वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp16 क्र. २ पृ. १६
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपला मृत्यू होतो तेव्हा आपलं काय होतं?
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?
  • बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?
  • मेल्यावर आपण कुठे जातो?
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • मृत कोठे आहेत?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • मेल्यानंतर आपलं काय होतं?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
    मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
wp16 क्र. २ पृ. १६
कबरेवर गुलाबाचं फूल ठेवलं आहे

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

आपला मृत्यू होतो तेव्हा आपलं काय होतं?

लोक काय म्हणतात? काही लोक म्हणतात की, आपण मरतो तेव्हा आपल्या शरीरातलं काहीतरी निघून जातं आणि ते कुठंतरी जिवंत राहतं. तर इतर जण असं म्हणतात की, आपण मरतो तेव्हा सगळंच संपतं. याविषयी तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

“मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) आपण मरतो तेव्हा आपलं काहीच अस्तित्व उरत नाही.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • पहिला मानव, आदाम याचा मृत्यू झाला तेव्हा तो पुन्हा मातीला जाऊन मिळाला. (उत्पत्ति २:७; ३:१९) तसंच, लोक जेव्हा मरतात तेव्हा तेही पूर्णपणे नष्ट होतात.—उपदेशक ३:१९, २०.

  • लोक मरतात तेव्हा ते पापापासून मुक्‍त होतात किंवा त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळते. (रोमकर ६:७) मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या पापांसाठी आणखीन कोणती शिक्षा भोगावी लागत नाही.

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

तुम्हाला काय वाटतं?

  • हो

  • नाही

  • माहीत नाही

बायबलमध्ये काय सांगितलं आहे?

“मरणातून पुन्हा उठणे होणार आहे.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५, ईझी-टू-रीड व्हर्शन.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • बायबलमध्ये मृत्यूची तुलना झोपेशी करण्यात आली आहे. (योहान ११:११-१४) जसं आपण एखाद्या व्यक्‍तीला झोपेतून उठवू शकतो तसंच देवसुद्धा मृत व्यक्‍तीला उठवू शकतो.—ईयोब १४:१३-१५.

  • मृत लोकांना पुन्हा जिवंत केल्याचे बरेच अहवाल बायबलमध्ये दिले आहेत, त्यामुळे आपल्याला ठोस पुरावा मिळतो, की मृत लोकांना पुन्हा उठवले जाईल.—१ राजे १७:१७-२४; लूक ७:११-१७; योहान ११:३९-४४. (w16-E No. 1)

अधिक माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? पुस्तकातील अध्याय ६ पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा