सूज्ञ व्हा–शिकलेल्या सर्व गोष्टी आचरणात आणा
१ बहुसंख्य मानवाचे ध्येय हेच आहे की, आनंदी, शांतीचे जीवन जगावे. यास्तव, यशस्वी विवाहीत जीवन, मुलांचे संगोपन, आर्थिक आघाडीवरील यशप्राप्ती, आणि स्वास्थ या प्रकारची असंख्य पुस्तके, लेख अशा विषयांचे बाबत सल्ला देतात, ते याच अनुरोधात की लोकांचे सौख्यताप्राप्तीत साहाय्य व्हावे. जरी या सर्व जगीक प्रकाशनात थोडे बहुत व्यावहारिक ज्ञान सापडते तरी या जगातील बहुसंख्यांकाना सर्व काही असताही सौख्यता व शांती यांचा अभाव असतो. असे का असावे?
२ याचे उत्तर पवित्र शास्त्रात नीतीसूत्रे १:७ मध्ये सापडू शकतेः “यहोवाचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय; पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.” जी व्यक्ती जोवर हे कबूल करीत नाही व आदर करीत नाही की यहोवा देव खऱ्या ज्ञानाचा उगम आहे, तोवर तिला शांती व स्वास्थ लाभू शकणार नाही.
३ हे जग आध्यात्मिक दुर्बलतेत, दुष्काळात आहे. उपरोधिकपणे म्हटल्यास, ही दुःखद परिस्थिती, त्यानेच स्वतः ओढावून घेतलेली आहे. कारण आज सबंध पृथ्वीवर केवढ्या विपुलतेत आध्यात्मिक अन्न उपलब्ध आहे, व ते मोफत मिळते. (नीती १:२०, २१; प्रकटी २२:१७) जगातील लोक यहोवाकडील ज्ञानास धिक्कारीत असल्यामुळे आजही ते आध्यात्मिकतेच्या निबिड काळोखात ठेचा खात आहेत. (नीती. १:२२-३२) तेच यहोवाच्या लोकांबाबत पाहिल्यास ते त्याचे नियम आणि कायदे पाळून चालतात म्हणूनच ते आध्यात्मिकतेने भरपूर भरविलेले व आनंदी लोक आहे. (यशया ६५:१३, १४) तसेच, देवाच्या संस्थेतील प्रीतीचे कटिवेष्टण एवढे विशाल होत आहे की, ते आम्हाबद्दल ही ओळख देत आहे, आम्ही येशूचे खरे शिष्य आहोत. (योहान १३:३५) होय, जगभरातील यहोवाच्या साक्षीदारातील विश्वबंधूत्व ही जिवंत साक्ष देते की, आम्ही जे शास्त्र शिकवणूकीस चिटकून राहतो तोच सूज्ञ मार्ग आहे.
४ तरीही, असे काही आहेत, जे जरी यहोवाच्या संस्थेत आहेत तरी ते अनुभवू शकतात तेवढी सौख्यता अनुभवीत नाहीत. उलट ज्या गोष्टी ते करतात व ज्या प्रकारे बोलतात त्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या आनंदावर प्रतिकूल परिणाम करीत असतात. हे कसे असू शकेल बरे? हे आपल्या जीवनास देववचनातील सूज्ञता लागू करीत नाहीत म्हणून हे सर्व घडते. ते कदाचित मंडळीच्या सभांना, विभागिय संमेलनाना, प्रांतिय अधिवेशनाला उपस्थित राहात असतील. ते कदाचित संस्थेने प्रकाशित केलेली सर्व प्रकाशने घेत व वाचीत असतील पण त्यांचे राहणीमान व ते ज्या प्रकारे इतरांसोबत व्यवहार राखून आहेत, ज्यांच्यामध्ये कदाचित त्यांच्या ख्रिस्ती बांधवांचाही समावेश असेल, त्याद्वारा ते जे सत्य शिकले, त्याचे परिणाम परावर्तित करीत नसल्याचे व्यक्त होईल. त्याबद्दल काय करावे? अशा व्यक्तींनी “आत्म्यासाठी पेरितो” या दृष्टीकोणावर लक्ष ठेवून पेरणी केली पाहिजे की ज्या आधारे त्यांच्या स्वतःच्या जीवनात खरा आनंद येईल, शिवाय त्यांच्या सभोवतालच्यांच्या जीवनातही तोच खरा आनंद आणण्यात त्यांना हातभार लावू शकतील.—गलती ६:७, ८.
काय लागू करावे
५ आम्ही जर वैयक्तीकपणे मागे पडलो आहोत, आमच्या सावधानतेत ढिलाई आली आहे, सैतानास, या जगास किंवा आमच्या अपूर्णत्वातील शरीराच्या अभिलाषांना बळी पडलो आहोत तर यहोवाशी निकटवर्तीय नातेसंबंध टिकवून ठेविण्यातील खरा आनंद गमाविणार. आता, पूर्वी कधीही नव्हती, एवढी निकडीची गरज आहे की, आम्ही आमच्या सभांमध्ये, संमेलनांमध्ये तसेच संस्थेकरवी ज्या सर्व तरतूदी उपलब्ध केल्या जातात त्यांच्याद्वारा जे सर्व काही शिकतो ते स्वतःस लागू करण्याची सावधगिरी बाळगून असावे. ज्या जगात आम्ही जगत आहोत ते सतत बदलणारे बनल्यामुळे अत्यंत धोक्याचे आहे. यास्तव यहोवा आपणावरील प्रेमामुळे “विश्वासू व बुद्धीमान दास” वर्गाकरवी जो उपदेश पुरवितो, तो यथाकाळचे अन्न आहे हे ओळखून, स्वतःस लागू करण्याची दक्षता आम्ही बाळगली पाहिजे.—मत्तय २४:४५-४७.
६ आमच्या एक दिवशीय खास संमेलनाच्या कार्यक्रमात एक कळप या खंबीर भूमिकेत कसे टिकून रहावे याबद्दलची उत्तम माहिती पुरविली जाईल. निराश करणारे प्रसंग, जगीक स्वतंत्र आत्मा आणि वेळ वाया घालविणारी आकर्षणे यांच्यामुळे कमकुवत बनविणाऱ्या प्रभावांना कसे तोंड द्यावे याबद्दलच्या व्यावहारिक सूचना दिल्या जातील. आम्ही यहोवा आणि त्याच्या मार्गावर पूर्णपणे भरवसा ठेवून असावे, ईश्वरशासित अधिकारास ओळखून त्याच्या अधीन राहावे, नम्र व विनयशील असावे व ईश्वरशासित हालचालीत सामील होण्यासाठी संधि साधावी, याबाबतचा जो उत्तम सल्ला व मार्गदर्शन पुरविले जाते ते अनुसरिता का? (मीखा ६:८; इफिस ५:१५, १६; इब्री. ६:१०; १३:१७) ख्रिश्चन जीवन पद्धतीस अनुसरण्यात सबंध कुटुंबाचे एकमत असून सदस्य यात एकमेकांचे साहाय्य करतात का? आम्हास शास्त्रवचनातून जो उपदेश केला जातो त्याचा, मनोरंजनाची निवड, आमच्या सवया, आमचे दैनंदिन जीवनावर परिणाम झालाच पाहिजे. ज्या गोष्टी आम्ही शिकतो त्या अनुसरण्याचे परिश्रमपूर्वक प्रयत्न न केल्यास आमची आध्यात्मिक प्रगती मंदावेल किंवा होऊ शकणार नाही, शिवाय शांत विचारी मन व सौख्यतेवर प्रतिकूल परिणाम होतील.—फिलिप्पै ४:७-९; याकोब १:२२-२५.
७ वैयक्तीत तसेच कौटुंबिक अभ्यास नेटाने चालवीत राहण्यात सहकारक प्रयत्न असावेत. पवित्र शास्त्रीय तत्वांचे अवलंबन करण्याबद्दलची तपशीलवार माहिती पुरविण्यात वॉचटावर पब्लीकेशन्स इंडेक्स आमचे मार्गदर्शन करू शकेल. यंग पीपल आस्क हे नवे पुस्तक पालकाकरिताही एक उत्तम मदतीचे साधन आहे ज्याचा उपयोग लेकरांना सध्याच्या सैतानी विचाराचे जगापासून बचावून ठेवण्यात करू शकतात. अशा साहित्यास वेळोवेळी संदर्भ उद्देशाने चाळण्याने आम्हास कोणाही एका विषयावरील यहोवाचा दृष्टीकोन कळेल शिवाय नीतीमान तत्त्वांचे मार्गदर्शन लाभेल. याबाबतीत असे होऊ नये की, जणू रोगाचे औषध घरातच आहे पण, रोग बळावेल हे जाणूनही कधीच घेणे होत नाही. नियमितपणे केलेल्या वैयक्तीक आणि कौटुंबिक अभ्यासाने आमच्या विश्वासात वाढ होईल व तो आम्हास टिकून राहण्यास बळ पुरवील. परिक्षण काळात आमचा विश्वास मागे पडण्याइतका विफल होणार नाही.—मत्तय १३:६; लूक ८:१३; इब्री २:१.
८ आपापल्या घरांची देखरेख करण्यात वडीलजन आणि उपाध्य सेवक यांनी आपले उत्तम उदाहरण समोर ठेवावे. यामध्ये तेही समाविष्ठ आहेत की आध्यात्मिकतेत सबळ राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या बायकांचे व लेकरांचे, ज्या सर्व गोष्टी ते देववचनातून व संस्थेकरवी शिकतात, त्या आचरणात आणण्यात साहाय्य करावे. या मार्गी, ते सबंध कुटुंब, त्यांच्या ख्रिस्ती आचरणात एक आदर्शनीय कुटुंब असेल तसेच मंडळीतील व मंडळीच्या बाहेरच्यांनाही तसे करण्याचे उत्तेजन देणारे बनेल.—इफिस ६:४; १ तीमथ्य ३:४, १२, १३.
कोणाचे साहाय्य करावे
९ प्रतिवर्षी प्रभूच्या सांजभोजनाला उपस्थित राहणाऱ्यांपैकी अनेकांना, जे काही ते शिकतात ते लागू करून घेण्यात व संस्थेसोबत क्रियाशील संबंध राखण्यात मदतीची गरज असते. आमच्या शास्त्राभ्यासू विद्यार्थ्यांना, आपण शिकत असलेली शास्त्रतत्वे त्यांच्या जीवनात कशी लागू करावीत व देवाकडील नीतीमान आदेश कसे पाळावेत याचे शिक्षण प्रेमळ सहानुभूतीने देण्याची आवश्यकता असते. जे कोणी विश्वासात आमचे बंधू वा भगिनी बनण्याप्रत प्रगति करीत आहेत अशांची आम्हीही काळजी बाळगतो असे प्रदर्शित करावे.
१० जे कोणी अनियमित किंवा अक्रियाक बनले असतील ते संस्थेकरवीच्या नियमित हालचालीत सहभागी होऊन परत क्रियाशील कसे होऊ शकतील याकडे लक्ष पुरवावे. यहोवाची पूर्वी अधिक पूर्णतेत सेवा करीत असता जो आनंद होता ती शांती व सौख्यता परत त्यांनी मिळविण्याची गरज आहे. (योहान १३:१७) यास्तव, सत्य आणि “देवाला . . . हा यज्ञ . . . ओठांचे फळ” रुपात आवडीने परत अर्पण्यास सुरवात करण्याची तीव्र इच्छा परत जागृत करण्यात प्रेमळ साहाय्य करावे; की ज्या योगे ते त्यांनी शिकलेल्या गोष्टी आचरणात आणू शकतील व या जीवनाच्या मार्गावर टिकून राहतील.—इब्री. १३:१५; पहा आमची राज्य सेवा ऑगस्ट १९७९, पान ३, आणि एप्रिल १९७७, पान ३.
११ देवाच्या सर्व लोकांनी, यहोवाच्या वेगाने जाणाऱ्या संस्थेसोबत स्वतःस ठेविण्याची गरज आहे. आम्ही स्वतःस आपल्याच आत्मसंतुष्टतेत घोळत राहू देऊ शकत नाही. आम्हास सतत आपल्या आध्यात्मिकतेबाबत दक्ष असण्यास हवे व देवाच्या संस्थेकडून आलेल्या नवीन माहितीशी परिचित ठेविले पाहिजे; व ते लागू करण्यास तयार झाले पाहिजे. याकरता, परिश्रमपूर्वक प्रयत्न व काही वेळा व्यक्तीगत त्याग केले पाहिजेत. पण यहोवा आमच्या कक्षेपलिकडील असे काही मागत नाही. तो आमचा सृष्टीकर्ता आहे; व आम्हाकरिता चांगले ते काय हे तो चांगले जाणतो. यास्तव, आम्ही सूज्ञ आहोत व यहोवा जे काही शिकवतो ते शिकतो व त्या सर्व गोष्टी आचरीत आहोत असे स्वतःबाबतीत शाबीत करू. याद्वारा त्याच्या नावास गौरव प्राप्त होईल व आम्हास सार्वकालिक फायदे होतील.—यशया ४८:१७; ५४:१३.