आमच्या सादरतेला अनुलक्षून आमची प्रस्तावना जोडणे
१ या महिन्याची आपली सादरता तयार करताना प्रथमतः तुमच्या क्षेत्रातील लोकांना ज्या प्रधान समस्या आहेत त्या विचारात घ्या आणि मग आपण ऑगस्टमध्ये सादर करणाऱ्या माहितीपत्रकातील एखादे विधान निवडून ते व्यावहारिक अशा शास्त्रवचनीय उपायाला कसे दाखवते ते दर्शवा.
२ काही वसाहतीत लोकांना वाढती बेकारी तसेच महागाई यांची चिंता वाटत असेल. तुम्हाला अशा परिस्थितीला हाताळावे लागत असल्यास ती समस्या तुम्ही आपल्या प्रस्तावनेत स्पष्टपणे मांडू शकता.
तुम्ही कदाचित म्हणू शकालः
▪ “आम्ही शेजाऱ्यांसोबत बोलत असताना प्रत्येकाला काम व राहण्याच्या जागेबद्दल काय करता येऊ शकेल याची खात्री करून घेत होतो. हे मानवी सरकारांमार्फत साध्य होण्याची आम्हाला अपेक्षा धरता येईल का? [घरमालकाच्या प्रतिसादास वाव द्या.] या समस्या कशा सोडवाव्यात याची माहिती असणारा एकजण आहे आणि त्याने यशया ६५:२१-२३ मध्ये जे खात्रीलायक अभिवचन दिले आहे ते बघा. [वाचा.] आमच्या निर्मात्याने हे अभिवचन आमच्या उत्तेजनार्थ लिहून ठेवले होते आणि याची पूर्तता सध्याच्या कठीण काळी व्हावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे, नाही का?—रिझ. पृ. ११.
३ आता या तुमच्या सादरतेस तुम्ही आपल्या समस्या माहितीपत्रकातील साहित्य जोडू शकता. उदाहरणार्थ, पृष्ठ ४ वरील २ऱ्या परिच्छेदात सर्वसाधारण मानवाला असणाऱ्या विविध समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापैकीच्या एक किंवा दोन समस्या बहुतेकांना असतील. तेव्हा घरमालकाचे लक्ष पृष्ठ ५ वर मास्टरजी आनंदला जे म्हणतात, त्या विधानाकडे नेऊ शकता. ते असे आहेः “आमच्या कुटुंबातील सर्वांची खात्री झालेली आहे की, कोणीतरी आमच्या सर्व समस्या लवकरच सोडवणार आहे.” तसेच पृष्ठ ६ वरील २ऱ्या परिच्छेदातील मास्टरजींच्या विवेचनाकडे थोडक्यात लक्ष वेधवून हे दाखवा की, यहोवाने बदल घडवून आणण्याचे अभिवचन दिले आहे. माहितीपत्रक सादर केल्यावर तुम्ही, देव आमच्या सर्व समस्या कशा सोडवील याचा विचार करण्यासाठी मी तुमची पुनर्भेट घेईन असे म्हणून संपवू शकता.
४ “पाहा!” हे माहितीपत्रक सादर करताना सर्वांसाठी घर व काम ही विचारधारा मुखपृष्ठावर आणि मागच्या पृष्ठावर कशी चित्रात दाखविण्यात आली आहे ते का दाखवू नये. तुम्ही ते उघडून घरमालकासमोर धरा म्हणजे त्याला सबंध चित्र बघता येईल. हे तुम्ही आत्ताच जे शास्त्रवचन वाचले आहे त्याच्यासोबत जोडा आणि हे सांगा की, देवाने आपले अभिवचन पूर्ण केल्यावर जसे असेल त्याला हे तंतोतंत जुळणारे आहे.
तुम्ही “सरकार” माहितीपत्रक सादर करीत असल्यास कदाचित असे म्हणू शकाल:
▪ “येशूने आम्हाला देवाचे राज्य येण्यासाठी व त्याची इच्छा जशी स्वर्गात आहे तशीच पृथ्वीवर पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायला शिकवले. मग, तुम्हाला वाटते का की, देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण झाल्यास ही पृथ्वी खरीच नंदनवन बनेल?” घरमालकाने प्रतिसाद दिल्यावर प्रकटीकरण २१:३-५ वचन प्रस्तुत करा व वाचा.
५ मग, पृष्ठ ३ वरील आरंभीच्या परिच्छेदात निवडलेला मजकूर वाचून दाखवा. या विधानाकडे लक्ष वेधवाः “या राज्याद्वारे देव, लवकरच युद्धे, उपासमार, आजार व गुन्हे यांना सपुष्टात आणील.” घरमालकाला विचारा की, यापैकीच्या कोणत्या समस्या त्याला गंभीर वाटतात.
६ युवक राज्याचा संदेश अगदी प्रभावीपणे वृद्धांस देखील सादर करू शकतात.
यशया ६५:२१-२३ प्रस्तुत करताना युवक प्रचारक असे म्हणू शकतातः
▪ “मला माहीत आहे की वयस्कर असल्यामुळे मजपेक्षा तुम्हाला जीवनाचा अधिक अनुभव आहे, पण हे शास्त्रवचन आम्हा सर्वांनाच सांत्वन देणारे आहे.”
७ जे प्रकाशन वितरीत केले आहे त्याची काळजीपूर्वक नोंद घ्या; ते माहितीपत्रक आहे की, मासिक ते लिहा. ही माहिती तुम्हाला, तुम्ही परत आस्था वाढविण्यासाठी परत भेट घ्याल तेव्हा उपयोगी पडणारी आहे.