वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/९२ पृ. ४
  • प्रतिसाद देणाऱ्‍या सादरता

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रतिसाद देणाऱ्‍या सादरता
  • आमची राज्य सेवा—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • निकडीची जाणीव ठेवून सुवार्ता सादर करणे
    आमची राज्य सेवा—१९९७
  • खऱ्‍या आनंदाची गुरुकिल्ली
    आमची राज्य सेवा—१९९६
  • आस्था आणखी वाढविण्यासाठी मी काय म्हणू शकतो?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • सर्व तान्हेल्यांना आमंत्रित करा
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९२
km ४/९२ पृ. ४

प्रतिसाद देणाऱ्‍या सादरता

१ ज्या सादरतांना प्रतिसाद मिळतो त्या स्पष्टपणे हे दाखवतात की, तो विषय घरमालकाला काळजीचा वाटत असतो व त्यांची त्याला जरुरी असते वा तो त्यांचा उपयोग करू शकतो. तुमच्या सर्व संभाषणातून घरमालकाला “हे मला अनुलक्षून आहे,” अशी जाणीव झाली पाहिजे. सादरतेची तयारी करताना आपण स्वतःला हे विचारावयास हवेः ‘माझ्या क्षेत्रातील लोकांना कोणता विषय अत्यंत काळजीचा वाटतो? त्यांच्या गरजा काय आहेत? यहोवाच्या मनात त्यांच्या गरजा आहेत हे दाखविण्यासाठी मी माझा संदेश कसा सादर करू शकतो?’ खाली दिलेल्या अशा काही गोष्टी आहेत, ज्या लोकांना आज आस्थेच्या वाटतात. यापैकीचा एकाचा किंवा अशाचप्रकारच्या विषयाचा तुम्ही आपल्या सादरतेत वापर करू शकाल का? तसेच यंग पीपल आस्क या पुस्तकातील मुद्दे येथे कसे जोडता येऊ शकतात ते देखील लक्षात घ्या.

२ आनंदाच्या उणीवेची चिंताः “आज आम्ही अशा लोकांशी बोलत आहोत ज्यांना आमच्या वसाहतीतील जीवनाबद्दल चिंता वाटते. साधारणपणे सर्वांपाशी भौतिक चीजवस्तु असल्या तरी पुष्कळ जण जीवनात खरे आनंदी दिसत नाहीत. अण्वस्त्र युद्ध व महागाई यामुळे प्रत्येकाचेच भवितव्य धोकेदायक बनले आहे. तर मग, आनंदी भवितव्यासाठी आपण मानवावर अवलंबून राहू शकतो का? यशस्वीता मिळवण्यामध्ये मानवाची जी अक्षमता आहे ते आपण यिर्मया १०:२३ मध्ये वाचू तेव्हा लक्षात घ्या. (वाचा) यास्तव, भवितव्याबद्दल देव जे काही म्हणतो ते समजल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकेल. त्याचे हे एकच अभिवचन लक्षात घ्या.” प्रकटीकरण २१:३, ४ वाचा व नंतर यंग पीपल आस्क पुस्तकाच्या ३०७ पृष्ठावरील २रा परिच्छेद वाचा.

३ भवितव्याबद्दल काळजीः “आम्ही आपल्या शेजाऱ्‍यांसोबत भवितव्याच्या सकारात्मक दृष्टीकोणाची सहभागिता करीत आहोत. तर मग, यात कोणता अडथळा आहे असे तुम्हाला वाटते? आपण आता यिर्मया १०:२३ हे वचन वाचू तेव्हा पवित्र शास्त्र ते अडखळण कोणते आहे याबद्दल काय म्हणते ते लक्षात आणा. (वाचा) याचे पुढील वचन सांगते की, मानवाला आनंदी भवितव्य लाभण्यासाठी त्याने आपल्या निर्माणकर्त्याकडून मार्गदर्शन मिळवले पाहिजे.” २४ वे वचन वाचा.

४ चांगले आरोग्य राखण्याबद्दल चिंताः “आमच्या शेजारी लोकात पुष्कळांना आपले आरोग्य सुदृढ राखण्याची काळजी आहे. तथापि, आम्ही कितीही काळजी केली तरी आम्हाला आजार येतातच. जेथे प्रत्येक जण पूर्ण आरोग्य व जोम याचा आनंद घेत असेल अशा जगात राहण्याची तुमची इच्छा आहे का? ते कदाचित अविश्‍वसनीय वाटेल, तरी पवित्र शास्त्रातील प्रकटीकरणाचे पुस्तक अशा काळाबद्दल बोलते व ते जवळच्याच भवितव्यात आहे असे आम्हास सांगते. (वाचा प्रकटीकरण २१:३, ४.) अशा या आनंदी परिस्थितीचा अनुभव घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे असे तुम्हास वाटते?” येथे तुम्हाला यंग पीपल आस्क पुस्तकाच्या ३०८ पृष्ठावरील २रा परिच्छेद वाचून दाखवता येईल आणि देवाकडून चिरकालिक जीवन मिळवण्यासाठी विश्‍वास जरुरीचा आहे हे दाखवता येईल.

५ प्रदूषण व वातावरण याबद्दलची चिंताः “आम्ही शेजारी लोकांशी बोलत असताना आम्हाला हे दिसले की त्यांना आपली हवा, पाणी व अन्‍न प्रदूषित झाल्याबद्दल केवढी चिंता वाटत आहे. याला जगातील सरकार आळा घालील असे तुम्हाला वाटते का? [विवेचनास वाव द्या.] जे या पृथ्वीचा नाश करीत आहेत अशांचे काय होईल त्याबद्दल पवित्र शास्त्र जे म्हणते त्याकडे लक्ष देणे उत्तेजनदायक आहे.” प्रकटीकरण ११:१८ब वाचा. पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांना काढून टाकण्यासोबत ही पृथ्वी लीन लोकांसाठी नंदनवन बनवायची देवाचा उद्देश आहे हे स्तोत्रसंहिता ३७:१०, ११ किंवा यशया ६५:२१, २२ मध्ये दाखवले असल्याचे दाखवा.

६ ज्यांचा कल धार्मिकतेकडे आहे अशांसाठीः “आम्ही शेजारी लोकांना हा प्रश्‍न विचारत आहोतः “प्रत्येक माणसाला आवडते त्याप्रमाणे त्याला भक्‍ती करू द्यावी अशी देवाची इच्छा आहे असे आपल्याला वाटते का? [विवेचनास वाव द्या.] पवित्र शास्त्र यिर्मया १०:२३ मध्ये काय म्हणते ते लक्षात घ्या.

७ तुम्ही आपल्या श्रोत्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचण्याचा कळकळीचा यत्न कराल तसे सत्य व धार्मिकतेची क्षुधा असणारे प्रतिसाद देतील.—मत्तय ५:३, ६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा