तुम्हाला आठवतं का?
टेहळणी बुरूज नियतकालिकातील अलीकडील अंक तुम्ही काळजीपूर्वक वाचले आहेत का? तर मग, पुढील प्रश्नांची उत्तरं देण्यास जमतं का ते पाहा:
देवाच्या संघटनेकडून सूचना किंवा मार्गदर्शन दिलं जातं त्या वेळी बांधवांनी, जसं की विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतील वडील यांनी कोणती मनोवृत्ती दाखवण्याची गरज आहे?
देवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं बांधवांनी ताबडतोब पालन करणं गरजेचं आहे. ते स्वतःला विचारू शकतात: ‘यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी मी इतर बंधुभगिनींना प्रोत्साहन देतो का? संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं व सूचनांचं मी लगेच पालन करतो का?’—टेहळणी बुरूज१६.११, पृ. ११.
खरे ख्रिस्ती मोठ्या बाबेलच्या बंदिवासात केव्हा गेले?
प्रेषितांच्या मृत्यूनंतर काही काळातच खरे ख्रिस्ती मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले. त्या वेळी धर्म पुढाऱ्यांचा एक वर्ग उदयास येऊ लागला. चर्च व राज्यकर्त्यांनी खोट्या ख्रिस्ती शिकवणींना प्रोत्साहन दिलं, आणि गव्हाप्रमाणे असलेल्यांना ख्रिश्चनांना दडपून टाकलं. पण, १९१४ च्या आधीच्या काही दशकांमध्ये अभिषिक्त जण बाबेलच्या या बंदिवासातून स्वतःला मुक्त करून घेऊ लागले.—टेहळणी बुरूज१६.११, पृ. २३-२५.
“दैहिक गोष्टींकडे चित्त” लावणं आणि “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावणं यांत काय फरक आहे? (रोम. ८:६)
“दैहिक गोष्टींकडे चित्त” लावणारे लोक नेहमी स्वतःच्या पापी इच्छांनुसार आणि मनाला वाटेल तसं जगतात. पण “आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त” लावणारे लोक मात्र जीवनात देवाच्या सेवेला आणि त्याच्या इच्छेला सर्वाधिक महत्त्व देतात. असे ख्रिस्ती पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालतात. दैहिक गोष्टींचं चिंतन मरण आहे, तर आध्यात्मिक गोष्टींचं चिंतन जीवन व शांती आहे.—टेहळणी बुरूज१६.१२, पृ. १५-१७.
चिंता कमी करण्याचे कोणते काही व्यावहारिक मार्ग आहेत?
महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या, स्वतःच्या क्षमता ओळखा, आराम करण्यासाठी दररोज वेळ काढा, यहोवाच्या निर्मितीचा आनंद घ्या, विनोदी वृत्ती ठेवा, नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या.—टेहळणी बुरूज१६.१२, पृ. २२-२३.
“हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले.” (इब्री ११:५) हे कशा प्रकारे घडलं असावं?
असं दिसतं की, यहोवाने हनोखला मरणाच्या यातना न होऊ देता, त्याचं जीवनापासून मृत्यूमध्ये लोकांतर केलं.—टेहळणी बुरूज क्र. १ २०१७, पृ. १०-१३.
नम्रपणा का गरजेचा आहे?
नम्रपणामध्ये, स्वतःच्या मर्यादा व क्षमता चांगल्या प्रकारे ओळखणं सामील आहे. आपण आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक समजू नये. तसंच, आपल्या वागण्या-बोलण्याचा इतरांवर कसा परिणाम होईल याचाही आपण विचार केला पाहिजे.—टेहळणी बुरूज१७.०१, पृ. १८.
ज्या प्रकारे पहिल्या शतकात यहोवाने नियमन मंडळाला मार्गदर्शित केले होतं, त्याच प्रकारे आजही तो नियमन मंडळाला मार्गदर्शित करत आहे हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?
पहिल्या शतकातील नियमन मंडळाला देवाच्या पवित्र आत्म्याच्या साहाय्याने बायबलची सत्यं समजली. देवदूतांच्या साहाय्याने त्यांनी प्रचाराच्या कार्यावर देखरेख केली, आणि मार्गदर्शन देण्याच्या बाबतीत ते देवाच्या वचनावर अवलंबून राहिले. या सर्व गोष्टी आजही नियमन मंडळाच्या बाबतीत खऱ्या आहेत.—टेहळणी बुरूज१७.०२ पृ. २६-२८.
एका ख्रिस्ती व्यक्तीने घेतलेला निर्णय ती नंतर बदलू शकते का?
आपण आपला शब्द पाळला पाहिजे. पण अनेकदा घेतलेल्या काही निर्णयांमध्ये फेरबदल करण्याची गरज पडते. यहोवा देवाने जेव्हा पाहिलं की निनवेचे लोक बदलले आहेत, तेव्हा त्याने स्वतःच्या निर्णयात फेरबदल केला. कधीकधी बदललेल्या परिस्थितीमुळे, किंवा मिळालेल्या नवीन माहितीमुळे घेतलेल्या निर्णयांवर आपल्यालाही पुन्हा विचार करावा लागू शकतो.—टेहळणी बुरूज१७.०३ पृ. १६-१७.
इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणं धोक्याचं का आहे?
इतरांबद्दल नकारात्मक बोलल्याने परिस्थिती आणखी खराब होते. आपल्यासोबत अन्याय झाला असो अथवा नसो, इतरांबद्दल नकारात्मक बोलल्याने परिस्थिती कधीही सुधारत नाही.—टेहळणी बुरूज१७.०४ पृ. २१