इतर साहित्यांबरोबर पत्रिकांना जोडा
१ आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व मासिकांमध्ये, सार्वकालिक जीवनाचा मार्ग प्रामाणिक शोधकांना फक्त द वॉचटावर व अवेक! ह्या मासिकातच मिळू शकेल. एप्रिल आणि मे महिन्यात, तुम्ही लोकांशी संभाषण करते वेळी काहीजण राज्य संदेशाबाबत खचित आस्था दाखवतील, आणि तुम्ही त्यांचे थेटपणे अलिकडील अंकाकडे लक्ष केंद्रित करुन एखादी वर्गणी करण्याचे प्रोत्साहन द्याल. काहीजण पहिल्यांदा थोडी आस्था दाखवतील. अशा परिस्थितींमध्ये, प्रथम तुम्ही हस्तपत्रिकेतील एक किंवा दोन विषयाची चर्चा करु शकता; मग त्या हस्तपत्रिकेला मासिकाच्या विषयाबरोबर जोडा, आणि अशारितीने वर्गणी सादर करण्यासाठी निरवा.
२ तुम्ही म्हणू शकता:
▪“आजच्या जगात तोडग्यांऐवजी अधिक समस्याच आहेत असे बहुतेक लोक कबूल करतील. आमच्या सर्व समस्यांचा अंत होणार असे पवित्र शास्त्राने भाकीत केले आहे हे तुम्हाला कधी माहीत होते का?” मग तुम्ही शांतीदायक नवीन जगातील जीवन या हस्तपत्रिकेकडे वळून पृ ३ आणि ४ वरील पवित्र शास्त्राच्या काही अभिवचनांवर चर्चा करु शकता.
३ इंग्रजी वॉचटावरचा, एप्रिल १चा अंक तुम्ही सादर करत असाल तर, “फॉलो द लाईट ऑफ द वर्ल्ड” हा लेख दाखवू शकता व येशू ख्रिस्त मनुष्यांच्या सर्व समस्यांना एकदाचाच कसे सोडवेल याचे वर्णन द्या. प्रादेशिक भाषेतील एप्रिल १च्या वॉचटावर, मध्ये “जगाला मशीहाची गरज आहे का?” या प्रश्नावर आधारीत अशाच लेखांची मालिका आहे. अनेक लोकांची समज आहे की ‘मशीहा’ याचा अर्थ होतो ‘तारणारा.’ त्यांना दाखवले पाहिजे की जरी ‘मशीहा’चा अर्थ ‘अभिषिक्त,’ असा असला तरी येशू ख्रिस्त खरोखरी मानवजातीसाठी एकमात्र तारणारा आहे. “मशीही पृथ्वीवर जेव्हा राज्य करतो” या पोटमथळ्याखालचे परि. १४ ते पृष्ठ १२ वरील परि. १६ पर्यंतची माहिती की जेथे येशूच्या राज्यामुळे कोणकोणते फायदे येणार आहेत याकडे त्यांचे लक्ष आकर्षित करा.
४ “त्याच्या राजवटीचा तुम्हावर कसा परिणाम होतो” या पृष्ठ १३ वरील पुढील पोटमथळा घरमालकास दाखवा. द वॉचटावर पवित्र शास्त्राच्या अद्भुत अभिवचनांची चर्चा नियमितपणे कसे करते व त्यांना आपण कसे मिळवू शकतो हे दाखवा. ते मासिक त्याच्या घरी पोस्टाद्वारे नियमितपणे मिळू शकेल याचे स्पष्टीकरण त्याला द्या. तो व्यक्ती वर्गणी, किंवा मासिके स्वीकार करो अगर न करो, त्याने आस्था दाखवली असेल तर त्याविषयावर अधिक चर्चा करण्यासाठी सोईस्कर वेळेनुसार परत येण्याची तयारी दर्शवा.
५ इंग्रजी “अवेक!”चा एप्रिल ८ अंक सादर केला जात आहे, तर तुम्ही पृष्ठ २ वरील प्रस्तावनेचा वापर करु शकता व म्हणू शकता:
▪“आमच्या समस्यांना सोडवण्याची क्षमता धर्म व राजनीतीकडे आहे याबद्दल पुष्कळ लोक शंका करतात, परंतु ते असाही विचार करतात की विज्ञानाकडे याचे उत्तर असेल का.” यानंतर “कॅन सायन्स मीट द चॅलेंजेझ ऑफ द ट्वेन्टीफस्ट सेंचुरी?” ह्या लेखातील उचित मुद्दा वाचून दाखवा. हा लेख बहुतेक युवकांना विशेषेकरुन विद्यार्थ्यांना लागू होईल अशी शक्यता आहे.
६ प्रादेशिक भाषेतील एप्रिल ८च्या अवेक! मासिकाच्या पृष्ठावर अनेक लोक विचारत असेलला प्रश्न आहेः “आवर चेजिंग वर्ल्ड—व्हेअर आर वी हेडेड?” “आवर चेजिंग वर्ल्ड—वॉट डज द फ्युचर रियली होल्ड?” या लेखात पृष्ठ ११ वर उत्तर दिले आहे त्याकडे घरमालकाचे लक्ष आकर्षित करा. पृष्ठ ११ ते १३ वरील पोटमथळ्यांना दर्शवून हे दाखवा की पवित्र शास्त्र हे ह्या “कठीण दिवसांत” “विश्वसनीय माहितीसाठी एकमात्र उगम” आहे व “आशीर्वादासाठी कारणे” पुरवून एक “उत्तम पर्याय” सादर करते. युवकांना पृष्ठ २२ वरील ‘तरुण लोक विचारतात. . . “कॅन ड्रिंकिंग रियली गेट मी हुक्ड्?” हा लेख दाखवू शकता. आणि मग अवेक! किंवा दोन्ही अवेक! व वॉचटावर मासिकांची वर्गणी सादर करु शकता.
७ तुम्ही एक नवे प्रचारक असाल, तर साधी प्रस्तावना तुम्हाला आवडेल. शांतीदायक नवीन जगातील जीवन किंवा दुसऱ्या कोणत्याही हस्तपत्रिकेचा साठा ठेवा, व परि. २ मध्ये सूचविलेल्या गोष्टींचे अनुकरण करा.
८ लोकांच्या घरी तारणाचा संदेश आणण्याचा आम्हाला मोठा बहुमान मिळाला आहे. ‘योग्य जन’ यांचा शोध घेत असता पत्रिकांचा आम्ही चांगला उपयोग करु या व एप्रिल आणि मे महिन्यात वर्गणी सादरतेत त्यांनाही जोडू या.—मत्तय १०:१३. न्यु.व.