खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली
१ लूक ११:२८ मध्ये नमूद केलेले येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्याकरता सुवार्ता आहे कारण ते आपल्याला, आनंद कसा मिळवावा हे सांगतात. त्याने म्हटले: “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य!” तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल आणि तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे या पुस्तकांनी अनेकांना आनंद शोधण्यात मदत केली आहे. इतरांना ही सादर करण्यास आपल्याकडे चांगले कारण आहे.
२ अनेकजण वाढती गुन्हेगारी आणि हिंसा याविषयी चिंताग्रस्त असल्यामुळे थोडीफार आस्था निर्माण होऊ शकेल:
▪ “आपली सर्वात मोठी गरज कोणती आहे असे आपल्याला वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] आनंदाचे आणि शांतीचे जीवन जगण्याच्या सुरक्षिततेची आपल्याला गरज आहे अशी खात्री पटलेले अनेकजण आहेत.” अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील पृष्ठ १४ काढा आणि परिच्छेद १६ मधील पहिले वाक्य वाचा. पुढे असे म्हणा: “तरीसुद्धा, देवाने दुष्टाईचा नाश करण्याचे, पृथ्वीचा अधिकार घेण्याचे आणि जगभरात शांती प्रस्थापित करण्याचे अभिवचन दिले आहे. या विध्वंसक बदलातून बचावण्यासाठी, आपल्याला खऱ्या ज्ञानाची गरज आहे. परंतु कशाचे ज्ञान?” बायबलमधून किंवा पुस्तकाच्या पुढील पानावरील परिच्छेद १९ मधून योहान १७:३ वाचा आणि देवाविषयीचे ज्ञान सार्वकालिक जीवनाप्रत कसे नेऊ शकते त्याचे स्पष्टीकरण द्या. ते पुस्तक सादर करा आणि मानवजातीच्या सर्व गरजा पूर्ण करण्याच्या देवाच्या उद्देशाबद्दल ते अद्भुत माहिती कसे देते हे तुम्ही पुन्हा येऊन दाखवू शकता असेही सांगा.
३ जगाच्या दुर्दशेबद्दल अनेकजण चिंताग्रस्त असल्याने, तुम्ही याचा उपयोग करून पाहू शकता:
▪ “मी ज्यांच्याशी बोलतो ते सर्वजण भवितव्याविषयी चिंताग्रस्त आहेत. आपण शांतीच्या नवीन युगाच्या उंबरठ्यावर आहोत असे काही जागतिक नेत्यांना वाटते. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मानवांच्या सर्व प्रयत्नांव्यतिरिक्त, ही दुर्दशा जगभरात वाढतच आहे. बायबल, या समस्यांवरील एकमेव कायमचा उपाय प्रगट करते. [२ पेत्र ३:१३ वाचा. पृष्ठ १५६ ते १६२ वरील चित्र दाखवा, आणि देवाचे स्वर्गीय राज्य या पृथ्वीवर कायमची शांती आणि सुरक्षितता कसे आणील याचे स्पष्टीकरण द्या.] देव राज्याच्या आधिपत्याखाली जे सार्वकालिक जीवनाचा आनंद लुटतील त्या लोकांच्या नवीन समाजाचे तुम्ही भाग कसे होऊ शकता ते पाहण्यास हे प्रकाशन तुमची मदत करील.”
४ तुम्हाला कामात असलेली कोणी व्यक्ती भेटली आणि तुम्हाला संक्षिप्त असावयाचे असल्यास, तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “तुमच्याजवळ थोडाच वेळ असल्यामुळे, [उचित पत्रिका अथवा लेख निवडा] या नावाची पत्रिका [किंवा नियतकालिक लेख] देण्यास मला आवडेल. तुम्ही ते वाचावे असे मी उत्तेजन देतो. पुढील वेळी मी येथे येईन तेव्हा त्याविषयी तुम्हाला काय वाटते ते जाणण्यास मला आवडेल.”
५ “तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनविणे” हे पुस्तक उपयोगात आणताना तुम्ही असे काही म्हणू शकता:
▪ “आधुनिक कुटुंबाला पूर्वीच्या पिढींना अज्ञात असलेल्या आव्हानांना तोंड द्यावे लागते याजशी तुम्ही सहमत व्हाल का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] तुमच्या मते, हे असे का घडत आहे? [प्रतिसादास मान्यता दाखवा. २ तीमथ्य ३:१-३ काढा आणि वाचा.] ‘आईबापांस न मानणारी’ आणि ‘ममताहीन’ हे वाक्यांश आपल्या दिवसातील अनेकांचे अचूकपणे वर्णन करतात. तथापि, या समस्यांचे प्रतिपादन केलेल्या देवानेच आपल्याला कुटुंब जवळ कसे आणावे याविषयी उचित मार्गदर्शन दिले आहे.” पृष्ठ २ वरील “प्रकाशक” यातील परिच्छेद वाचा. ते पुस्तक १५ रुपयांच्या अनुदानात सादर करा (याची तेलगू आवृत्ती खास दरात सादर केली जाऊ शकते).
६ फेब्रुवारी दरम्यान, एक किंवा ही दोन्ही प्रकाशने सादर करून, बायबलमधील उचित सल्ला अनुसरणे ही खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे हे शिकण्याची संधी आपण लोकांना देऊ या.—स्तोत्र ११९:१०५.