सुवार्ता सादरता
जुन्या प्रकाशनांनी
१ देवाची भक्ती करण्याचा निर्णय घेणे महत्वपूर्ण आहे. अशाप्रकारे अचूक ज्ञान घेणे व ते उपयोगात आणण्यास शहाणपण मिळविणे ही योग्य ध्येये आहेत.—नीती. २३:२३; योहान १७:३.
२ ज्ञान प्राप्त करून घेणे व शहाणपणात वाढण्यास आम्हास देव वचनाचा परिश्रमी अभ्यास केलाच पाहिजे. याकरवी आम्ही त्याच्या आज्ञा, नियम, स्मरणिका व सूचना सोबत परिचित होतो. तसेच यहोवाने त्याच्या लोकांसोबत कसा व्यवहार राखला होता त्या इतिहासावर मनन करणे जरूरीचे आहे. यहोवा जो कोणी त्याला शोधू इच्छीतात त्यांना औदार्याने ज्ञान व समज देतो. त्याच्या संस्थेच्या सहाय्याने वर्षानुवर्षे त्याने पुष्कळ प्रकाशने जी पवित्र शास्त्र ज्ञानाची विविध स्वरूपे स्पष्ट करतात ती पुरविली आहेत. ज्यांनी यहोवास ओळखले नाही त्यांना ती फारच फायदा करू शकतात.
जुन्या पुस्तकांचे महत्व
३ फेब्रुवारी व मार्च दरम्यान १९२ पृष्ठाचे कोणतेही पुस्तक जे १९८० पूर्वी छापले गेले त्यातील कोणतेही उपयोगात आणले जाऊ शकते. या प्रकाशनात माहितीचा खजिनाच आहे. ती खरोखरीच लोकांना अध्यात्मिक मोलाची ठरू शकतील. (मत्तय ५:१४-१६ पहा) यास्तव या दोन महिन्यादरम्यान आमच्या मंडळीत साठ्यात असणारी ही सर्व प्रकाशने सादर करण्याचा प्रयत्न करू या.
४ लोकांचा हाती ही प्रकाशने देण्याचे महत्व पुढील अनुभव विचारात घेतल्यावर समजून येईल. एका व्यक्तीस त्याची पत्नी जी साक्षीदार होती जिकडून पुस्तक बक्षीस म्हणून मिळाले. त्या वेळेपावतो त्याने कोणतीच आस्था दाखविली नव्हती. तिला आश्चर्य वाटले की एके संध्याकाळी त्याने ते पुस्तक वाचले. याने पवित्रशास्त्र देवाचा शब्द आहे यावर त्याचा विश्वास भक्कम केला तो मंडळीच्या पुढील सभेस उपस्थित राहिला व त्याने पवित्र शास्त्राभ्यासाची विनंती केली. तीन महिन्यातच तो क्षेत्र सेवेत आला व आता तो बाप्तीस्मा झालेला आहे.
निश्चयी मनोवृती बाळगा
५ देवाच्या वचनाच्या शक्तीस कमी लेखू नका. जुनी प्रकाशने पवित्र शास्त्र सत्यावर प्रकाश टाकतात हे पाहता ती निश्चयी मनोवृतीने सादर करा. अर्थात तुम्ही सादर करणारी जुनी प्रकाशने चांगल्या स्थितीत आहेत का याची खात्री करून घ्या. पुस्तके फाटलेली किंवा त्याची पाने पिवळी झालेली असतील तर ती घरोघरच्या कार्यात बाहेर दिली जाऊ नयेत कारण यामुळे लोकांचे लक्ष संदेशावरून विचलीत होईल.
६ या मोहिमेत आयोजीत प्रकाशनापैकी कोणतेच तुमच्या मंडळीत उपलब्ध नसेल तर उपलब्ध असणारे कोणतेही १९२ पृष्ठाचे एक १० रू. सादर करू शकता.
७ या जुन्या प्रकाशनांनी देववचनाच्या ज्ञानाची भागीदारी करण्याने आम्ही सर्व आमच्या फलदायी उपाध्यपणाचा आनंद लुटू या! हे आम्ही ज्यांना साक्ष देतो त्याच्या चिरकालीक हितासाठी ठरेल.