वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/९३ पृ. २
  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ऑक्टोबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९३
  • उपशिर्षक
  • ऑक्टोबर ४ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ११ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर १८ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर २५ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९३
km १०/९३ पृ. २

ऑक्टोबरसाठी सेवा सभा

ऑक्टोबर ४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २२५ (२१)

१० मि:स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. मासिकांच्या अलिकडील अंकांना स्थानिक क्षेत्रात वापरण्यासाठी काही मार्ग सुचवा. जेथे मासिक सादर केले आहे त्या प्रत्येक ठिकाणी वितरण मार्ग सुरु करण्याच्या उद्देशाने परत भेट घेण्याच्या महत्त्वावर जोर द्या. घरमालक खरेच आस्थेवाईक दिसून आल्यास वर्गणी सादर केली जाऊ शकते.

१५ मि:“डू यू रिस्पेक्ट युवर प्लेस ऑफ वर्शीप?” जून १५, १९९३च्या वॉचटावरच्या लेखावर आधारित वडिलांद्वारे भाषण. स्थानिक परिस्थितीला माहिती लागू करा. जर कोणत्या विशिष्ट समस्येसंबंधी सांगावयाचे असेल तर चतुराईने योग्य सल्ला द्या.

२० मि:ऑक्टोबर दरम्यान तुमच्या घरोघरच्या सेवेला वाढवा. सेवाकार्य पर्यवेक्षक किंवा दुसरा लायक बांधव श्रोत्यांसोबत घरोघरच्या कार्याच्या महत्त्वावर चर्चा करतो. ऑक्टोबरमध्ये अष्टपैलू साहित्यांची सादरता निरनिराळ्या प्रस्तावनांना वाव देते. प्रात्यक्षिक दाखवा: (१) प्रचारक संभाषणाची सुरवात करतो जी अलिकडील अवेक! किंवा वॉचटावरच्या लेखाकडे निरवते. घरमालकाने प्रदर्शित केलेल्या आस्थेवर आधारित, प्रचारक अलिकडील मासिक सादर करु शकतो अथवा त्या व्यक्‍तीस एखादी पत्रिका देऊ शकतो. (२) मॅनकाइन्डस्‌ सर्च फॉर गॉड या पुस्तकाकडे निरवणाऱ्‍या विचाराने प्रचारक संभाषणाची सुरवात करतो. परिस्थितीनुसार प्रचारक पुस्तक सादर करु शकतो अथवा दोन मासिके सादर करण्याचा विचार करतो. (३) अनौपचारिक संभाषणाला सुरवात करण्यास प्रचारक पत्रिकेचा वापर करतो तद्‌नंतर आस्थेवाईक व्यक्‍तीला अलिकडील मासिके सादर करतो. (४) मासिकाचा वितरण मार्ग असलेल्या ठिकाणी प्रचारक वर्गणी सादर करण्याचा निश्‍चय करतो. असा अष्टपैलूपणा ऑक्टोबर दरम्यानच्या घरोघरच्या सेवेला वाढवण्यासाठी सर्व प्रचारकांना प्रोत्साहित केला पाहिजे. या महिन्यात मंडळीमध्ये काही साहाय्यक पायनियरींग करत असतील यात काही शंका नाही. पण आणखीन जे यात समाविष्ट होऊ शकतात त्यांच्यासाठीही फार उशीर झालेला नाही.

गीत ४२ (१८) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ११ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ४ (१९)

१० मि:स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल. देणगीची पोचपावती वाचून दाखवा व स्थानिक मंडळी आणि संस्थेच्या जगव्याप्त कामासाठी दिलेल्या आर्थिक मदतीबद्दल मंडळीची प्रशंसा करा. आठवड्यासाठी असलेल्या प्रचारकार्याच्या योजनेची थोडक्यात उजळणी करा, तसेच प्रचारकांच्या आवेशी सहकार्याबद्दल गुणग्राहकता व्यक्‍त करा.

१५ मि:“घरोघरी आपल्या मासिकांचा वापर करणे.” श्रोत्यांसोबत चर्चा करा. क्षेत्रसेवेत भेटणाऱ्‍या लोकांना तसेच ज्यांना अनौपचारिक साक्ष देता त्यांना उत्साहाने मासिके सादर करण्याचे आम्हापाशी कारण आहे. मासिके विशिष्ट तारखांना प्रसिद्ध होतात आणि मासिक वितरण दिवशी आम्हाला अलिकडील अंक द्यावयाचे असले तरी, परिस्थितीनुरुप जुनी मासिके सादर करण्यास मागेपुढे पाहू नये. केवळ तुम्ही सादर करत असलेली मासिके स्वच्छ व नीटनेटकी आहेत याची खात्री करा. परिच्छेद ४ वरील माहितीवर आधारित लायक प्रचारकाद्वारे सादरतेचे प्रात्यक्षिक दाखवा.

२० मि:“तुमची मुले प्रचारक आहेत का?” प्रश्‍नोत्तराने लेखाची चर्चा. वेळ मुभा देत असल्यास परिच्छेद व संदर्भित केलेल्या शास्त्रवचनांचे वाचन करा. पालक त्यांच्या मुलांना प्रचारक बनण्यास कशाप्रकाराने तालीम देतात याबद्दलच्या थोडक्यात अभिप्रायास अनुमती द्या.

गीत १५७ (७३) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर १८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ६५ (३६)

५ मि:स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित वृत्त.

१५ मि:“आमच्या कार्यात निःपक्षपातीपणा प्रदर्शित करणे.” प्रश्‍नोत्तर. स्थानिक क्षेत्रासंबंधी या विषयाबाबतीत खास काळजी घेण्याच्या बाजूंना स्पष्ट करा.

१५ मि:“मिळालेल्या आस्थेकडे लक्ष द्या.” श्रोत्यांना उद्देशून काही प्रश्‍नांचा समावेश असलेले भाषण. स्थानिक क्षेत्रामध्ये प्रचारकांनी आस्था कशी वाढवली याचे प्रात्यक्षिक दाखवा, किंवा ज्यांनी अवेक! आणि वॉचटावरच्या प्रतींना स्वीकारले अशांना परत भेट घेण्याच्या महत्त्वाचे अलिकडील अनुभव प्रचारकास सांगू द्या.

१० मि:स्थानिक गरजा किंवा जुलै १, १९९३च्या वॉचटावरवर आधारित “द अर्ली ख्रिश्‍चनस्‌ ॲन्ड द वर्ल्ड” या लेखावर उत्साहवर्धक भाषण. आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या उदाहरणाचे अनुकरण आम्ही आज करण्याच्या गरजेवर जोर द्या.

गीत ६० (४०) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर २५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७५ (२२)

१० मि:स्थानिक घोषणा. आठवड्याच्या क्षेत्रसेवेच्या योजनेला समाविष्ट करा, व अद्ययावत मासिकातील मुद्यांकडे लक्ष वेधवा जेणेकरुन पुढील दिवसात प्रचारक त्याचा वापर क्षेत्र सेवेत करु शकतील. वेळ मुभा देत असल्यास, स्थानिक परिस्थितीला लागू होतील असे एक किंवा दोन सादरतेचे संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. ज्यांनी आस्था प्रदर्शित केली अशांची परत भेट घेण्याच्या आवश्‍यकतेची आठवण करुन द्या.

१५ मि:दुःखितांचे सांत्वन करण्यास तयार असा (रिझनिंग पुस्तकाच्या पान १०२-४ वर आधारित). (३ मि.) मृत व्यक्‍तींसाठी पाळल्या जाणाऱ्‍या सर्वच रीतींना यहोवाचे साक्षीदार अस्वीकार करत नाहीत ही गोष्ट, हा भाग हाताळणारे बांधव दाखवून देतात. (५ मि.) एक प्रचारक आपल्या सहकामगाराला याचे स्पष्टीकरण देतो की यहोवाचे साक्षीदार मृत व्यक्‍तींसंबंधी असलेल्या दुःखाच्या रुढीपरंपरागत पद्धतींना का टाळतात, याचे प्रात्यक्षिक रिझनिंग पुस्तकाच्या पान १०२-३ वर आधारित असेल. (७ मि.) पान १०३-४ वरील “इफ समवन सेज्‌—” या भागावर आधारित श्रोत्यांसोबत चर्चा करा.

२० मि:“गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालवणे.” लेखाची प्रश्‍नोत्तराने हाताळणी. प्रचारक विद्यार्थ्यास विचारात घेण्यात येणाऱ्‍या परिच्छेदातील माहितीला अवतरीत शास्त्रवचने कसा आधार देतात हे समजण्यास साहाय्य करत असल्याचे चांगल्या पूर्वतयारीचे प्रात्यक्षिक सादर करा. याच प्रात्यक्षिकामध्ये प्रचारक विद्यार्थ्याला सत्य आपलेसे करण्यास मदत होण्यासाठी साहाय्यकारी प्रश्‍नांचा वापर करतो. युनायटेड व्हर्शिप किंवा लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील निवडक भागांचा उपयोग करा.

गीत ७८ (२९) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा