घोषणा
● प्रकाशन देणगीः
डिसेंबर: न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन पवित्र शास्त्र त्रैक्य किंवा पहा! माहितीपत्रकासोबत रु. ४८.
जानेवारी: क्वश्चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क हे पुस्तक १५ रुपयांना सादर करा. (जेथे हे उपलब्ध नाही तेथे खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.)
फेब्रुवारी व मार्च: खास सादरतेची १९२ पृष्ठांची दोन जुनी पुस्तके रु. १२ किंवा एक ६ रुपयांना द्या.
एप्रिल: लिव्ह फॉरएव्हर पुस्तक ३५ रुपयांना द्या, लहान आकाराचे २० रुपयांना. जेथे हे प्रकाशन नाही तेथे खास सादरतेच्या १९२ पृष्ठांच्या दोन जुन्या पुस्तकांपैकी एक ६ रुपयांना द्या. प्रादेशिक भाषेत एक खास सादरतेचे पुस्तक सहा रुपयांना द्या.
मे व जून: द वॉचटावर याची एका वर्षाची वार्षिक वर्गणी ५० रुपयांसाठी. सहा महिन्याची तसेच महिन्याला एकदा प्रकाशित होणाऱ्या मासिकाची वार्षिक वर्गणी २५ रुपये. (मासिक रुपाने प्रसिद्ध होणाऱ्या अंकासाठी सहा महिन्याची वर्गणी नाही. जेथे वर्गणी प्राप्त होत नाही तेथे दोन मासिके व एक माहितीपत्रक असे मिळून ८ रुपयांना द्यावे.)
● ज्या मंडळ्यांच्या मासिकासाठी डिस्ट्रीब्युटर्स ऑर्डर्स ३० पेक्षा अधिक प्रतींसाठी असतील, त्यांनी आपली ऑर्डर शक्यतो ५ च्या पटीत करावी. जेव्हा तुमच्या मंडळीतील मासिकांची ऑर्डर बदली करायची आहे त्यावेळी कृपया ही गोष्ट ध्यानात असू द्यावी.
● पालघाट प्रांतिय अधिवेशनाच्या सभागृहाचा पत्ता: म्युनिसिपल टाऊन हॉल, पालघाट, केरळ.
● येणाऱ्या महिन्यात आपल्या मंडळीच्या मासिकांची वाढ करावयाची असल्यास त्याची मागणी आताच करावी. एप्रिल व मे हे कार्याचे खास महिने असतात व शिवाय पुष्कळ जण या काळात साहाय्यक पायनियरिंग करीत असतात, हे लक्षात घेता मंडळ्यांनी आपल्यापाशी मासिकांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची खात्री करावी.