्र. ३: हरवलेला मुलगा आणि त्याचा प्रेमळ पिता (gt धडा ८६ परि. १-९)
क्र. ४: td २२ए आध्यात्मिकरित्या बरे करणे महत्त्वाचे का आहे
मार्च २८ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब १ ते ३
गीत क्र. ६२ (३४)
क्र. १: ईयोबाची प्रस्तावना (si पृ. ९५-६ परि. १-६)
क्र. २: ईयोब २:१-१३
क्र. ३: हरवलेल्या मुलाचे परतणे इतरांवर परिणाम करते (gt धडा ८६ परि. १०-२०)
क्र. ४: td २२बी देवाचे राज्य चिरकालिक शारीरिक आरोग्य प्रदान करील
एप्रिल ४ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ४ ते ६
गीत क्र. १५८ (८५)
क्र. १: ख्रिस्ती ऐक्यासाठी आवश्यक घटक (uw पृ. ८ परि. ८ ते ८ [३])
क्र. २: ईयोब ६:१-११, २९, ३०
क्र. ३: व्यवहारबुद्धीने भविष्याची तरतूद करा (gt धडा ८७)
क्र. ४: td २२सी आधुनिक विश्वासाने बरे करण्यास ईश्वरी मान्यतेची उणीव
एप्रिल ११ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ७ ते ९
गीत क्र. २१३ (६७)
क्र. १: ख्रिस्ती ऐक्याला हातभार लावणारे घटक (uw पृ. ९ परि. ८ [४] ते ९)
क्र. २: ईयोब ९:१-१५
क्र. ३: श्रीमंत मनुष्य व लाजर (gt धडा ८८ परि. १-१०)
क्र. ४: td २२डी अन्य भाषेत बोलणे केवळ तात्पुरती तरतूद
एप्रिल १८ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब १० ते १२
गीत क्र. १९१ (९)
क्र. १: खरे ख्रिस्ती विघटनकारी प्रभावांना टाळतात (uw पृ. १०-११ परि. १०-१२)
क्र. २: ईयोब १२:१-१६
क्र. ३: श्रीमंत मनुष्य व लाजर या दाखल्याचा काय अर्थ होतो (gt धडा ८८ परि. ११-२१)
क्र. ४: td २३बी केवळ १,४४,००० स्वर्गास जातात
एप्रिल २५ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब १३ ते १५
गीत क्र. ९७ (५०)
क्र. १: यहोवाला जाणून त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगा (uw पृ. १२-१३ परि. १-४)
क्र. २: ईयोब १३:१-१३
क्र. ३: यहुदीयामधील करुणेची कामगिरी (gt धडा ८९)
क्र. ४: td २४बी नरकात खरोखरचा अग्नी नाही
मे २ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब १६ ते १८
गीत क्र. १८५ (९८)
क्र. १: यहोवाच्या प्रीतीच्या उदाहरणाचा अवलंब करा (uw पृ. १४-१५ परि. ५-७)
क्र. २: ईयोब १६:१-११, २२
क्र. ३: येशू पुनरुत्थानाच्या आशेबद्दल बोलतो (gt धडा ९०)
क्र. ४: td २४सी अग्नी सर्वनाशाचे द्योतक आहे
मे ९ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब १९ व २०
गीत क्र. ८५ (४४)
क्र. १: देवाबद्दल सत्य शिकण्यास लोकांना मदत करा (uw पृ. १५-१७ परि. ८ ते ११ [२])
क्र. २: ईयोब १९:१४-२९
क्र. ३: येशू लाजरचे पुनरुत्थान करतो (gt धडा ९१)
क्र. ४: td २४ई श्रीमंत मनुष्य आणि लाजरचा अहवाल हा चिरकाल यातनांचा पुरावा नाही
मे १६ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब २१ व २२
गीत क्र. ९५ (५२)
क्र. १: एकच यहोवा आहे (uw पृ. १७-१८ परि. ११ [३] ते १२)
क्र. २: ईयोब २१:१९-३४
क्र. ३: देवाच्या चांगुलतेबद्दल कृतज्ञता दाखवा (gt धडा ९२)
क्र. ४: td २५बी जन्म दिवस, नाताळ सुरवातीच्या ख्रिश्चनांनी साजरा केला नाही
मे २३ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब २३ ते २६
गीत क्र. १३८ (७१)
क्र. १: परमेश्वराच्या नामात चालणे याचा काय अर्थ होतो (uw पृ. १८-१९ परि. १३-१५)
क्र. २: ईयोब २४:१, २, १४-२५
क्र. ३: मनुष्याचा पुत्र प्रकट केला जातो तेव्हा (gt धडा ९३)
क्र. ४: td २६ए उपासनेत मूर्त्यांचा उपयोग देवास निंदा आणते
मे ३० पवित्र शास्त्र वाचन: ईयोब २७ ते २९
गीत क्र. १८० (१००)
क्र. १: इतरांना, पवित्र शास्त्र हे देवाचे वचन म्हणून कदर करण्यास मदत करा (uw पृ. २०-२ परि. १-६)
क्र. २: ईयोब २९:२-१८
क्र. ३: प्रार्थनेची व नम्रतेची गरज (gt धडा ९४)
क्र. ४: td २६बी इस्राएलांची मूर्तिपूजा निष्फळ शाबीत झाली
जून ६ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ३० व ३१
गीत क्र. ४६ (२०)
क्र. १: दररोज पवित्र शास्त्र वाचा (uw पृ. २३-५ परि. ७-११)
क्र. २: ईयोब ३१:२३-३७
क्र. ३: घटस्फोटाबद्दल व मुलांविषयी प्रेम दाखवण्याबद्दल धडे (gt धडा ९५)
क्र. ४: td २६सी “सापेक्ष” भक्ती देवाकडून अनधिकृत
जून १३ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ३२ व ३३
गीत क्र. ५९ (३१)
क्र. १: यहोवाबद्दल शिकून घेण्यासाठी अभ्यास करा (uw पृ. २५-६ परि. १२ ते १२ [१])
क्र. २: ईयोब ३३:१-६, २३-३३
क्र. ३: येशू व श्रीमंत तरुण अधिकारी (gt धडा ९६)
क्र. ४: td २७ए खरी ऐक्यता मिश्र विश्वासाद्वारे येत नाही
जून २० लेखी उजळणी. संपूर्ण नहेम्या ९ ते ईयोब ३३
गीत क्र. ४२ (४)
जून २७ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ३४ ते ३६
गीत क्र. ४७ (२१)
क्र. १: पवित्र शास्त्राचा विषय आणि वचनांचा संदर्भ विचारात घ्या (uw पृ. २६ परि. १२ [२] व १२ [३])
क्र. २: ईयोब ३४:१-१५
क्र. ३: येशूचा द्राक्षमळ्याचा दाखला (gt धडा ९७)
क्र. ४: td २७बी “सर्व धर्मात चांगले” हे खरे नाही
जुलै ४ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ३७ व ३८
गीत क्र. १६२ (८९)
क्र. १: तुम्ही शिकत असलेल्या गोष्टींचा वैयक्तिक अवलंब करा तसेच इतरांसोबत त्याची सहभागिता करा (uw पृ. २६-८ परि. १२ [४] ते १३)
क्र. २: ईयोब ३७:५-१४, २३, २४
क्र. ३: पुढील गोष्टींसाठी येशू त्याच्या शिष्यांना तयार करतो (gt धडा ९८)
क्र. ४: td २९ए ख्रिश्चनांनी देवाच्या वैयक्तिक नामाचा उपयोग केला पाहिजे
जुलै ११ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ३९ व ४०
गीत क्र. १०५ (४६)
क्र. १: येशूविषयी संदेष्टे काय म्हणतात (uw पृ. २९-३१ परि. १-६)
क्र. २: ईयोब ४०:१-१४
क्र. ३: येशू अब्राहामाच्या हरवलेल्या पुत्राला तारतो (gt धडा ९९)
क्र. ४. td २९सी देवाच्या अस्तित्वाबद्दलचे सत्य
जुलै १८ पवित्र शास्त्र वाचन: ईयोब ४१ व ४२
गीत क्र. १०६ (५५)
क्र. १: ईयोब—हितकारक का आहे (si पृ. १०० परि. ३९-४३)
क्र. २: ईयोब ४२:१-१०, १२-१७
क्र. ३: मोहरांचा दाखला (gt धडा १००)
क्र. ४: td २९डी देवाचे गुण ओळखणे
जुलै २५ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता १ ते ६
गीत क्र. १६८ (८४)
क्र. १: स्तोत्रसंहितेची प्रस्तावना—भाग १ (si पृ. १०१ परि. १-५)
क्र. २: स्तोत्रसंहिता २:१-१२
क्र. ३: मरीयेच्या चांगल्या कामासाठी येशू तिची बाजू घेतो (gt धडा १०१)
क्र. ४: td २९एफ सर्वजण एकाच देवाची सेवा करत नाही
ऑगस्ट १ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ७ ते १०
गीत क्र. १३८ (७१)
क्र. १: स्तोत्रसंहितेची प्रस्तावना—भाग २ (si पृ. १०२ परि. ६-११)
क्र. २: स्तोत्रसंहिता ८:१-९:५
क्र. ३: यरुशलेममध्ये ख्रिस्ताचा जयोत्सवाने प्रवेश (gt धडा १०२)
क्र. ४: td ३०ए यहोवाच्या साक्षीदारांचा आरंभ
ऑगस्ट ८ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ११ ते १७
गीत क्र. ६४ (३५)
क्र. १: भविष्यसूचक नमुन्यांकडे लक्ष द्या (uw पृ. ३२-३ परि. ७ ते ८ [२])
क्र. २: स्तोत्रसंहिता १४:१-१५:५
क्र. ३: देवाच्या मंदिरास भ्रष्ट करणाऱ्यांचा येशू धिक्कार करतो (gt धडा १०३)
क्र. ४: td ३१बी येशू देवाचा पुत्र व नेमलेला राजा आहे
ऑगस्ट १५ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता १८ ते २०
गीत क्र. ७९ (१०४)
क्र. १: आपल्या महायाजकाची प्रतिछाया (uw पृ. ३३ परि. ८ [३] व ८ [४])
क्र. २: स्तोत्रसंहिता १९:१-१४
क्र. ३: देवाचा आवाज तिसऱ्यांदा ऐकू येतो (gt धडा १०४)
क्र. ४: td ३१डी येशू ख्रिस्तातील विश्वास तारणासाठी अत्यावश्यक आहे
ऑगस्ट २२ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता २१ ते २४
गीत क्र. १४४ (७८)
क्र. १: पश्चात्ताप आणि विश्वासाची आवश्यकता का आहे (uw पृ. ३३-७ परि. ९-१४)
क्र. २: स्तोत्रसंहिता २३:१-२४:१०
क्र. ३: शापित केलेले अंजिराचे झाड कशाला सूचित करते (gt धडा १०५)
क्र. ४: td ३१ई येशूतील विश्वासापेक्षा अधिकाची जरुरी आहे
ऑगस्ट २९ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता २५ ते २९
गीत क्र. १६० (८८)
क्र. १: परमेश्वराला अधीन असल्यामुळे खरे स्वातंत्र्य प्राप्त होते (uw पृ. ३८-४० परि. १-५)
क्र. २: स्तोत्रसंहिता २६:१-१२
क्र. ३: धार्मिक नेत्यांना उघडकीस कसे आणले जाते (gt धडा १०६)
क्र. ४: td ३३बी देवराज्य मानवजातीसाठी काय करील
सप्टेंबर ५ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ३० ते ३३
गीत क्र. १३० (५८)
क्र. १: आज खरे स्वातंत्र्य कोठे सापडू शकते (uw पृ. ४०-२ परि. ६-९)
क्र. २: स्तोत्रसंहिता ३२:१-११
क्र. ३: लग्नाच्या मेजवानीचा दाखला काय सूचित करतो (gt धडा १०७)
क्र. ४: td ३३सी ख्रिस्ताचे शत्रू क्रियाशील असताना अंमलास सुरवात
सप्टेंबर १२ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ३४ ते ३६
गीत क्र. १६७ (१०६)
क्र. १: जगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात गुलामगिरी आहे (uw पृ. ४२-३ परि. १०-१२)
क्र. २: स्तोत्रसंहिता ३६:१-१२
क्र. ३: ते येशूला धरण्यात अपयशी होतात (gt धडा १०८)
क्र. ४: td ३३ई देवाचे राज्य मानवांच्या प्रयत्नांचा परिणाम नाही
सप्टेंबर १९ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ३७ ते ३९
गीत क्र. १०९ (७५)
क्र. १: वाईट संगतीला कसे ओळखावे (uw पृ. ४४-५ परि. १३, १४)
क्र. २: स्तोत्रसंहिता ३७:२३-३८
क्र. ३: येशू त्याच्या विरोधकांना तोंड देतो (gt धडा १०९)
क्र. ४: td ३४ए “जगाचा शेवट” याचा अर्थ काय आहे
सप्टेंबर २६ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ४० ते ४४
गीत क्र. २०७ (११२)
क्र. १: सर्वांना तोंड द्यावा लागणारा मोठा वादविषय (uw पृ. ४६-७ परि. १-३)
क्र. २: स्तोत्रसंहिता ४१:१-१३
क्र. ३: येशूची मंदिरातील सेवा पूर्ण होते (gt धडा ११०)
क्र. ४: td ३४बी शेवटच्या दिवसांच्या चिन्हांसाठी जागृत राहा
ऑक्टोबर ३ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ४५ ते ४९
गीत क्र. १९० (१०७)
क्र. १: निष्ठावान जणांच्या विश्वासाचे अनुकरण करा (uw पृ. ४७-५२ परि. ४-११)
क्र. २: स्तोत्रसंहिता ४५:१-७, १०-१७
क्र. ३: येशू शेवटल्या दिवसांचे चिन्ह देतो (gt धडा १११ परि. १-११)
क्र. ४: td ३६बी आज्ञाधारक मानवजातीस देव सार्वकालिक जीवनाची खात्री देतो
ऑक्टोबर १० पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ५० ते ५२
गीत क्र. १७० (९५)
क्र. १: सत्य यहोवाचा सन्मान करते (uw पृ. ५२-४ परि. १२-१५)
क्र. २: स्तोत्रसंहिता ५१:१-१७
क्र. ३: येशू शेवटल्या दिवसांबद्दल आणखी काही सांगतो (gt धडा १११ परि. १२-१९)
क्र. ४: td ३६डी ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असणारेच स्वर्गात जातात
ऑक्टोबर १७ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ५३ ते ५७
गीत क्र. १०३ (८७)
क्र. १: देवाने दुष्टाईला दिलेल्या अनुमतीवरुन आम्हाला काय शिकायला मिळते (uw पृ. ५५-७ परि. १-७)
क्र. २: स्तोत्रसंहिता ५५:१, २, १२-२३
क्र. ३: शहाण्या व मूर्ख कुमारी (gt धडा १११ परि. २०-८)
क्र. ४: td ३६ई “दुसरी मेंढरे” यांच्या असंख्य जनास पृथ्वीवरील जीवनाचे अभिवचन
ऑक्टोबर २४ लेखी उजळणी. संपूर्ण ईयोब ३४ ते स्तोत्रसंहिता ५७
गीत क्र. ३४ (८)
ऑक्टोबर ३१ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ५८ ते ६२
गीत क्र. ५० (२३)
क्र. १: देवाकडे अन्याय कधीच नसतो (uw पृ. ५८-६१ परि. ८-१६)
क्र. २: स्तोत्रसंहिता ६२:१-१२
क्र. ३: रुपयांचा दाखला (gt धडा १११ परि. २९-३७)
क्र. ४: td ३८बी विवाह बंधन आदरणीय असावे
नोव्हेंबर ७ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ६३ ते ६७
गीत क्र. ४५ (२८)
क्र. १: यहोवावर विसंबून राहा—दुरात्म्यांचा प्रतिकार करा (uw पृ. ६२-४ परि. १-५)
क्र. २: स्तोत्रसंहिता ६५:१-१३
क्र. ३: ख्रिस्त राज्य-सामर्थ्यासह येतो तेव्हा (gt धडा १११ परि. ३८-४६)
क्र. ४: td ३८सी ख्रिश्चनांनी मस्तकपद तत्त्वाचा आदर केला पाहिजे
नोव्हेंबर १४ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ६८ व ६९
गीत क्र. ८२ (१०५)
क्र. १: दियाबलाच्या फसव्या युक्त्यांबद्दल दक्ष राहा (uw पृ. ६४-७ परि. ६-१२)
क्र. २: स्तोत्रसंहिता ६८:१-११, ३२-३५
क्र. ३: येशूचा शेवटला वल्हांडण सण जवळ आहे (gt धडा ११२)
क्र. ४: td ३८डी ख्रिस्ती पालकांची मुलांसंबंधीची जबाबदारी
नोव्हेंबर २१ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ७० ते ७३
गीत क्र. ७३ (६)
क्र. १: देवाकडील संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा (uw पृ. ६७-९ परि. १३-१५)
क्र. २: स्तोत्रसंहिता ७२:१-२०
क्र. ३: येशू नम्रतेचा एक धडा शिकवतो (gt धडा ११३)
क्र. ४: td ३८ई ख्रिश्चनांनी केवळ ख्रिश्चनांशीच विवाह करावा
नोव्हेंबर २८ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ७४ ते ७७
गीत क्र. ११३ (६२)
क्र. १: ज्ञान, विश्वास आणि पुनरुत्थान (uw पृ. ७०-३ परि. १-७)
क्र. २: स्तोत्रसंहिता ७६:१-१२
क्र. ३: येशू स्मारकविधीची सुरवात करतो (gt धडा ११४)
क्र. ४: td ३८एफ खऱ्या ख्रिश्चनांना अनेक पत्नी नसतात
डिसेंबर ५ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ७८ व ७९
गीत क्र. १८ (११८)
क्र. १: येशूकडे मृत्यू आणि अधोलोकाच्या किल्ल्या आहेत (uw पृ. ७३-७ परि. ८-१५)
क्र. २: स्तोत्रसंहिता ७९:१-१३
क्र. ३: येशू सहनशीलतेने त्याच्या शिष्यांना प्रेम आणि नम्रतेबद्दल शिकवतो (gt धडा ११५)
क्र. ४: td ३९ए मरीया येशूची आई होती, “देवाची आई” नाही
डिसेंबर १२ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ८० ते ८५
गीत क्र. ९३ (४८)
क्र. १: देवाच्या टिकाऊ राज्याची गुणग्राहकता बाळगा (uw पृ. ७८-८१ परि. १-९)
क्र. २: स्तोत्रसंहिता ८३:१-१८
क्र. ३: येशू त्याच्या प्रस्थानासाठी प्रेषितांची तयारी करतो (gt धडा ११६ परि. १-१४)
क्र. ४: td ३९सी पवित्र शास्त्र दाखवते की मरीया ‘सर्वकाळ कुमारी’ नव्हती
डिसेंबर १९ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ८६ ते ८९
गीत क्र. ५७ (२९)
क्र. १: देवाच्या मूळ उद्देशाला राज्य पूर्ण करील (uw पृ. ८१-२ परि. १०-१२)
क्र. २: स्तोत्रसंहिता ८६:१-१७
क्र. ३: येशूचे खरे मित्र कोण आहेत (gt धडा ११६ परि. १५-२५)
क्र. ४: td ४०ए शास्त्रवचने स्मारक विधीबद्दल काय सांगतात
डिसेंबर २६ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ९० ते ९४
गीत क्र. १९० (१०७)
क्र. १: राज्याने एव्हाना काय साध्य केले आहे (uw पृ. ८३-६ परि. १३-१५)
क्र. २: स्तोत्रसंहिता ९०:१-१७
क्र. ३: येशू त्याच्या शिष्यांना सज्ज करतो आणि उत्तेजन देतो (gt धडा ११६ परि. २६-३७)
क्र. ४: td ४०बी धार्मिक विधी पाळणे अशास्त्रीय आहे
जानेवारी २ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ९५ ते १०१
गीत क्र. १७२ (९२)
क्र. १: आम्ही पहिल्याने राज्य मिळवण्यास कसे झटतो (uw पृ. ८७-९ परि. १-६)
क्र. २: स्तोत्रसंहिता १००:१-१०१:८
क्र. ३: माडीवरील खोलीत येशूची समारोपाची प्रार्थना (gt धडा ११६ परि. ३८-५१)
क्र. ४: td ४१ए देवाच्या राज्याची तरतूद सर्व मानवांसाठी आहे
जानेवारी ९ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता १०२ ते १०४
गीत क्र. १ (७७)
क्र. १: सुरवातीच्या शिष्यांच्या कित्त्याचे अनुकरण करा (uw पृ. ९०-१ परि. ७-९)
क्र. २: स्तोत्रसंहिता १०३:१-१४, २१, २२
क्र. ३: बागेतील व्याकुळता (gt धडा ११७)
क्र. ४: td ४१बी ख्रिस्तेत्तरांना बचावाची समान संधी आहे
जानेवारी १६ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता १०५ व १०६
गीत क्र. २०१ (१०१)
क्र. १: व्यक्तिगतपणे राज्याला प्रथम स्थानी ठेवा (uw पृ. ९१-४ परि. १०-१५)
क्र. २: स्तोत्रसंहिता १०६:१-१२, ४७, ४८
क्र. ३: येशूचा विश्वासघात आणि अटक (gt धडा ११८)
क्र. ४: td ४२ए खऱ्या ख्रिश्चनांचा विरोध का होतो
जानेवारी २३ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता १०७ ते १०९
गीत क्र. २०२ (८२)
क्र. १: शास्त्रवचने योहानाकरवीच्या बाप्तिस्म्याबद्दल काय म्हणतात (uw पृ. ९५-६ परि. १-५)
क्र. २: स्तोत्रसंहिता १०८:१-१३
क्र. ३: येशूला गैरवागणूक दिली जाते आणि बेकायदेशीरपणे वागवले जाते (gt धडा ११९)
क्र. ४: td ४२सी पत्नीने पतीला तिला देवापासून विभक्त करण्यास वाव देऊ नये
जानेवारी ३० पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ११० ते ११५
गीत क्र. १७ (१२)
क्र. १: मृत्यूतील बाप्तिस्मा (uw पृ. ९७-८ परि. ६-८)
क्र. २: स्तोत्रसंहिता ११०:१-७; ११४:१-८
क्र. ३: मनुष्याचे भय, पेत्राला ख्रिस्तास नाकारण्यास लावते (gt धडा १२०)
क्र. ४: td ४२डी पतीने त्याच्या पत्नीला त्याला देवाची सेवा करण्यापासून परावृत्त करण्यास वाव देऊ नये
फेब्रुवारी ६ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ११६ ते ११९:३२
गीत क्र. १९५ (१०५)
क्र. १: “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा (uw पृ. ९८ परि. ९)
क्र. २: स्तोत्रसंहिता ११६:१-१९
क्र. ३: न्यायसभेपुढे आणि पिलातापुढे येशू धैर्याने सत्य बोलतो (gt धडा १२१)
क्र. ४: td ४३ए प्रार्थना ज्या देव ऐकतो
फेब्रुवारी १३ पवित्र शास्त्र वाचन: स्तोत्रसंहिता ११९:३३-११२
गीत क्र. ५९ (३१)
क्र. १: बाप्तिस्मा आणि ख्रिस्ती जबाबदाऱ्या (uw पृ. ९९-१०२ परि. १०-१४)
क्र. २: स्तोत्रसंहिता ११९:९७-११२
क्र. ३: पिलाताला आणि हेरोदला देखील येशूमध्ये काही दोष दिसत नाही (gt धडा १२२)
क्र. ४: td ४३सी काही प्रार्थना निष्फळ का आहेत
फेब्रुवारी २० लेखी उजळणी. संपूर्ण स्तोत्रसंहिता ५८ ते ११९:११२
गीत क्र. १५५ (२९)