वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९२ पृ. २
  • सप्टेंबरसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सप्टेंबरसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • उपशिर्षक
  • सप्टेंबर ७ ने सुरु होणारा सप्ताह
  • सप्टेंबर १४ ने सुरु होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २१ ने सुरु होणारा सप्ताह
  • सप्टेंबर २८ ने सुरु होणारा सप्ताह
  • ऑक्टोबर ५ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९२
km ९/९२ पृ. २

सप्टेंबरसाठी सेवा सभा

सप्टेंबर ७ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १६२ (८९)

१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. अलिकडील मासिकातून बोलक्या मुद्यांची चर्चा करा. सर्वांना या आठवड्याच्या शेवटाला क्षेत्रकार्यात सहभागी होण्यचे उत्तेजन द्या.

१५ मि: “आस्था चेतविणाऱ्‍या प्रस्तावना.” प्रश्‍नोत्तराद्वारे विचारविनिमय. परिच्छेद ५ मध्ये दाखविण्यात आलेल्या मुद्यांचे प्रात्यक्षिक करा.

२० मि: “पुढील प्रगतिसाठी निश्‍चयी हालचाल.” पुरवणीतील पहिल्या दोन परिच्छेदावर भाषण द्या. बाकीचा लेख प्रश्‍नोत्तराने हाताळा. स्थानिक अवलंबनासाठी मुद्यांवर जोर द्या. थोडक्या सारांशाने समाप्ती करा.

गीत १५५ (८५) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर १४ ने सुरु होणारा सप्ताह

गीत १३३ (६८)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल तसेच देणगीच्या मिळालेल्या पोचपावतीचा समावेश करा. स्थानिक मंडळीस तसेच संस्थेच्या जगव्याप्त कार्याला आर्थिक रुपाचा हातभार दिल्यामुळे मंडळीची प्रशंसा करा.

२० मि: पुनर्भेटीमध्ये आस्था वाढविणे. सेवा देखरेख्यांमार्फत चर्चा. लोकांसोबत बोलायला व त्यांना प्रकाशन द्यायला बहुतेकांना आनंद वाटतो. (ओएम पृ. ८७-८) आपण ज्यांच्यासोबत बोलतो त्यांच्या हृदयात आस्था वाढविणे ही आमची जबाबदारी आहे. एका छोट्या प्रात्यक्षिकाद्वारे हे दाखवून द्या की, पूर्वी जेथे कोणतेही प्रकाशन देण्यात आले नाही तेथे पुनर्भेटीत एक हस्तपत्रिका देऊन आस्था कशी वाढवता येते. एक किंवा दोन मुद्दे ठळकपणे मांडा. रिझनिंग पुस्तकातील अनुक्रमणिकेतील माहितीचा वापर कसा करू शकतो हे दाखविणारे छोटेसे प्रात्यक्षिक दाखवा. पवित्र शास्त्राबद्दल आस्था वाढविण्यासाठी प्रकाशनातील वापरता येतील असे विस्तारीत व थेट मुद्दे जोरदारपणे सांगा. पुढील भेटीची व्यवस्था कशी केली जाऊ शकते ते दाखवा.

१५ मि: “मोठी बाबेल.” रिझनिंग पुस्तक पृष्ठ ४९-५३ वर चर्चा. प्रात्यक्षिकः प्रचारक पवित्र शास्त्र विद्यार्थ्यासोबत त्याच्या प्रगतिची चर्चा करतो. यहोवाच्या दृष्टिकोणातून पवित्र राहाणे, त्याची मदत व आशीर्वाद मिळविण्याच्या पात्रतेचे ठरणे या गोष्टीवर भर दिला जातो. (१ पेत्र १:१५, १६) बाबेलातून पळ काढणे आणि यहोवाच्या पवित्र संस्थेसोबत सहवास राखणे यावर जोर दिला जातो. बांधवांनी प्रकाशनांचा वापर विद्यार्थ्यांना संस्थेकडे निरविण्यासाठी करावा तसेच वडीलांच्या मदतीद्वारे लाभ मिळवावा याद्वारे अध्यक्ष समारोप करतात.

गीत १२९ (६६) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २१ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ११३ (६२)

१५ मि: स्थानिक घोषणा. ईश्‍वरशासित बातम्या. “मनाची एकाग्रता व नीतीमत्ता यांनी जीवन जगणे” या लेखाची चर्चा. १९९३ च्या सेवावर्षात बांधवांनी या खास संमेलन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी अगाऊ तयारी करण्याचे उत्तेजन द्या. तारीख व जागा माहीत असल्यास त्याची घोषणा करावी. याचप्रमाणे या सप्ताहच्या शेवटाला क्षेत्रकार्यात सहभागी होण्याचे उत्तेजन द्यावे.

२० मि: “पुनर्भेटी घेण्याचे आव्हान.” प्रश्‍नोत्तरे. परिच्छेद ५ व ६ चा विचार केल्यावर ही दोन प्रात्यक्षिके सादर कराः (१) पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यासाठी हस्तपत्रिकेचा कसा वापर केला जाऊ शकतो; (२) रिझनिंग पुस्तकातील एक विषय निवडा व त्याचा उपयोग पुनर्भेटीत एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी कसा केला जाऊ शकतो ते दाखवा. सराव करण्याचे महत्त्व ठळकपणे सांगा. सर्व आस्थांचा मागोवा घेण्याचे उत्तेजन द्या.

१० मि: एप्रिल १५ १९९२ च्या वॉचटावर मधील “तुम्हास आठवते का?” या लेखाची चर्चा. इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांचा वापर करणाऱ्‍या मंडळ्या जर त्यांच्या भाषेत पंधरवडा मासिक निघत आहे तर त्या जुलै १५, १९९२ मधील “तुम्हास आठवते का?” हे सदर व जेथे महिन्यातून एकदाच प्रकाशित होत असलेल्या मासिकाचा वापर होतो तेथे जून १, १९९२ मध्ये प्रकाशित झालेले “तुम्हास आठवते का?” हे सदर वापरावे. सर्वांनी मासिकांना नियमितपणे वाचण्याचा आराखडा ठेवावा असे उत्तेजन द्या. काही व्यावहारिक प्रस्ताव सुचवा.

गीत १३० (५८) व समाप्तीची प्रार्थना.

सप्टेंबर २८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७२ (३९)

५ मि: स्थानिक घोषणा.

१५ मि: “घरोघरी प्रभावीपणे कार्य करणे.” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. ऑक्टोबरमध्ये साहाय्यक पायनियरिंग करण्याचे उत्तेजन द्या. जे साहय्यक पायनियरींग करतात अशांना त्या पुढील महिन्यात उच्च स्तरावरील कार्याचा अनुभव मिळतो हे सांगा.

१५ मि: ऑक्टोबरमध्ये क्रिएशन पुस्तक प्रस्तुत करा. भाषण व प्रात्यक्षिक. क्रिएशन पुस्तक सादर करताना कोणते बोलके मुद्दे व चित्रे दाखवता येतील त्याची चर्चा करा. जेथे लागू होतात तेथे रिझनिंग पुस्तकातील “क्रिएशन” शिर्षकाखाली असणारे मुद्दे उपयोगात आणता येतील. क्रिएशन पुस्तकातील कदाचित १६ व १९ अध्यायातील “देव दुष्टाईला का अनुज्ञा देतो?” व “लवकरच पृथ्वीव्याप्त नंदनवन येत आहे” हे साहित्य वापरता येईल. हे मुद्दे घरमालकास अपीलकारक ठरू शकतील. एका प्रशिक्षित प्रचारकाला नीतीसूत्रे २:२१, २२ आणि पृष्ठ १९७ वरील चित्राचा उपयोग करून, तसेच देवाने पृथ्वीला निर्माण करण्यामागील त्याचा मूळ उद्देश लवकरच पूर्ण होईल यावर भर देऊन प्रात्यक्षिक सादर करू द्या.

१० मि: “पुनर्भेटीत लिव्ह फॉरएव्हर पुस्तकाचा उपयोग करणे.” पहिल्या दोन परिच्छेदातील मुद्यांची त्रोटक चर्चा करा. मग, थेट मार्गाने पवित्र शास्त्र सुरु करण्याच्या पुनर्भेटीचे प्रात्यक्षिक सादर करा.

गीत १२६ (२५) व समाप्तीची प्रार्थना.

ऑक्टोबर ५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ३० (९१)

५ मि: स्थानिक घोषणा.

१५ मि: तुम्ही आध्यात्मिक प्रगति करीत आहात का? वडीलाद्वारे चर्चा. गेल्या सेवा वर्षात मंडळीतील बांधवांनी काही विशिष्ट ध्येये गाठली का? जर नाहीत, तर का नाही? शक्य असणाऱ्‍या ध्येयाची माहिती द्या. आध्यात्मिकतेचे रक्षण करण्यासाठी प्रगति जरुरीची आहे. (फिलि. ३:१६) एका कुटुंबाचे त्रोटक प्रात्यक्षिक. कुटुंब अभ्यासात आपल्या सेवकपणाची उजळणी करून त्यांना कोठे आध्यात्मिक प्रगति करता येईल ते ठरवतात.

१० मि: स्थानिक गरजा किंवा वडीलाद्वारे मंडळीच्या क्षेत्रसेवेच्या हालचालीची चर्चा.

१५ मि: आपल्या मुलांच्या अंतःकरणी देवाचे विचार रुजवून त्यांना शाळेत पाठवत जा. वडीलाचे भाषण. आम्ही अशा जगात आज राहात आहोत जे आपल्या साच्यात आम्हाला कोंबू पाहात आहे. हे आम्हातील युवकांबाबत खासपणे खरे आहे. पालकांनी त्यांच्या गरजा व समस्या याबद्दल संवेदनाशील असले पाहिजे. (नीती. २०:५) मुलांसंबंधाने आपले प्रेम व्यक्‍त करून त्यांच्यामध्ये देवाचे नियम व प्रेम रुजवा. प्रात्यक्षिकः स्कूल माहितीपत्रकाचा कसा वापर करावा याबद्दल कुटुंब चर्चा करते. कुटुंबातील एक मुलगा आता पहिल्यांदाच शाळेत जात आहे, पण दुसरी दोन मुले काही वर्षापासून शाळेत आहेत. प्रत्येक मुलाच्या परिस्थितीला अनुलक्षून असणारे मुद्दे निवडा. पालक शिक्षकाची भूमिका घेतील व मुले जणू त्यांच्यासमोर बोलत आहे असे वक्‍तव्य करू द्या. जी तत्त्वे गोवलेली आहेत ती मुलांना समजत आहेत याची खात्री करून घ्या. हा भाग हाताळणारा बंधू कौटुंबिक अभ्यासाचे तसेच मुलांसोबत जवळचे उबदार नातेसंबंध राखण्याचे प्रोत्साहन देतो.

गीत १०९ (११९) व समाप्तीची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा