वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/९० पृ. ३
  • तुमची वहिवाट काय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची वहिवाट काय आहे?
  • आमची राज्य सेवा—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दुसऱ्‍यांना प्रोत्साहन द्या
  • यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना गेल्यामुळे तुम्हाला कोणते फायदे होतील?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • ख्रिस्ती सभांबद्दल कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सभांपासून अधिकाधिक आनंद घेण्यासाठी
    आमची राज्य सेवा—१९९९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९०
km ६/९० पृ. ३

तुमची वहिवाट काय आहे?

१ यहोवा देवास केल्या जाणाऱ्‍या आमच्या उपासनेमध्ये आमच्या ख्रिस्ती सभा या महत्त्वाच्या भाग होत. या कारणास्तव, प्रेषित पौलाने आम्हाला “कित्येकांच्या चालीप्रमाणे” आपण आपले एकत्र मिळणे सोडता कामा नये हा बोध उचितपणे केला आहे.—इब्री. १०:२५.

२ ख्रिस्ती सभांमध्ये आपल्या बांधवासमवेत एकत्र होण्याविषयी तुम्हालाही असेच वाटत असते का? याविषयी तुमची वहिवाट काय आहे? तुम्ही मंडळीच्या पुस्तक अभ्यासासमवेत, सर्व सभांना नियमितपणे जात असता का? किंवा तुम्हाला हे दिसते की, सभा चुकविणे हा एक प्रघात बनला आहे? तुमच्या जीवनात सभा कोणत्या स्थान राखून आहेत? तुम्ही इतरांना देखील सभांना नियमितपणे येण्याचे प्रोत्साहन देत असता का? तसेच स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांनाही सभेला नियमित उपस्थित राहावे म्हणून तुम्ही त्यांना उत्तेजन देता का?

३ आमचा दैनंदिन क्रम कोणताही असला तरी पौलाच्या सूचनेला कमी महत्त्वाचे समजता येणार नाही. आजारपण तसेच आपल्या आवाक्याबाहेरील स्थितीमुळे कधी कधी सभा चुकविल्या जातात हे समजण्याजोगे आहे तरी आमचा हा प्रघात बनता कामा नये. (रोम. २:२१) ज्यात ईश्‍वरशासित हालचालीही असतात अशा तसेच इतर कितीतरी गोष्टींची काळजी करावी लागत असताना, ख्रिश्‍चनांनी अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींची खात्री करण्यास हवी. (फिलिप्पै. १:१०) या अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींत सभांचा समावेश होतो व त्या आमच्या आध्यात्मिक आरोग्यासाठी जरुरीच्या आहेत.

दुसऱ्‍यांना प्रोत्साहन द्या

४ पौलाने रोमकरांना लिहिले तेव्हा त्यात त्यांची भेट घेण्याची त्याला किती उत्कंठा होती ते नमूद केले. ते का? त्यांनी “स्थिर होण्या”साठी त्यांना आध्यात्मिक कृपादान देता यावे यासाठी. (रोम. १:११) त्याने नुसते पत्र पाठवण्यात, पत्रातील मजकूर त्यांनी वाचावा एवढ्यावर समाधान मानले नाही, पण त्यांचा सहवास त्याला खरेपणाने महत्त्वाचा वाटला, कारण तो पुढे म्हणतो कीः “आपणा उभयतांस . . . उत्तेजन प्राप्त व्हावे.” रेफरन्स बायबल यातील तळटीप याविषयी म्हणतेः “एकमेकांस प्रोत्साहन देण्यासाठी.” (रोम. १:१२) स्वतः, पौल या प्रेषिताला देखील ख्रिस्ती सहवासाच्या उत्तेजनाची गरज वाटली होती.

५ याचप्रमाणे आज, आमच्या सभेत आपण एकमेकांना प्रीती व सत्कर्मे याविषयी उत्तेजन दिले पाहिजे. एखादे स्मित आणि उबदार शुभेच्छा दुसऱ्‍यांवर हितकारक प्रभाव पाडतात. सभेत उभारणीकारक उत्तरे देणे, कार्यक्रमाचा भाग चांगली तयारी करून सादर करणे, दुसरे आध्यात्मिक प्रगति गाठत आहेत हे पहाणे व शिवाय बंधूंसमवेत तेथे असणे या प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टी आहेत. सायंकाळी जरी आम्ही थकलेल्या स्थितीत असलो तरी सभेच्या उपस्थितीनंतर आम्हाला अधिक चांगले वाटू लागेल. आमचे ख्रिस्ती मित्रत्व व बंधूजन आम्हाविषयी दाखवीत असलेली प्रीती आम्हाला “नेमून दिलेल्या धावेवरुन धीराने” धावण्याचे उत्तेजन देईल. (इब्री १२:१) देवाच्या वचनाकडे तत्परतेचे लक्ष दिल्यामुळे आम्हाला न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरुन राहता येईल. होय, सभांना उपस्थित राहिल्यामुळे बरेच फायदे मिळत असतात.

६ आता पूर्वी कधीही नव्हते इतक्या अधिकपणे आम्ही आमचा विश्‍वास राखण्याची आणि इतरांना प्रीती व सत्कर्मे करण्याचे उत्तेजन देण्याची गरज आहे. मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याचा आम्ही पराकाष्ठेचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही आपले एकत्र मिळणे सोडून द्यावे असा प्रघात पाडू देऊ नये. आम्ही इतरांनाही तसेच स्मारकविधीस आलेल्या लोकांना सभांना नियमितपणे येण्याचे प्रोत्साहन व मदत देण्याचे परिश्रम घ्यावेत. याद्वारे आम्हाला इतरांविषयी वाटणारी प्रीती आणि ख्रिस्ती सभांसाठी आपली रसिकता व्यक्‍त करता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा