अनुक्रमणिका
२९ ऑक्टोबर २०१८–४ नोव्हेंबर २०१८ चा आठवडा
३ या गोष्टींचं पालन केल्याने तुम्ही सुखी व्हाल
ज्ञानाचा वापर केला तरच ते आपल्यासाठी मोलाचं ठरतं. पण असं करण्यासाठी आपण नम्र असणं गरजेचं आहे. बायबलमध्ये अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यांनी सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार केला, इतरांसाठी प्रार्थना केली आणि यहोवा कार्य करेल यासाठी त्याच्यावर विसंबून राहिले. आपण नम्र राहून अशा उदाहरणांचं कसं अनुकरण करू शकतो हे आपण या लेखात शिकणार आहोत.
८ वयस्क बांधवांनो—यहोवा तुमच्या एकनिष्ठतेला मौल्यवान लेखतो
५-११ नोव्हेंबर २०१८ चा आठवडा
१२ प्रोत्साहन देणारं प्रेम दाखवत राहा
जेव्हा जीवनात समस्या येतात तेव्हा आपण निराश आणि आशाहीन होतो. पण यहोवा आणि येशू आपल्याला मदत करतात. पण त्यासोबत आपणही एकमेकांना सांत्वन दिलं पाहिजे. आपण इतरांना प्रेमाने कसं प्रोत्साहन देऊ शकतो हे आपण या लेखातून शिकणार आहोत.
१२-१८ नोव्हेंबर २०१८ चा आठवडा
१७ आनंदी देवाची सेवा करणारे आनंदी असतात
यहोवा हा ‘आनंदी देव’ आहे आणि त्याचे सेवक आनंदी असावेत अशी त्याची इच्छा आहे. पण या सैतानाच्या जगात इतक्या समस्या असताना आपण आनंदी कसे राहू शकतो? डोंगरावरील उपदेशात येशूने शिकवलं की आपण आज आणि सर्वकाळासाठी कसं आनंदित राहू शकतो.
१९-२५ नोव्हेंबर २०१८ चा आठवडा
२३ सर्वशक्तिमान तरी इतरांचा विचार करणारा
२६ नोव्हेंबर २०१८–२ डिसेंबर २०१८ चा आठवडा
२८ यहोवाचं अनुकरण करून इतरांचा विचार करा आणि दयाळू बना
आज लोक जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालले आहेत. पण खरे ख्रिस्ती त्यांच्यासारखे नाहीत. कारण त्यांचं इतरांवर मनापासून प्रेम आहे. प्रेम दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे इतरांबद्दल विचारशील असणं. या दोन लेखात आपण पाहणार आहोत की यहोवा आपल्या प्रत्येकाबद्दल कसा विचार करतो आणि आपण त्याचं अनुकरण कसं करू शकतो.