घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासांची तयारी करणे व ते चालविणे
१ येशूने आपल्या अनुयायांना सुवार्तेचा प्रचार करण्याची व “शिष्य बनवा” अशी आज्ञा दिली. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) घरगुती पवित्र शास्त्र अभ्यास चालविणे हा शिष्य बनविण्याचा प्रभावी मार्ग आहे. हे महत्त्वपूर्ण काम आपल्या उपासनेचा एक भाग असल्यामुळे, आपण घरगुती पवित्र शास्त्राभ्यासाची तयारी करताना व ते चालवताना जितके चांगले करता येईल तितके करावे.
२ अभ्यासाची तयारी करणे: घरगुती पवित्र शास्त्राभ्यासाच्या तयारीमध्ये धड्याचे नुसते वाचन व दिलेली शास्त्रवचने वाचणे हे समाविष्ट नाही. पवित्र शास्त्र अभ्यास घेणाऱ्या लोकांच्या अंतःकरणाप्रत पोहोचायचे आहे तर मग, त्यांना ते साहित्य अशा तऱ्हेने सादर केले पाहिजे की, ज्यामुळे त्यांना काही चालना मिळू शकेल.
३ प्रथमतः साहित्याची आपल्या स्वतःला पूर्ण समज असली पाहिजे. सर्व शास्त्रवचने परिच्छेदांशी याचप्रमाणे विद्यार्थ्याशी कशी संबंधित आहेत ते जाणून घेतले पाहिजे. प्रमुख शब्द किंवा संज्ञा अधोरेखित करणे आम्हाला लक्षात ठेवण्यास मदत देते. धड्यातील प्रमुख कल्पना वेगळ्या करण्याची व त्या विद्यार्थ्याला कशा समजावता येतील ते कळले पाहिजे. तसेच, विद्यार्थ्याचे शास्त्रवचनीय ज्ञान, जेथे त्याला मान्यता दाखवण्यास थोडी अडचण वाटली अशी क्षेत्रे, त्याने कोणत्या ख्रिस्ती व्यक्तीत्वाबद्दल सुधारणा करण्याची गरज आहे इत्यादि गोष्टींचा विचार केला पाहिजे. आम्ही स्वतःला विचारु शकतोः ‘धड्यातील हे साहित्य आणि शास्त्रवचने यांचा वापर विद्यार्थ्याची प्रगति घडावी म्हणून कसा करता येईल?’ कधी कधी अधिक संशोधन करण्याची गरज राहील. विद्यार्थ्याला खराच लाभ मिळवून द्यायचा आहे तर ही काळजीपूर्वक तयारी झालीच पाहिजे.
४ पवित्र शास्त्राभ्यासाची तयारी करताना प्रार्थना महत्त्वाचे स्थान राखते. तो विद्यार्थी तसेच त्याच्या विशिष्ट गरजा याबद्दल आपल्या प्रार्थनेत सविस्तर मांडावे. त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचता यावे यासाठी यहोवाकडे मदतीची याचना करा.—१ करिंथ. ३:६.
५ अभ्यास चालविणे: एखाद्या माणसाला सत्य आपलेसे करण्याची मदत देण्यामध्ये आपणाकडून प्रयत्नांची अपेक्षा आहे. अभ्यासाचे साहित्य नुसत्या प्रश्नोत्तर रुपात हाताळल्यास त्याला ज्ञान मिळू शकेल, पण तो जे शिकू शिकला त्यावर त्याला विश्वास वाटतो का? ते साहित्य त्याला व्यक्तीगतपणे कसे लागू होते व त्याला जे शिकायला मिळाले त्याबद्दल त्याने काय केले पाहिजे ते पाहण्यास त्याला मदत द्या.—कलस्सै. ३:१०.
६ साहित्यामध्ये ज्याचा विचार केलेला नाही अशा विषयाकडे चर्चेचा ओघ नेण्याचा धोका टाळावा. त्यांची चर्चा अभ्यासानंतर किंवा दुसऱ्या कोणा वेळी करावी. विद्यार्थ्याने पुस्तकातून उत्तर वाचून दाखवण्यापेक्षा ते त्याच्या शब्दात सांगावे हे महत्त्वाचे आहे. यामुळे, त्याला ते साहित्य कळते किंवा नाही हे तुम्हाला कळण्यास मदत मिळेल.
७ चांगला शिक्षक प्रमुख मुद्यांवर जोर देतो की, ज्यामुळे विद्यार्थी ते विसरु शकणार नाही. येशूने हे, विचारप्रवर्तक प्रश्नांनी साध्य केले; त्या प्रश्नांनी प्रकरणाच्या मुळाशीच हात घातला. (मत्तय १६:१३-१६; १७:२४-२७) प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्याला त्या विषयाची समज झालेली आहे की नाही इतकेच नाही तर त्याच्या अंतःकरणात काय आहे ते देखील तुम्हाला कळण्यास मदत होते. येशूने आपले म्हणणे काय आहे त्यावर श्रोत्यांना विचार करता यावा म्हणून साधी, गुंतागुंत नसलेली उदाहरणे वापरली.—मत्तय १३:३१-३३; २४:३२, ३३.
८ अभ्यासाच्या समाप्तीला उजळणी करताना प्रमुख शास्त्रवचनांचा समावेश करण्यास विसरु नका. प्रश्न टाका आणि तुमच्या विद्यार्थ्याला, त्याने जे काही शिकून घेतले आहे त्याबद्दल काय वाटते ते बघा; तसेच शिकलेल्या गोष्टींचा अवलंब त्याला कसा करता येईल हे त्याच्याकडून जाणून घेण्यासाठीही प्रश्न विचारा. मग, पुढील अभ्यासाच्या सुरवातीला, जरुरीप्रमाणे या प्रमुख मुद्यांची त्रोटक उजळणी करा.
९ लोकांनी यहोवाचे सेवक बनावे अशी आम्ही त्यांना तालीम देत आहोत. हा हक्क तसेच गंभीर जबाबदारी आहे. तुम्हाला तुमच्या पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याच्या पद्धतीत सुधारणा करता येईल का? आपण घरगुती पवित्र शास्त्र अभ्यासासंबंधाने तयारी करतो व तो चालवितो तेव्हा शक्य तो चांगले ते करण्याची पराकाष्ठा केली पाहिजे.—१ तीमथ्य ४:१५, १६.