शिष्य बनविण्यास आम्हास साहाय्य करणाऱ्या सभा
फेब्रुवारी ४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १८ (१०८)
१० मि: स्थानिक घोषणा. तसेच आमची राज्य सेवा यामधून निवडक घोषणा. फेब्रुवारीची सादरता ठळकपणे सांगा. स्थानिकरित्या साठ्यामध्ये कोणती जुनी प्रकाशने उपलब्ध आहे ते सांगा. सध्याच्या संभाषणाच्या विषयाशी जुळणाऱ्या प्रस्तावना विचारात घ्या.
२० मि: “खचू नका.” लेखातील मुख्य मुद्यांवर चर्चा. परिच्छेद ३रा विचारात घेताना सभागृहाकडून प्रस्ताव विचारा. एका लायक प्रचारकाने सादरतेचे प्रात्यक्षिक करून दाखवावे व त्यामध्ये परिच्छेद ५ मध्ये देण्यात आलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. मंडळीला क्षेत्रकार्यामध्ये मग्न राहण्याविषयीचे तसेच जेव्हा उदासीन वृत्ती वा विरोधाचा सामना द्यावा लागतो तेव्हा खचून न जाण्याचे प्रोत्साहन द्या.
१५ मि: “विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून विजोड होऊ नका.” द वॉचटावर, नोव्हेंबर १, १९८९. (प्रादेशिक भाषातः टेहळणी बुरुज, जून १, १९९०.) भाषण व सभागृहाची सहभागिता.
गीत १४७ (३८) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी ११ ने सुरु होणारा सप्ताह
गीत ३० (११७)
१० मिः स्थानिक घोषणा व या आठवड्यात साक्षीकार्य करताना मासिकातून दाखवण्याजोगे बोलके मुद्दे थोडक्यात सांगा. जेथे शक्य आहे तेथे पुढील आठवडी सभेला येताना सर्वांनी लाईफ इन अ पीसफुल न्यू वर्ल्ड ही हस्तपत्रिका आणावी.
२० मिः आम्हाला बळकट कसे राहता येईल? बळकट राहावे व खचू नये ही गरज ठळकपणे मांडणाऱ्या मुलाखती. (१) जे पुष्कळ वर्षांपासून सेवा करीत आहेत व चांगले उदाहरण राखले आहे अशा दोघा किंवा तिघांची मुलाखत घ्या. प्रचार बंद करावा यासाठी त्यांना कोणकोणत्या दबावांचा अनुभव आला, ज्यांवर त्यांनी मात केली? कशामुळे त्यांचे पुढे जात राहण्यात व खचू न देण्यात साहाय्य केले? (प्रार्थना, नियमित सभांना उपस्थिती, व्यक्तीगत अभ्यास, इतरांकडील उत्तेजन, इत्यादि गोष्टींचा उल्लेख करावा.) मंद बनण्यापासून किंवा बाहेर न जाण्यापासून स्वतःला राखण्यासाठी त्यांनी काय केले? (सभांमधील नियमित बांधवांचा सहवास, व्यक्तीगत अभ्यास राखणे, यहोवाकडील नातेसंबंधाविषयीची आवड, आणि इत्यादि गोष्टींचे महत्त्व सांगावे.) आध्यात्मिक तोल त्यांनी कसा राखला? (वडील व इतरांनी दिलेली मदत, जीवनात प्रथम स्थानी आध्यात्मिक आस्था ठेवणे, यहोवास प्रार्थना करणे, इत्यादि उल्लेख करावा.) (२) काही मुले, जी नियमित प्रचारक तसेच उदाहरणशील आहेत, त्यांची मुलाखत घ्या. कशामुळे ते सेवाकार्यात नियमित आहेत? पालकांनी त्यांना कोणती मदत दिली? इतर प्रचारक त्यांना क्षेत्रकार्याविषयीचे प्रोत्साहन व मदत देतात का? यहोवाच्या सेवेसंबंधाने त्यांची ध्येये काय आहेत? मुलाखतीत ज्या मुद्यांची चर्चा झाली त्याची थाडक्यात उजळणी सादर करुन समारोप करा.
१५ मिः “सुवर्ण नियम—अद्याप का कायदेशीर आहे?” द वॉचटावर, नोव्हेंबर १, १९८९. (प्रादेशिक भाषेतः टेहळणी बुरुज, जानेवारी १, १९९१) भाषण व सभागृहासोबत चर्चा.
गीत १० (८८) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी १८ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १२१ (९५)
१० मिः स्थानिक घोषणा. जमाखर्च अहवाल व देणगी पोच माहिती. जागतिक कार्यासाठी लावलेल्या हातभारासंबंधाने मंडळीची प्रशंसा करा. “वॉचटावर वर्गणी मोहिमेसाठी तयारी करा,” या माहितीकडे लक्ष वेधवा आणि प्रचारकांना अधिक मासिकांच्या गरजेसाठी मागणी करण्यास सांगा. पुढील सेवा सभेसाठी प्रचारक स्वतःचा वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स १९८६-१९८९ आणू शकतील.
२० मिः “सुवार्ता सादरता—हस्तपत्रिकाद्वारे.” प्रश्नोत्तराने चर्चा. शास्त्रवचने वाचा. परिच्छेद ७वर चर्चा झाल्यावर कोणी पायनियर किंवा लायक प्रचारक यांजकरवी पुनर्भेटीमध्ये लाईफ इन अ पीसफूल न्यू वर्ल्ड या हस्तपत्रिकेचा वापर करून पवित्र शास्त्राभ्यास सुरु केल्याचे दाखवा. हा पवित्रा पुनर्भेटीत व खासपणे जेव्हा की, प्रथम भेटीनंतर घरमालक बरेच प्रयत्न करूनही घरी सापडला नाही तेव्हा वापरण्याचे प्रचारकांना उत्तेजन द्या. या पवित्र्यामुळे ज्या प्रचारकांना यश मिळाले आहे अशा तयारी केलेल्या प्रचारकांना आपले विवेचन मांडण्याचे निमंत्रण द्या.
१५ मिः “खरे सौंदर्य—तुम्हाला ते विकसीत करता येईल.” सेवा देखरेख्यांमार्फतचे भाषण. द वॉचटावर फेब्रुवारी १, १९८९. (प्रादेशिक भाषेतः टेहळणी बुरुज, जून १, १९९०.)
गीत १०८ (१००) व समाप्तीची प्रार्थना.
फेब्रुवारी २५ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १११ (२०)
१० मिः स्थानिक घोषणा. ईश्वरशासित वृत्त. सप्ताहाच्या शेवटाला जी क्षेत्रकार्याची योजना आहे ती सांगा. स्थानिक क्षेत्रातील लोकांना मासिकातील कोणते लेख खासपणे अपीलदायक ठरू शकतील त्याविषयीचे प्रस्ताव सांगा.
२३ मिः “इंडेक्सच्या साहाय्याने आपले राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे.” वडीलाकरवीचे भाषण व सभागृहाचा सहभाग. एक वडील व एक उपाध्य सेवक एकत्र मिळून मेंढपाळकत्वाच्या भेटीसाठी तयारी करण्यामध्ये इंडेक्सचा कसा वापर करतात त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. आपले साप्ताहिक पवित्र शास्त्र वाचन अधिक समृद्ध करण्यासाठी प्रचारकांनी इंडेक्सचा कसा वापर करण्यास कसे शिकावे ते त्यांना सांगा.
१२ मिः प्रकाशन सेवकाची कर्तव्ये. सेवा देखरेखे प्रकाशन सेवकाची मुलाखत घेतात व त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत त्याची उजळणी करतात. प्रकाशनाचे वितरण सभेआधी व नंतर करण्यामध्ये जी स्थानिक गरज आहे तिला ठळकपणे मांडणे चांगले ठरेल. संस्थेकडे उपलब्ध असणाऱ्या प्रकाशनामधील कोणत्या प्रकाशनांचा साठा असावा याविषयी सभागृहाकडून परामर्श घ्या.
गीत २०३ (७१) व समाप्तीची प्रार्थना.
मार्च ४ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १९२ (१०)
५ मिः स्थानिक घोषणा.
२५ मिः “१९९१ चा स्मारक विधी समारंभ.” वडीलांचे भाषण व सभागृहासोबत काही चर्चा. नवीन लोकांना स्मारकविधीसाठी येण्याचे निमंत्रण कसे देणार व त्यांनी उपस्थित राहावे म्हणून त्यांना कोणती मदत करणार याविषयी मंडळीला सांगू द्या. स्मारकविधीची निमंत्रणे उपलब्ध आहेत याचे मंडळीला स्मरण द्या.
१५ मिः स्मारकविधीच्या काळात तुम्ही साहाय्यक पायनियरींग करू शकाल का? नियमित किंवा साहाय्यक पायनियरींगचा अनुभव असलेल्या अनुभवी बंधुद्वारेचे उबदार भाषण. मागे साहाय्यक पायनियरींग केलेल्या कित्येक बांधवांची मुलाखत घ्या. आपल्या ध्येयाची पूर्ति करण्यासाठी त्यांना कोणता बदल करावा लागला? त्यांनी जी व्यावहारिक योजना आखली होती ती ठळकपणे समोर मांडा. स्मारकविधीचा काळ जवळ आलेला असता आस्थेवाईक प्रचारकांना वडीलांसोबत आपल्या योजनांची चर्चा करण्याचे उत्तेजन द्या. आता या कार्याविषयी सरळ दृष्टीकोण राखल्यास या सेवेचा आनंद अनेकांना घेता येईल. काहींच्या बाबतीत हे नियमित पायनियरींगसाठी एक टप्पा ठरू शकेल. (रा.से. ३/९० पृ. ३) अर्ज अध्यक्षीय देखरेखा किंवा सचिवांकडून प्राप्त करू शकता.
गीत १५१ (२५) व समाप्तीची प्रार्थना.