सुवार्ता सादरता
घरोघरच्या कार्यात विविधता वापरुन
१ यहोवाची निर्मिती विविधतेने बहरलेली नाही काय? स्तोत्रकर्त्याने जाहीर केलेः “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तुझी कृत्ये किती अगणित आहेत! ती सर्व तू चातुर्याने केली. पृथ्वी तुझ्या संपत्तीने परिपूर्ण आहे.” (स्तोत्र. १०४:२४) याचप्रमाणे त्याने जी सुवार्ता घोषित करण्याची आपल्याला आज्ञा केली आहे तिचे विविध पैलू आहेत. तेव्हा, शक्य आहे तेवढ्या लोकांना भेटता यावे म्हणून तुम्ही आपल्या घरोघरच्या कार्यात विविधता वापरीत आहात का?
२ मासिक दिनी: सर्वांनी दर शनिवारी मासिक कार्यात सहभागी व्हावे अशी संस्था सर्वांना उत्तेजन देत आहे. संभाषणाचा विषय वापरण्याऐवजी ३० ते ६० सेकंदाची सादरता वापरुन एक लेख दाखवून दोन मासिके ५ रुपयांना सादर करणे उचित आहे. कोणा घरमालकाने काही प्रश्न विचारले किंवा अनपेक्षित आस्था दाखवल्यास पुढल्या घरी जाण्याची घाई करण्याची गरज नाही.
३ द वॉचटावर आणि अवेक! मासिकांच्या बाबतीत विविधतेला तोटा नाही. सेवा सभेत पहिला भाग सादर करणारा बांधव अलिकडील मासिकातील बोलके मुद्दे प्रस्तुत करीत असतो. तेव्हा लक्ष द्या आणि जे तुम्हाला वापरता येतील त्या मुद्यांची नोंद करून घ्या. एखाद्या सेवा सभेत दृश्य दाखविण्यात येत असले तर ते कसे केले जाते ते लक्षात घ्या, त्याची तालीम करा व मग शनिवारी क्षेत्रावर त्याचा उपयोग करा. तुम्हाला फारच थोडा प्रतिसाद मिळत आहे असे दिसल्यास दुसरा लेख निवडा. दर अंकात विविध विषय असतात व ते लोकांच्या वेगवेगळ्या आस्थेला अनुसरुन असतात. दोन्ही मासिकतील लेखांसोबत परिचित झाल्यामुळे आपली सादरता घरमालकाची आस्था लक्षात घेऊन जुळवून घेता येईल.
४ तुमच्या प्रस्तावनेत विविधता ठेवा: इतर वेळी संभाषणाचा विषय वापरुन अलिकडील सादरता प्रस्तुत केली जावी. आमची राज्य सेवा वेळोवेळी वेगवेगळ्या संभाषणाचा विषय देत असते. नव्या लोकांना तालीम देताना अलिकडचा संभाषणाचा विषय वापरणे व साधी सादरता करणे चांगले आहे. तथापि, इतर वेळी आपला पवित्रा बदलत राहणे कदाचित चांगले असेल. तुम्ही आपली प्रस्तुती एखादी हस्तपत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका सादर करुन संभाषणाला सुरवात केली आहे का?
५ रिझनिंग पुस्तकातील काही प्रस्तावनांचा कदाचित तुम्ही उपयोग केला नसेल. उदाहरणार्थ, पृष्ठे १०-११ मधील प्रस्तावना अलिकडील घटनांचा आधार घेण्यास सांगतात. तसेच वॉचटावरच्या जुलै १५, १९८८ अंकात पृष्ठे १५-२० मध्ये देण्यात आलेले उत्तम प्रस्ताव विसरु नका. पृष्ठ १९, परिच्छेद १६ मध्ये जे प्रश्न विचारपूर्वक तयार करून देण्यात आले आहेत ते वापरण्याचा प्रयत्न करा. हे करताना घरमालकाला आपला दृष्टीकोन व्यक्त करण्यास वाव देण्यास विसरु नका.
६ आमच्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची पार्श्वभूमि व परिस्थिती वेगवेगळी आहे. या कारणास्तव ऐकणाऱ्या लोकांना अपील करता यावे यासाठी आम्ही विविध पवित्रा वापरण्यास हवा. हे त्यांच्याविषयी आम्हाला वाटणारी काळजी व कल्याण मनी राखून करावयास हवे. (१ करिंथ. ९:१९-२३) घरोघरच्या कार्यात विविधता वापरण्यामुळे आम्ही ‘आपले व आमचे ऐकणाऱ्याचेही तारण करु शकू.’—१ तीमथ्य ४:१६.