वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९२ पृ. ८
  • आस्था चेतविणाऱ्‍या प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आस्था चेतविणाऱ्‍या प्रस्तावना
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभावी प्रस्तावना
    आमची राज्य सेवा—१९९०
  • अनंतकाल जगू शकाल पुस्तक परिणामकारकपणे प्रस्तुत करणे
    आमची राज्य सेवा—१९९५
  • वारंवार उरकलेल्या क्षेत्रात कार्य करणे
    आमची राज्य सेवा—१९९४
  • “पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या, आणि चर्चेसाठी बायबल विषय या पुस्तिकांचा तुम्ही उपयोग करीत आहात का?”
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ९/९२ पृ. ८

आस्था चेतविणाऱ्‍या प्रस्तावना

१ येशू प्रस्तावना वापरण्यात मोठा कुशल होता. मोठ्या गटाशी बोलताना किंवा विशिष्ट व्यक्‍तीसोबत बोलताना येशूने त्यांना व्यक्‍तिशः सामावून घेतल्यामुळे त्याला लोकांचे लक्ष आपणाकडे आकर्षून घेता आले. त्याने आपल्या श्रोत्यांना विषयाचे महत्त्व दाखवून दिले.—मत्तय ५:३-१२; योहान ४:७-३०.

२ अगाऊ तयारी जरुरीचीः आपल्या संदेशाबद्दल आस्था चेतविण्यासाठी आपण आपल्या प्रस्तावनांना अशी जोड दिली पाहिजे की, ज्यामुळे त्या विशिष्ठांचा, त्यांना वाटणाऱ्‍या काळजींचा त्यात समावेश होऊ शकेल आणि राज्याचा संदेश त्यांना व्यक्‍तिशः कशी मदत करू शकतो हे दाखवता येईल.

३ सेवाकार्याची पूर्व तयारी करताना वसाहतीतील लोकांना कशाची त्वरेने काळजी वाटत आहे त्या गोष्टींची उजळणी करा. अलिकडच्याच बातमीने प्रत्येकाचे लक्ष वेधले गेले आहे का? एखाद्या युवकाला, वडीलधाऱ्‍यांना, पतींना, गृहिणींना किंवा पालकांना कोणती गोष्ट आस्थेची वाटेल? तीच ती प्रस्तावना प्रत्येक घरी वापरण्याऐवजी, काही वेगवेगळ्या प्रस्तावना तयार करून ठेवणे व घरमालकाचा प्रतिसाद दिसतो त्याप्रमाणे त्या जुळवून घेणे हे सहसा अधिक प्रभावी ठरते. काही प्रचारकांना, ते दर खेपेला घरोघरच्या सेवेला जाताना रिझनिंग पुस्तकातून विविध प्रस्तावनांची तयारी करून त्यांचा उपयोग केल्यामुळे चांगले यश मिळाले आहे. (रिझ. पृ. ९-१५) यामुळे त्यांची मुलाखात ताजी व चित्तवेधक राहते.

४ सप्टेंबरमध्ये तुम्हाला कदाचित या प्रस्तावनेचा उपयोग करता येईलः

▪ “नमस्ते. आम्ही आज लोकांच्या भेटी घेऊन एखाद्या राज्यकर्त्याठायी कोणकोणते गुण असण्याची इच्छा लोक धरून आहेत याबद्दलची चर्चा करीत आहोत. मी विचारु का, की तुम्हाला कोणते गुण उल्लेखनीय वाटतात? [प्रतिसादास वाव द्या. मांडलेल्या मुद्यांना मान्यता द्या. शक्य आहे तेथे सहमत दर्शवा.] मानवजातीचा अधिपती होण्याची ज्याच्याबद्दल संमती दिली गेली आहे अशाच्या गुणांचे वर्णन पवित्र शास्त्र देते याची तुम्हाला काही माहिती आहे का? येथे यशया ९:६, ७ मध्ये ते आहे. [वाचा.] अशा अधिपतीच्या वर्चस्वाखाली राहणे कसे वाटेल असे तुम्हाला वाटते?” प्रतिसादास वाव द्या व मग स्तोत्रसंहिता १४६:३, ४कडे आणि रिझनिंग पुस्तकाच्या ११२ व ११३ पृष्ठाकडे लक्ष वळवा, जेथे येशूच्या अधिपत्याच्या गुणांची खात्री देण्यात आली आहे. किंवा अधिक चर्चेला चालना देण्यासाठी लिव्ह फॉरएव्हर पुस्तकातील पृष्ठ ११२ व ११३ वरील साहित्याचा उपयोग करू शकता. यानंतर तुम्हाला ते प्रकाशन सादर करता येईल.

५ तुम्ही कोणा कुटुंबवत्सल माणसाशी बोलता तेव्हा लिव्ह फॉरएव्हर सादर करण्यासाठी पुढील सादरता उचित ठरू शकेलः

स्थानिक अभिवादनानंतर तुम्हाला असे म्हणता येईलः

▪ “आज कुटुंबांपुढे दैनंदिन दबाव व समस्या यामुळे एक खरोखरीचे आव्हान प्रस्तुत झाले आहे हे आपल्याला दिसते का? [प्रतिसादास वाव द्या.] मग, चांगल्या व सबळ सल्ल्यासाठी कुटुंबाना वळता येईल असे काही असावे याबद्दल आपले मत काय आहे? [प्रतिसादास वाव द्या.] या विषयाबद्दल पवित्र शास्त्र काय म्हणते त्याकडे आम्ही लोकांचे लक्ष वेधवीत आहोत. विवाहाच्या उत्पादकाने पहिल्या मानवी जोडप्याला काय म्हटले होते ते बघा.” उत्पत्ती १:२८ वाचा व मग लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाच्या २३८ पृष्ठाकडे वळून आपली चर्चा चालू ठेवा. २९ व्या अध्यायातील निवडक मुद्दे वापरा.

६ आस्था आकर्षित करणे व चर्चेत श्रोत्यांना समाविष्ट करणे या येशूच्या पद्धतींचे अनुकरण करण्यामुळे आपण प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना आध्यात्मिक गोष्टीचे मोल दाखवून देत असतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा