ईश्वरशासित वृत्त
कोरिआ: जानेवारीत ६८,३१० प्रचारकांचा नवा उच्चांक गाठण्यात आला. सात मंडळ्यांनी कळवले की, बाप्तिस्मा घेतलेले सर्व प्रचारक पूर्णवेळेच्या काही ना काही प्रकारात सहभागी झाले होते. एका मंडळीने तर १२ नियमित पायनियर्स, १५ साहाय्यक पायनियर्स आणि मंडळ प्रचारक शून्य असा अहवाल दिला.
नायजेरिया: जानेवारीच्या अहवालाने १,५६,००१ प्रचारकांचा नवा उच्चांक कळवला; ही गेल्या वर्षीच्या सरासरीपेक्षा ७ टक्क्यांची वाढ आहे.