प्रस्तावना
तुम्हाला काय वाटतं?
आपल्या जीवनातील समस्यांमुळे आपण निराश होऊ शकतो. आपल्याला खातरीलायक मदत आणि सांत्वन कुठून मिळू शकतं?
बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “सर्व सांत्वनदाता देव . . . आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो.”—२ करिंथकर १:३, ४.
आपल्याला हवं असलेलं सांत्वन देव आपल्याला कसं देतो त्यावर या टेहळणी बुरूजाच्या अंकात चर्चा केली आहे.