राज्य सेवा शाळा आध्यात्मिक शिक्षण देते
वडीलांवर जबाबदारीचा मोठा भार आहे. १९५९ च्या सुरवातीपासून “देखरेख्यांच्या कामासाठी खास शिक्षणक्रम” या गहन नेमणूकीस पार पाडण्यात मदत होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आला. (jp पृ. २९२-३; yb७७ पृ. १४) १९८४ मध्ये प्रथमतःच उपाध्य सेवकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. अलिकडीच राज्य सेवा शाळा १९८८ मध्ये घेण्यात आली व त्याचा लाभ हजारोंनी घेतला.
तेव्हापासून शेकडो मंडळ्या स्थापण्यात आल्या आणि हजारो बांधवांची वडील व उपाध्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली. याखेरीज संस्थेत संघटनात्मक सुधारणाही घडल्या गेल्या. या कारणास्तव, नियमन मंडळ या नव्या कार्य वर्षात सर्व मंडळीतील वडीलांना व उपाध्य सेवकांना राज्य सेवा शाळेला उपस्थित राहण्यासंबंधीची योजना आखीत आहे. नवा शिक्षणक्रम क्षेत्राच्या अलिकडील गरजांनुरुप आखण्यात आला आहे. फिरते देखरेखे या शाळेत शिक्षण देण्यात पुढाकार घेतील. यानंतर वडील व उपाध्य सेवक या शाळेतून शिकलेल्या गोष्टींचा अवलंब आपापल्या मंडळ्यात करु लागतील तसे मंडळ्याना लाभ मिळू लागतील.