कुशल कार्यकर्ते देवाच्या वचनास योग्यपणे उपयोगात आणातात
१ ख्रिस्ती सेवकांना अगदी रास्तपणे “देवाचे सहकारी” असे संबोधिलेले आहे. (१ करिंथ. ३:९) या कारणास्तव, हे आमचे ध्येय असावे की, आम्ही आपणाठायी अशी कुशलता अवगत करावी की जिच्यायोगे असे कार्यकर्ते बनू जे ‘सत्याचे वचन नीट सांगणारे’ असतील.—२ तीम. २:१५.
२ ख्रिस्ती सेवकपणात कुशल बनण्यात आम्हास साहाय्यक ठरावे म्हणून संस्थेने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स मध्ये अनेक अतुलनीय गोष्टी समाविष्ठ केलेल्या आहेत. तुम्ही त्यांच्याशी परिचित आहात का? तुमच्या क्षेत्रसेवेत आणि व्यक्तीगत पवित्र शास्त्राभ्यासात या गोष्टींचा तुम्ही उपयोग करीत आहात का?
अष्टपैलू तरतूद
३ १९५० मध्ये जेव्हा न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द ख्रिश्चन ग्रीक स्क्रिपचर्स प्रकाशित झाले तेव्हा त्यात आमच्या सेवकपणास साहाय्यक ठरतील तसेच मंडळीच्या सभांकरिता पूर्वतयारी करण्यात व वैयक्तीक अभ्यासक्रमात उपयुक्त ठरतील असे दुसऱ्या उताऱ्याच्या हवालाचा संदर्भ सूचित करणारा विभाग, तळटीपा, पुरवणी आणि साखळी संदर्भ त्यात होते. मग, १९८४ मध्ये आम्हास केवढा आनंद झाला की, न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल मिळाले! देवाच्या वचनास योग्यपणे उपयोगात आणण्यासाठी आम्हा कुशल कार्यकर्त्यांसाठी ही केवढी थोर तरतूद मिळाली बरे! या अष्टपैलू तरतूदीचा परिश्रमपूर्वक उपयोग केल्यामुळे आम्ही आता पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक, आम्हाठायी तसेच इतरांठायीही खंबीर आध्यात्मिक गुण अवतग करण्यात तालीमबद्ध झालो आहोत.—मत्तय ७:२४; १ तीम. ४:१६; इब्री. ५:१४.
४ कार्य करीत असता तुम्हाला कदाचित कोणी प्रांजळ कॅथोलिक भेटेल, जो मत्तय १६:१८ चा संदर्भ घेऊन म्हणेल की, कॅथोलिक चर्चची बांधणी खडक म्हणून पेत्रावर झाली आहे. असे असले तर तुम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये दुसऱ्या उताऱ्याच्या हवालाचा संदर्भ सूचित करणारा विभाग उघडून ते वचन पहा; येथे तुम्हाला “खडक” या शब्दाला अनुसरून पाच वचनांचे संदर्भ आढळतील. ही वचने हे स्पष्ट करतील की, पेत्र नव्हे तर ख्रिस्त हाच मंडळीचा पाया आहे. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन रेफरन्स बायबल मध्ये हेच वचन काढून पाहिल्यास तेथील तळटीपेत “खडक” या शब्दावर पुष्कळशी अधिक माहिती मिळू शकेल आणि मूळ ग्रीक भाषेतील त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होईल.
५ या पवित्र शास्त्रात समाविष्ठ करण्यात आलेले “बायबल टॉपिक्स फॉर डिस्कशन” हे सदर देखील क्षेत्र सेवेत अत्यंत साहाय्यक माहिती पुरविणारे असल्याचे शाबीत झाले आहे. जेथे आम्ही वेळोवेळी कार्य करतो त्या क्षेत्रात कदाचित तुम्हाला आमची राज्य सेवा यामध्ये आलेल्या संभाषणाच्या विषयाऐवजी दुसरा एखादा विषय बोलण्याची निवड करायची आहे. तेव्हा “पृथ्वी,” “राज्य,” व “शेवटले दिवस” या मथळ्याखालील माहितीमध्ये तुम्हाला अशी वचने आढळतील ज्यांचा वापर या घरोघरच्या कार्यात वा परतभेटीच्या वेळी चर्चा करताना करता येईल.
आठवण देण्यास उपयुक्त असणारी साहाय्यके
६ आता समजा, पवित्र शास्त्र चर्चेच्या वेळी अमुक एक वचन कोठे मिळेल याची तुम्हाला आठवण राहात नसेल तर तुम्ही पवित्र शास्त्राच्या शेवटी “बायबल वर्डस् इंडेक्स” या विभागातून हवी ती मदत मिळवू शकता. या मूल्यवान विभागाचा तुम्ही उपयोग करीत आहात का?
७ पृष्ठ ५ वर देण्यात आलेली प्रस्तावना न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे विद्वानांचे काम आहे याचा खात्रीशीर पुरावा देते. सूचि-सदर हे स्पष्ट करते की, देवाच्या नामाचा वापर करणे उचित का आहे. याशिवाय हे सदर शास्त्रवचनांच्या आधाराने हे शाबीत करते की, “गेहेन्ना,” “हेडीज,” “शिओल,” तसेच “सोल” ही काय आहेत. तसेच पृष्ठ १५४६-७ वर पवित्र शास्त्र पुस्तकांची जी यादी दिलेली आहे त्यामध्ये, कोणी कोणते पुस्तक लिहिले आहे, त्याचे लिखाण कोठे व कधी झाले व त्यात केवढा काळ समाविष्ट आहे हे आम्हास सापडू शकेल.
८ यहोवाने आम्हाला “प्रत्येक चांगल्या कामास सज्ज” होण्यासाठी जे काही हवे आहे ते सर्व खरोखरी पुरविले आहे. (२ तीम. ३:१७) न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन त्याजसोबतच्या प्रकाशनासह सादर करून, आम्ही, आम्हास सोपविलेली सेवा प्रभावितपणे करू शकू. (लूक ६:४७, ४८) देवाच्या वचनाचा योग्यपणे वापर करणारे कुशल कार्यकर्ते आहोत असे दिसल्यावर आम्हाला आमच्या धन्याकडून “शाब्बास” असेच धन्योद्गार ऐकावयास मिळतील!—मत्तय २५:२१.