माहितीपत्रकाचा वापर करण्याचे ध्यानात ठेवा
घरोघरचे साक्षीकार्य करीत असता अथवा अनौपचारिक साक्ष करीत असता, संभाषण वारंवार अशा विषयाकडे झुकत असते जो विषय आपल्या आकर्षक माहितीपत्रकातील एकात सामावलेला असतो. मे महिन्यात वॉचटावर आणि अवेक! ची वर्गणी सादर करीत असता ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी. सेवेत विशेषतः मासिकासोबत सादर करण्यासाठी नेहमी काही माहितीपत्रके ठेवा, ज्याद्वारे परिणामकारक साक्ष देण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे ती तुम्ही सज्ज असल्यामुळे तुम्हाला मिळेल. खासकरुन आपल्या समस्या हे माहितीपत्रक आपल्या क्षेत्रातील लोकांना मदत ठरण्यास तयार करण्यात आले आहे. घरमालकाचा कल वर्गणी स्विकारण्याकडे नसेल तर, कोणतेही माहितीपत्रक तुमच्याकडे असलेल्या मासिकासोबत अथवा त्याच्याविना सादर करा. (स्कुल माहितीपत्रक सोडून), ४.०० रुपयांना.—नीतिसूत्रें १५:२३ पडताळा.