एप्रिलमध्ये सर्व्हायवल पुस्तकास सादर करा
१ आज लक्षावधी लोक कसे जिवंत रहावे याच्या काळजीत आहेत व त्याला पुरेसे कारणही आहे. अन्नटंचाई, प्रदुषण, हिंसा व अशाच प्रकारच्या जीवनावर आघात करणाऱ्या इतर गोष्टींनी मनुष्यास एवढे भयात टाकले आहे की, भवितव्यात अधिक काय याच्याच विवंचनेत तो आहे. असे असताही, जे असंख्य जिवंत राहण्याच्या विवंचनेत आहेत त्यांना अगदीच त्रोटक किंवा काहीच माहिती नाही की महान धोका समोर ठाकला आहे. येशूने त्याला “जगाच्या प्रारंभापासून आजपर्यंत आले नाही व येणारही नाही असे मोठे संकट” असे संबोधिले आहे. (मत्तय २४:२१) मग, बचाव यापेक्षा अधिक निकडीचा दुसरा प्रश्न मानवजातीस भेडसावून असू शकेल का?
२ मग, या निकडीच्या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यात अत्यंत समयोचित असे आमचे पुस्तक सर्व्हायवल इन टू अ न्यू अर्थ् याशिवाय काय ठरेल बरे? “राज्याची वाढ” या प्रांतिय अधिवेशनात ते प्रकाशित करताना वक्त्यांनी म्हटले होतेः “जिवंत राहणे ही आमच्या काळातील एक महत्त्वाची समस्या बनलेली आहे. पण मानवजात आज ज्यास सामोरी आहे त्या अणूशस्त्र युद्धापेक्षा भयानक असे काही आहे. प्रत्यक्षात, त्यात स्वतः सृष्टीकर्त्यास हिशेब देणे आहे. पवित्र शास्त्रातील आश्चर्यचकित करणारे भविष्यवाद हे अगदी स्पष्ट करतात की त्यातूनही जिवंत असणारे असतील. . . . हे पुस्तक, आपणही त्यांच्यासोबतीत असावे, म्हणून साहाय्यक ठरावे या उद्देशाने प्रकाशित केले आहे.”
मदत पुरविण्यातील एक आवश्यकता
३ लोकांची जी अत्यंत निकडीची गरज पूर्ण करण्यात जिवंत राहणे या विषयावरील हे पुस्तक प्रसिद्ध करण्यापेक्षाही काही अधिक करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी ऐकले पाहिजे, ते पुस्तक मिळवले पाहिजे व वाचून ते लक्षात घेतले पाहिजे. मग, त्यातील महत्त्वाच्या माहितीनुसार हालचाल केली पाहिजे. हेच विचार मनी बाळगून प्रांतिय अधिवेशनाच्या वक्त्याने म्हटलेः “ज्या सर्वांना बचावून राहणे आहे अशांनी तातडीची हालचाल करण्याची जरुरी आहे. आम्ही क्षेत्रावर तसेच स्वतःच्या अभ्यासात उपयोग करावा म्हणूनच हे प्रकाशन तयार केले आहे.” होय, बंधुजनहो, “घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील”?—रोम. १०:१४.
४ यापेक्षा अधिक शिरशिरी भरविणारे, अधिक समाधानाने जीवन वाचवील असे काही आपल्या लक्षात येते का? पण तेच स्वतःचे जीवन बचावीत असता दुसऱ्याही कोणा व्यक्तीची सुटका करण्याचे प्रयत्न केल्यास ते केवढे चांगले बरे? हे तर अधिक फलदायक ठरेल.—१ तीम. ४:१६.
५ या नवीन पुस्तकाच्या मदतीने लोकांनी सत्य शिकण्यास सुरवात केल्यास किती लोकांचे जीवन वाचेल, होय ना? पण याचे उत्तर, त्याचे वितरण करण्यात आम्ही केवढे परिश्रम उचलणार व आमच्या सादरतेच्या प्रभावावर अवलंबून असेल. आम्ही ते, एप्रिलमधील आमची प्रकाशन सादरता १० रुपयांना सादर करीत आहोत. आमचे शेजारी, आप्तजन, कामकरी व शाळेतील सोबती व इतरांना हे पुस्तक सादर करण्यात जे सर्व परिश्रम उचलण्याचा मनोदय बाळगता तो आमच्या प्रकृती स्वास्थ्यावर, वयोमानावर, शक्तीवर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर आधारीत असणार, याशिवाय आम्हापाशी इतरांकरिता केवढी प्रीती आहे, व त्यांचाही बचाव व्हावा असे आम्हास कितपत वाटते यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार.—२ तीम. ४:२अ.
६ आमच्या सेवकपणातील धारदारपणा, आम्हास ते पुस्तक सादर करण्याची केवढी उत्तम माहिती आहे यावर अवलंबून आहे. आतापर्यंत आम्ही ते कदाचित संपूर्ण वाचले असेल. त्यातील बोलके मुद्दे, अवतरणे आणि चित्रांकडे आम्ही लक्ष पुरविले आहे का? पान २७ वर १९१४ हे कशाप्रकारे चिन्हांकित वर्ष होते याचा एक तक्ता दिला आहे, तसेच पान २९ वर काही अवतरणे दिली आहेत, जे हे स्पष्ट करतात की, त्या वर्षाबद्दल इतिहासकार कोणते दृष्टीकोन बाळगून आहेत व जे जिवंत राहण्याच्या प्रयत्नात असतील अशा व्यक्तींना ते अपील करणारे ठरतील. बचावून जिवंत राहण्याकरिता जे “चिन्ह” प्राप्त करण्यास हवे त्याच्या अपेक्षेत पान ९५ वरील चित्राआधारे चर्चा पुढे चालवू शकता.—पडताळा यहेज्केल ९:४, ६.
७ अध्यायांचे मथळे विचारवंतांच्या आस्थेला चेतावतील. मथळे, ज्यांचे विषय आहेतः “या पृथ्वी गृहाचे काय होणार?”, “सध्याची व्यवस्थाप्रणाली कोठवर चालणार?”, “अत्यंत दुःखद काळात सूज्ञतेने वागा”, आणि “शून्य तास, त्याचे मोजणीत नजीक येत आहे.” अशा काही चित्त आकर्षित विषयांची या पुस्तकात चर्चा केलेली आहे. पुस्तक घरमालकाचे हातात द्या, विचारा की, कोणता विषय त्यांच्या आवडीचा असेल. ज्यांनी इतर प्रकाशनांच्या सादरतेत असे केले त्यांना बहुतांशी यशप्राप्ती झाली आहे.
प्रतिबंधक असू नका
८ आम्ही सर्वांनी, अधिवेशनाच्या वक्त्यांचे शेवटल्या उद्गारांना मोठ्या स्फुर्तीने प्रतिसाद दिला जेव्हा ते म्हणालेः “दरम्यानचा हा काळ असता, आम्ही त्या अनेकांचे, आनंदी साक्षीदारांच्या मोठ्या समुदायात सामील होण्याची मदत पुरविण्याची संधि का साधू नये . . . जेव्हा तो या दुष्ट जगाचा नाश करील त्यावेळी देवाच्या कृपेने आम्हीही, त्याच्या गौरवी “नवीन पृथ्वी”वर जिवंतपणे प्रवेश करणाऱ्यांचे सोबतीतील असू.” यास्तव, जितक्यांचे, साहाय्य करण्यात सर्व्हायवल पुस्तकाच्या एप्रिलमध्ये वितरणाद्वारे संधि मिळेल ती साध्य करण्यात संपूर्णपणे सहभागी होऊ.