वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९२ पृ. २
  • जूनसाठी सेवा सभा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जूनसाठी सेवा सभा
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • उपशिर्षक
  • जून ८ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून १५ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून २२ ने सुरु होणारा सप्ताह
  • जून २९ ने सुरु होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—१९९२
km ६/९२ पृ. २

जूनसाठी सेवा सभा

जून ८ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ७२ (५८)

१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. प्रचारकांना या आठवड्याच्या शेवटाला क्षेत्रकार्याला येण्याचे उत्तेजन द्या.

२० मि: “जूनमध्ये द वॉचटावर सादर करणे.” लेखाची प्रश्‍नोत्तराने चर्चा. दर अंकाला २ऱ्‍या पानावर वरच्या भागाला प्रसिद्ध होणाऱ्‍या द वॉचटावरच्या उद्देशाची चर्चा समाविष्ट करा. या आठवडी क्षेत्रकार्यात जी मासिके वापरण्यात येतील त्या आधारावर आणखी सादरतांचे प्रस्ताव सुचवा. शक्य आहे तेथे वर्गणी सादर करण्यावर अधिक भर द्या.

१५ मि: “सुरवातीला केलेले निवेदन फरक घडवून आणू शकते.” लेखाची सभागृहासोबत चर्चा करा. अलिकडील आमची राज्य सेवा यांजमध्ये सुचविण्यात आलेल्या प्रस्तावना, ज्या बहुतेक रिझनिंग पुस्तकातून घेण्यात आल्या होत्या त्यांना, उपयोगात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे का? स्थानिक क्षेत्रात कोणकोणत्या प्रस्तावना प्रभावी असल्याचे आढळून आले आहे? क्षेत्र कार्यासाठी प्रचारक कधी आपल्या प्रस्तावनांची तयारी व तालीम करतात? स्थानिकपणे प्रभावी ठरलेल्या प्रस्तावनांची दोन किंवा तीन त्रोटक प्रात्यक्षिके सादर करा.

गीत ३२ (१०) व समारोपाची प्रार्थना.

जून १५ ने सुरु होणारा सप्ताह

गीत ९ (८२)

५ मि: स्थानिक घोषणा.

२० मि: “प्रभावी पुनर्भेटी घ्या.” सभागृहासोबत लेखातील प्रमुख मुद्यांची चर्चा करा व जेथे पुनर्भेटीचा परिणाम आणखी आस्था वाढविण्यात घडला अशा अलिकडील एका त्रोटक अनुभवाचा समावेश करा. शेवटच्या सहा ते आठ मिनिटांमध्ये, स्थानिक क्षेत्रामध्ये अलिकडेच आढळलेल्या आस्थेवाईक लोकांची पुनर्भेट घेण्यासाठी पुस्तक अभ्यास चालक दोन किंवा तीन प्रचारकांना तयारी करण्यात मदत देत असल्याचे प्रात्यक्षिक समाविष्ट करा. शक्य आहे तेथे प्रचारक नंतर घेणाऱ्‍या खऱ्‍या पुनर्भेटींचा वापर करा.

२० मि: “लॉयल्टी ॲट व्हॉट प्राईज्‌?” वॉचटावर, ऑगस्ट १५, १९९०, पृष्ठे १०-१५. (प्रादेशिक: टेहळणी बुरुज, जुलै १, १९९१.) स्थानिक गरजांसहित भाषण.

गीत ६५ (३६) व समारोपाची प्रार्थना.

जून २२ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २०२ (१८)

१० मि: स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व अनुदानाची पोच. स्थानिक मंडळी तसेच संस्थेच्या जागतिक कामासाठी बांधवांनी दिलेल्या आर्थिक साहाय्याबद्दल त्यांची प्रशंसा करा.

२० मि: “आध्यात्मिक ध्येयांचा मागोवा घेण्यासाठी उत्तेजन द्या.” वडीलाद्वारे हाताळली जाणारी सभागृहासोबत चर्चा. ६व्या परिच्छेदाचा विचार झाल्यावर एका उदाहरणशील प्रचारकाची मुलाखत घ्या, ज्याला युवक या नात्याने आध्यात्मिक ध्येये गाठण्यासाठी उत्तेजन मिळाले. त्याला किंवा तिला कसे उत्तेजन मिळाले? परिच्छेद ७ चा विचार करताना पालकांना तसेच युवकांना यंग पीपल आस्क या पुस्तकातील २२, ३८ व ३९ अध्यायाची उजळणी केल्यामुळे जे व्यावहारिक लाभ मिळू शकतील ते दर्शवा.

१५ मि: “प्रश्‍न पेटी” यावर वडीलांचे भाषण.

गीत २१३ (८५) व समारोपाची प्रार्थना.

जून २९ ने सुरु होणारा सप्ताह

गीत २२० (१९)

१० मि: स्थानिक घोषणा व ईश्‍वरशासित वृत्त. वर्गणी मोहीमेतील अनुभव. (हे अनुभव, मंडळीतील वर्गणींची हाताळणी करणाऱ्‍या बांधवाच्या मदतीने आधीच आयोजित केलेले असावेत).

१५ मि: धर्मत्यागापासून स्वतःचे संरक्षण करा. एका टेबलापाशी बसलेल्या वडील व एका प्रचारकामधील चर्चा. प्रचारक सांगतो की, त्याला क्षेत्रावर धर्मत्यागी प्रकाशने वाचणारा एकजण भेटला. प्रचारक म्हणतो की, घरमालकाने जे प्रश्‍न त्याला विचारले ते त्याला प्रामाणिक वाटतात. प्रचारकाने धर्मत्यागी प्रकाशन घेण्याचे नाकारले, पण म्हटले की, घरमालकाने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा तो प्रयत्न करील. वडील प्रचारकाच्या चांगल्या वागणूकीबद्दल व कृतीबद्दल त्याची प्रशंसा करतात. धर्मत्याग्यांनी जे काही लिहिले वा म्हटले आहे त्यांची चर्चा करण्याऐवजी त्याबद्दल रिझनिंग पुस्तकात जे शास्त्रवचनीय दृष्टीकोण दिलेले आहेत ते विचारात घेणे चांगले. वडील प्रचारकाला त्याचे रिझनिंग पुस्तक उघडण्यास सांगतो व ते दोघे मिळून पृष्ठे ३४-७ वरील माहितीची चर्चा करतात. ते धर्मत्यागी शब्दाची व्याख्या, प्रत्येक ठळक शिर्षक व उपशिर्षक, आणि वेळेनुसार काही निवडक शास्त्रवचनांची चर्चा करत असताना हे संभाषण उबदार व प्रोत्साहनदायक असावे. चर्चेचा समारोप, आपणाला अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या सर्व उभारणीकारक व उत्तेजनपर साहित्याबद्दल सरळ मनोदय व्यक्‍त करून संपवा. घरमालकासोबत उभारणीकारक गोष्टींची सहभागिता करा. तो प्रामाणिक आहे तर सत्याचा सरळ पवित्रा व धर्मत्याग्यांच्या नकारात्मक व टीकात्मक पवित्रा यातील फरक लक्षात आणील. धर्मत्याग्यांचे विचार व साहित्य नाकारण्यामुळे आम्ही यहोवा व त्याच्या दृश्‍य संस्थेला आपली निष्ठा दाखवतो.

२० मि: “दैनंदिन आध्यात्मिक आहार—प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाची अत्यावश्‍यक गरज.” साहित्याची प्रश्‍नोत्तराने चर्चा.

गीत १०८ (९५) व समारोपाची प्रार्थना.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा