पायनियरींग—प्रेमाचे वक्तव्य
१ यहोवा तसेच आमच्या सहमानवावरील प्रेम हे आम्हाला प्रचाराच्या कार्यहालचालीत पूर्ण रुपाने सहभागी होण्याची चालना देतो. आम्हामध्ये यहोवा व लोकांबद्दलची प्रीती वाढत राहते तसे आम्ही सेवकपणात अधिक सहभाग घेण्यासाठी पुढे होतो. देवाच्या वचनातील “अचूक ज्ञाना”मध्ये आमची अधिक वाढ होते तसे आमचे प्रेम अधिक विकसीत होते. (फिलि. १:९, १०) यहोवाच्या इच्छेबद्दल आपण अधिक शिकून घेतो तसे आम्ही ज्या काळात राहतो त्याची अधिक निकड आपल्याला जाणवू लागते. यामुळे इतरांबद्दल आपल्याला वाटणारी काळजी अधिक प्रखर होते. यामुळे पायनियर सेवेचा स्वीकार करून पुष्कळ जण आपली ही प्रेमळ काळजी व्यक्त करीत आहेत.
२ तुम्हाला साहाय्यक किंवा नियमित पायनियर बनण्यासाठी आवश्यक अशा सुधारणा करता येतील का? हे खरे की, आम्हा सर्वांनाच पायनियरींग करणे जमणार नाही. पण आम्ही प्रत्येकाने स्वतःच्या परिस्थितीचा प्रार्थनापूर्वकपणे शोध करून पाहिला पाहिजे.
३ काही ख्रिश्चनांना आढळले आहे की त्यांच्याकडे पायनिरींग कार्यासाठी वेळ मोकळा आहे; या कारणामुळे सध्या ज्या अनावश्यक गोष्टी आमच्या वेळेची मागणी करीत असतात अशांमधून आपण ‘संधि साधून घेतली पाहिजे.’ (इफिस ५:१५-१७) देव व लोकांबद्दल आम्हास वाटणाऱ्या प्रीतीने, ही प्रीती अधिक व्यक्त करता यावी म्हणून व्यक्तिगत इच्छा व सुखसोयींचा त्याग करण्याची स्वेच्छा निर्माण केली पाहिजे. (मार्क १२:३३) ज्या गोष्टी आम्ही संपादितो व ज्या बहुधा साधारण आहेत असे समजले जाते, त्याच जगाच्या इतर भागात चैनीच्या म्हणून समजल्या जातात.
४ मग, पालक आपल्या मुलांना या देव-प्रणीत कार्याबद्दल विचार करावयास लावण्यासाठी कोणती मदत देऊ शकतील? पालकांनी मुलांच्या लहान वयापासूनच आध्यात्मिक ध्येये त्यांच्यापुढे ठेवण्यास हवीत. मग, शाळेतील शिक्षणानंतर मुले कोणती ध्येये जोपासण्याचा विचार करुन आहेत, प्रापंचिक की आध्यात्मिक? लहान वयापासूनच पायनियरींग कार्यात प्रवेश केल्यामुळे जे चिरकालिक फायदे मिळतात ते युवकांनी पाहण्याची आम्ही त्यांना मदत द्यावी. हे स्वर्गात संपत्ती साठविण्यासमान आहे. (मत्तय ६:१९-२१) ते देवास संतुष्ट करणारे आहे व ते त्याला आमची निष्ठा व भक्ति आहे याचे प्रमाण देते. शिवाय ते इतर लोकांचे जीवन वाचविते.
५ “सर्व मनुष्यांचे तारण व्हावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:४) हीच आमचीही इच्छा आहे असे आपल्याला दाखवता येईल का? आपण जर राज्याची आस्था प्रधान स्थानी ठेवली तरच हे दाखवू शकू. यहोवा आम्हाला जीवनावश्यक अशा सर्व गोष्टींची तरतुद करील असा आत्मविश्वास राखून ते आम्ही दाखवू शकतो. (मत्तय ६:३१-३३) आर्थिक परिस्थिती कधीही वाईट होऊ शकते, पण यहोवाने आमची काळजी घेण्याचे दिलेले अभिवचन कधीही बदलत नाही.—स्तोत्र. ३७:२५.
यास्तव, आमच्या परिस्थितीला अनुसरुन क्षेत्रकार्यात नेटाने सहभाग घेण्याचा प्रयत्न करणे हे आमचे प्रेमाचे वक्तव्य आहे. याचा काहींसाठी नियमित रुपाची पायनियरींग करणे असा अर्थ होईल. तर मग, होता होईल ते सर्व करून येत्या सप्टेंबर १, १९९२ पासून नियमित पायनियर का बनू नये?