वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९३ पृ. १
  • तुमची मुले प्रचारक आहेत का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची मुले प्रचारक आहेत का?
  • आमची राज्य सेवा—१९९३
आमची राज्य सेवा—१९९३
km १०/९३ पृ. १

तुमची मुले प्रचारक आहेत का?

आमच्या मंडळीशी सहवास राखून यहोवाची स्तुती करणारे बनणाऱ्‍या पुष्कळ मुलांमध्ये आम्हाला आस्था आहे. तुमच्या मुलांमध्ये देखील तीच इच्छा आहे का? जर तसे आहे, तर तात्काळ प्रगतीशील व व्यावहारिक शिक्षण देण्यास सुरवात करण्याची गरज आहे. लहानपणाचाच काळ चांगल्या सवयींना शिकण्यास व त्या संपादन करण्यास पूरक असतो.

२ घरात असताना तुमच्या मुलांचे वर्तन व सवयी कशा असतात? जर मुले त्यांच्या पालकांच्या आज्ञेचे पालन करत असतील, तरच ते मंडळीतील इतर सदस्यांना तसेच त्यांच्या शाळेतील शिक्षकांना आदर प्रदर्शित करु शकतील. तुमची मुले स्वतःच्या वस्तू व खोली व्यवस्थित ठेवतात व त्या वस्तूंची काळजी घेतात का? याबाबतीत मुलांना चांगली सवय असल्यास, क्षेत्र सेवेमध्ये देखील ते इतर लोकांच्या मालमत्तेला व वस्तूंना आदर दाखवतील व यहोवा देवाचे प्रतिनिधीत्व करणारे सेवक या नात्याने वागणूकीत स्वतःला उदाहरणीय ठेवतील.

३ जेव्हा तुमच्या मुलांमध्ये सुवार्तिकाचा आत्मा वाढीस लागेल, तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत प्रवेश मिळवण्यास प्रोत्साहन द्या. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत प्रवेश मिळवण्यास कोणत्याही निश्‍चित वयोमानाची आवश्‍यकता नाही, परंतु उदाहरणीय वर्तनाला आधारभूत अशी चांगली सवय व एक प्रचारक होण्याची इच्छा हे आवश्‍यक आहे. प्रशाला पर्यवेक्षक मुलाचे पवित्र शास्त्र वाचन व बोलणे याविषयी बोलण्यातच केवळ आस्था न राखता, सुरवातीपासूनच पालक व मुलासोबत एक प्रचारक होण्याचे ध्येय राखण्याबाबत बोलतील तर हे चांगले ठरते.

४ तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही सेवेसाठी तुम्हांसोबत घेऊन जाता तेव्हा, सर्वांनी मिळून एखादे ध्येय ठेवा, व पूर्वतयारी करून तसेच त्याला अमलात आणून सेवेतील त्यांच्या क्षमतेला सुधारण्याचे लक्ष्य राखा. तुमच्या मुलाची क्षमता तसेच क्षेत्रातील परिस्थितीनुसार, जसे की घरमालक काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐकणे, शास्त्रवचनांच्या वाचनाकडे त्यांचे लक्ष वेधवणे, तसेच पत्रिकांद्वारे सोप्यारितीने साक्ष देणे, अशा निश्‍चित ध्येयांना गाठण्यासाठी कार्य करा. तसेच, कार्यात दरवाजांसमोर जे लोक भेटतील त्या सर्व लोकांमध्ये वैयक्‍तिक आस्था राखण्यास तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. कोणी औत्सुक्य न दाखवता नकार दर्शवला तरी त्यांनी उबदारपणा, आत्मियता व विनयशीलता दाखवणे महत्त्वाचे आहे याबाबतीत तुम्ही त्यांच्याशी बोलल्यास, त्यांच्यातील उत्साहभंग होण्यामध्ये घट होण्यास मदत होईल. तुमची मुले जर सप्ताहांताच्या कार्यात सहभागी झाली तर, केवळ पालकांसोबतच काम करण्याऐवजी प्रौढ प्रचारकांसोबत तसेच वडिलांसोबत काम करण्याने त्यांना चांगली तालीम मिळू शकेल.—१ करिंथ. ४:१७.

५ तुमच्या मुलांनी त्यांचे स्वतःचे विचार त्यांच्या स्वतःच्या शब्दात व्यक्‍त केल्याने घरमालकाचे हृदय परिवर्तन होईल तसेच ते खास परिणामकारक ठरेल. अनुभवी बनल्यानंतर, त्यांना प्रौढ ख्रिस्ती व कार्यशील आणि उत्साही प्रचारक बनण्यास उत्तेजन द्या. (१ करिंथ. १४:२०) केवळ एक नियमित प्रचारक बनण्याऐवजी ते परत भेटी घेऊ शकतात तसेच एखादा गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवण्याचे लक्ष्य बाळगू शकतात. शिवाय, यहोवाच्या संघटनेसोबत काम करण्याच्या आनंदाचा अनुभव घेण्यास त्यांना साहाय्य करा. माहिती फलकाकडे लक्ष देऊन तसेच सेवा सभेच्या घोषणांकडे लक्ष देण्याद्वारे मंडळीला सहकार्य कसे करावे हे त्यांना शिकवा. बांधवांकडून मिळणाऱ्‍या कोणत्याही कामाला तडीस नेण्यास स्वेच्छेने तयार असावयास त्यांना उत्तेजन देणे देखील चांगले असेल.

६ एकदा तुमची मुले यहोवाची स्तुती करणारे बनले की कोणत्याही नैतिक समस्या उद्‌भवतील त्याकडे नीट लक्ष ठेवा, ज्याद्वारे आतापर्यंत तुमच्या मुलांनी जे चांगले स्थान मिळवले आहे ते कलंकित होणार नाही आणि देवाशी सचोटी राखण्यामध्ये नियमित राहण्यास त्यांना प्रेरित करा.—२ तीम. २:२२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा