वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 जून पृ. ३२
  • तुम्हाला माहीत होतं का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला माहीत होतं का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला माहीत होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • येशू मंदिर शुद्ध करतो
    बायबलमधून शिकू या!
  • येशू मंदिराची सफाई करतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • मंदिराला पुन्हा भेट देणे
    सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 जून पृ. ३२
मंदिरात खरेदी-विक्री करणाऱ्‍या व्यापाऱ्‍यांना येशू मंदिराच्या बाहेर हाकलून देतो

तुम्हाला माहीत होतं का?

यरुशलेमच्या मंदिरात प्राण्यांचा व्यापार करणाऱ्‍यांना येशूने ‘लुटारू’ म्हटलं; ते योग्यच होतं असं का म्हणता येईल?

मत्तयने सांगितलेल्या आनंदाच्या संदेशात आपण वाचतो: “येशू मंदिरात गेला आणि जे लोक मंदिराच्या आत खरेदी-विक्री करत होते त्या सर्वांना त्याने तिथून हाकलून लावले, आणि त्याने पैसे बदलून देणाऱ्‍यांचे मेज आणि कबुतरे विकणाऱ्‍यांची बाके उलटून टाकली. आणि तो त्यांना म्हणाला: “‘माझ्या घराला प्रार्थनेचं मंदिर म्हणतील,’ असं लिहिलं आहे, पण तुम्ही तर याला लुटारूंची गुहा करत आहात.’”—मत्त. २१:१२, १३.

यहुद्यांच्या इतिहासावरून दिसून येतं, की मंदिरातील हे व्यापारी, भरमसाट किंमती लावून ग्राहकांशी अन्यायीपणे वागायचे. उदाहरणार्थ, सहसा कबुतरं इतकी स्वस्त असायची की अर्पणं देण्यासाठी गरीब लोक ती सहज विकत घेऊ शकत होते. पण, प्राचीन यहुदी लिखाणांनुसार, पहिल्या शतकात अशी एक वेळ होती जेव्हा दोन कबुतरं विकत घेण्यासाठी एका व्यक्‍तीला एक सुवर्ण दिनार द्यावं लागायचं. एका कामगाराची ही २५ दिवसांची मजुरी होती. कबुतरांची किंमत इतकी वाढल्यामुळे गरीबांना ते मुळीच परवडण्यासारखं नव्हतं. (लेवी. १:१४; ५:७; १२:६-८) या गोष्टीमुळे, यहुदी धर्मगुरू सीमियन बेन गमालिएल इतका संतापला, की यहुद्यांना मंदिरात जी अर्पणं द्यावी लागायची त्यांची संख्या त्याने कमी केली. त्यामुळे लगेचच कबुतरांची किंमत एक सुवर्ण दिनाराचा शंभारावा भाग इतकी घसरली.

यावरून स्पष्टच आहे, की मंदिरातील व्यापारी खूप लोभी होते आणि ग्राहकांचा गैरफायदा घ्यायचे. त्यामुळे येशूने त्यांना ‘लुटारू’ असं जे म्हटलं ते योग्यच होतं.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा